Amazon Xiaomi Flagship Days Sale: Xiaomi चा ४० हजाराचा ‘हा’ स्मार्टफोन केवळ १८ हजारांत; जाणून घ्या कुठे सुरू आहे सेल..

0

Amazon Xiaomi Flagship Days Sale: अलीकडच्या काळात Xiaomi या ब्रँडचे स्मार्टफोन (smartphone) खरेदी करताना अनेक जण पाहायला मिळतात. कमी किंमत आणि आकर्षक फोन तसेच अनेक भन्नाट फीचर्स Xiaomi आपल्या ग्राहकांसाठी प्रदान करत असल्याने या फोनकडे ग्राहक अधिक आकर्षक होताना दिसून येतात. Xiaomi देखील आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन ऑफर घेऊन येत असते. आता पुन्हा एकदा या कंपनीने. Amazon Xiaomi Flagship Days Sale चे आयोजन केले आहे.

Xiaomi या ब्रँडने त्याच्या अधिकृत वेबसाइटवर Amazon Xiaomi Flagship Days Sale आयोजित केला असून, या भन्नाट सेलची मुदत उद्यापर्यंत असणार आहे. या सेलमध्ये प्रीमियम स्मार्टफोनवर जबरदस्त सूट देण्यात आली आहे. जर तुम्ही नवीन प्रिमीयर स्मार्टफोनच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी हा सेल मोठी पर्वणी ठरणार आहे. तुम्हाला या सेलमध्ये जबरदस्त सूट देण्यात येणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला तब्बल 18 हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. आता आपण Amazon Xiaomi Flagship Days या सेलमध्ये कोणत्या स्मार्टफोनवर किती ऑफर देण्यात आली आहे. हे सविस्तर जाणून घेऊया.

Xiaomi 11T Pro 5G

हा स्मार्टफोन ग्राहकांच्या कामवालीचा पसंतीस उतरला आहे. 8 जीबी रॅम तसेच 128 जीबी स्टोरेज असणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत 37,999 रुपये आहे. आणि 8 GB रॅम तसेच 256 GB स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत 39,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या दोन्हीं स्मार्टफोनच्या ऑफर विषयी सांगायचं झाल्यास, जर तुम्ही या स्मार्टफोनचे पेमेंट ICICI बँक क्रेडिट कार्ड वापरून केल्यास, तुम्हाला अतिरिक्त 4,500 रुपयांची सूट मिळणार आहे.

ICICI बँक क्रेडिट कार्ड बरोबर जर तुम्ही कुठल्याही बँकेचे कार्ड वापरून या स्मार्टफोनचे पेमेंट केल्यास, तुम्हाला एक हजार रुपये अतिरिक्त सूट देखील मिळणार आहे. याबरोबरच या सेलमध्ये तुम्हाला एक्सचेंज ऑफर देखील देण्यात येणार आहे. जर तुमचा जुना फोन एक्सचेंज करायचा झाल्यास, तुम्हाला पाच हजार रुपये आणखी सूट मिळणार आहे. सगळ्या ऑफर्स मिळून, या फोनच्या खरेदीवर तुम्हाला तब्बल 17 हजार रुपयांपर्यंत सुट मिळणार आहे.

Xiaomi 11 Lite NE 5G

हा स्मार्टफोन देखील ग्राहकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. 6 जीबी रॅम तसेच 128 जीबी स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत 24,999 रुपये आहे. तर 8 जीबी रॅम तसेच 128 जीबी स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत 26,999 रुपये आहे. या फोनच्या ऑफर विषयी जाणून घ्यायचे झाल्यास, कमालीचे डिस्काउंट मिळत आहे.

जर तुम्ही या फोनचे पेमेंट ICICI बँकेचे क्रेडिट कार्ड वापररून केल्यास 2,500 रुपयांची सूट दिली जाणार आहे. शिवाय जर तुम्ही कोणत्याही बँकेचे कार्ड वापरून हे पेमेंट केल्यास तुम्हाला दोन हजार रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळणार आहे. त्याबरोबरच या सेलमध्ये तुम्हाला एक्सचेंज ऑफरची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे. जुना फोन देऊन जर तुम्हाला नवीन फोन खरेदी करायचा झाल्यास, तुम्हाला पाच हजार रुपये सूट मिळणार आहे. सगळ्या ऑफर्सचा लाभ घेऊन हा स्मार्टफोन तुम्हाला तब्बल 21,600 रुपयांपर्यंतच्या ऑफर्सवर खरेदी करता येणार आहे.

Xiaomi 12 Pro 5G

या स्मार्टफोनचे बजेट जास्त असले तरी या स्मार्टफोनचे फिचर्स जबरदस्त आहे. आणि हा स्मार्टफोन अनेकांनी परचेस देखील केला आहे. 8 जीबी रॅम आणि 256 जीबी वेरिएंटची किंमत ६३ हजार रूपये आहे. मात्र या सेलमध्ये जर तुम्ही ICICI बँक क्रेडिट कार्ड वापरून या स्मार्टफोनचे पेमेंट केल्यास तुम्हाला सहा हजार रुपयांची सूट देण्यात येणार आहे.

त्याचबरोबर चेकआउटवर देखील चार हजार रुपयांची अतिरिक्त सूट या फोनच्या खरेदीवर देण्यात येणार आहे. या सेलमध्ये एक्सचेंज ऑफर देखील ग्राहकांना मिळणार आहे. अशा सर्व ऑफर मिळून, हा फोन तुम्हाला तब्बल 16 हजार 500 रुपयांपर्यंत कमी किंमतीवर खरेदी करता येणार आहे.

हे देखील वाचा Maharashtra Police Recruitment 2022: सर्वात मोठी ब्रेकिंग! राज्यात ऑगस्टमध्ये एकाचवेळी तब्बल 13 हजार पोलिस कॉन्स्टेबल पदाची मेगा भरती..

Marriage women: लग्न झालेल्या मुली गुगलवर सर्वाधिक सर्च करतात या सहा गोष्टी; वाचून तुम्हीही जाल चक्रावून..

Clogged arteries symptoms: तुम्हालाही या पाच समस्या असतील तर, येऊ शकतो हृदय विकाराचा झटका; त्यासाठी वेळेतच करा या 2 गोष्टी..

Lifestyle: महिलांमध्ये हे पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..

Lifestyle: पुरुषांच्या या चार गोष्टींवर महिला टाकतात जीव ओवाळून; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य..

LADLI YOJANA: राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय! लाडली योजनेअंतर्गत या मुलींना दिले जाणार दर वर्षी ५ हजार..

Lifestyle: या चार सवयी बदलल्या नाहीत, तर संसार पडेल उघड्यावर; पत्नीच्याही उतराल मनातून.. 

Mahaforest Recruitment 2022: महाराष्ट्र वन विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी! मासिक वेतन ४० हजार..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.