Goat Farming: शेळीपालन करण्यासाठी ‘या’ बँका देतायत पन्नास हजारांपासून इतक्या लाखांपर्यंत कर्ज; असा करा अर्ज..

0

Goat Farming: अडचणी आणि संकटाशिवाय शेतकऱ्यांच्या आयुष्यात दुसरं काहीच नाही. हे कोणालाही वेगळे सांगण्याची गरज नाही. शेतीवर (Farming) शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करूच शकत नाही. याविषयी देखील कोणालाही अधिक सांगण्याची गरज नाही. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेतीबरोबरच शेतकऱ्याला शेती पूरक व्यवसाय करावा लागतो. ही बाब आता शेतकऱ्यांच्या देखील चांगलीच लक्षात आली असल्याने अनेक जण आता शेतीपूरक अनेक व्यवसाय करताना पाहायला मिळतात. खासकरून शेतकरी शेळीपालन (Goat Rearing) व्यवसायाकडे अधिक जोमाने वळाल्याचं पाहायला मिळते. काय आहे शरद पवार ग्रामसमृद्धी योजना? योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज आणि मिळवा दोन लाख अनुदान..

शेतकऱ्याला शेती पूरक व्यवसाय करण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकार देखील अनुदान देत असतं. सहाजिकच त्यामुळे शेतकऱ्याला शेळी पालन (Goat Rearing) व्यवसाय उभा करण्यासाठी मोठी मदत होते. शेतकऱ्यांनी आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावे, यासाठी आता राज्य सरकार बरोबरच बँका देखील मोठ्या प्रमाणात लोन देत आहेत. मध्यमवर्गीय शेतकऱ्यांसाठी त्याचबरोबर पाण्याचे कमी साधन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा व्यवसाय मोठी पर्वणी ठरत असून, या व्यवसायातून शेतकऱ्यांचे जीवनमान देखील सुधारत असल्याचे निदर्शनास येतAtal Pension Yojana: ‘या’ सरकारी योजनेत फक्त गुंतवा 210 रुपये, आणि आयुष्यभर दरवर्षी मिळवा 60 हजार पेन्शन आहे.

शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी फारसे काही लागत नाही. शेतकऱ्यांसाठी तर शेळी पालन करणे ही मोठी संधी आहे. कारण प्रत्येक शेतकऱ्याकडे दोन-तीन शेळ्या असतातच असतात. आता याच व्यवसायाला वटवृक्षाचे रूप देण्यासाठी शेतकऱ्यांना बँका देखील मदत करत आहेत. आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, शेतकऱ्यांना कोण-कोणत्या बँकेत किती लोन दिले जातेय? या सरकारी योजनेत फक्त गुंतवा 210 रुपये, आणि आयुष्यभर दरवर्षी मिळवा 60 हजार पेन्शन

खेडे गावातील शेतकऱ्यांसाठी शेळी पालन हा व्यवसाय खूप उपयुक्त ठरत असला तरी, अनेकांना शेत असून देखील, शेळी पालन करण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. तसं पाहायला गेलं तर, शेळी पालन हा व्यवसाय खूप कमी खर्चिक आणि खूप कमी जागेत केला जाऊ शकतो. इतर मोठ्या प्राण्यांच्या तुलनेत शेळ्या ह्या खूप लहान असल्याने शेळ्यांना चारा देखील फारसा लागत नाही. आजही आपण पाहतो अनेक जण डोंगर-दऱ्या तून शेळ्या चारून आणून एका छोट्याशा वाड्यामध्ये बांधतात.राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय! लाडली योजनेअंतर्गत या मुलींना दिले जाणार दर वर्षी ५ हजार..

मात्र या शेळ्या साध्या असल्याने या सगळ्यांचे उत्पन्न देखील इतर शेळ्यांच्या तुलनेत फार कमी असतं. डोंगर-दरी फिरून आल्यानंतर, या शेळ्या मोठ्या देखील होत नसल्याचे पाहायला मिळते. आणि म्हणून बंदिस्त शेळीपालन असणं फार आवश्यक आहे. बंदिस्त शेळी पालन करण्यासाठी राज्य सरकार देखील अनुदान देतं. हे आपण पाहिलं आहे. आता बँका देखील लोन देत आहेत. आता आपण याविषयी देखील सविस्तर जाणून घेऊ. सर्वप्रथम आपण शेळी पालन करण्यासाठी कोणकोणत्या बँका लोन देतात, हे जाणून घेऊ. व्यवसाय सुरू करायचाय पण पैसे नाहीत? चिंता करू नका, केंद्र सरकार देतय हमीशिवाय दहा लाखांपर्यंत कर्ज; जाणून घ्या सविस्तर..

शेळीपालन करण्यासाठी या बॅका देतात लोन

आयडीबीआय बँक, कॅनरा बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक ग्रामीण बॅंक, नागरी बॅंक, व्यावसायिक बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक, स्टेट बँक सहकारी, इत्यादी बँका शेतकऱ्यांना शेळीपालन करण्यासाठी कर्ज देतात. आता आपण या बँकेमधून कशा-कशासाठी कर्ज मिळू शकते याविषयी सविस्तर जाणून घेऊ.  या शेतकऱ्यांना आता दरमहा मिळणार तीन हजार; मायबाप सरकारचा मोठा निर्णय! असा करा अर्ज..

शेतकऱ्यांना या दोन प्रकारे कर्ज दिलं जातं

शेतकऱ्यांना शेळी पालन करण्यासाठी कर्ज दिलं जातं. मात्र यामध्ये शेळी खरेदी करण्यासाठी, तसेच चारा खरेदी करण्यासाठी, शेड बांधण्यासाठी देखील बॅका शेतकर्‍यांना या व्यवसायाद्वारे कर्जपुरवठा करतात. यामध्ये सरकारी कर्ज आणि व्यवसायिक कर्ज अशा दोन कर्जाचा समावेश आहे. शेळी पालन हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जे कर्ज दिले जाते, या कर्जाला व्यवसाय कर्ज असं म्हटलं जातं. कर्जाचा दुसऱ्या प्रकारा विषयी माहिती घ्यायची झाल्यास, या कराच्या माध्यमातून शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी हे कर्ज दिले जाते. मात्र तुमच्या गरजेनुसार तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊ शकता. शेळी पालन करण्यासाठी बँकांकडून किती कर्ज घेऊ शकतो? याविषयी जाणून घेऊ. अग्नीपथ योजनेअंतर्गत देशातील या तरुणांना चार वर्ष करता येणार देशसेवा; 40 हजार पगारासह मिळणार अनेक सुविधा..

शेळीपालन करण्यासाठी मिळू शकते, एवढे कर्ज

आपण वरती पहिल्याप्रमाणे, ज्या बँका शेळीपालन करण्यासाठी कर्ज देतात, त्या बॅंकांची कर्ज देण्याची रक्कम वेगवेगळी आहे. आयडीबीआय बँकेचा विचार करायचा झाल्यास, ही बँक शेळीपालन करण्यासाठी 50 हजार ते 50 लाख रुपयांपर्यंत देखील कर्जपुरवठा करते. आता आपण शेळी पालन करण्यासाठी कर्ज घेण्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत? हे देखील पाहू. ‘या’ योजनेअंतर्गत मिळतेय मोफत शिलाई मशीन; कसा करायचा ऑनलाइन अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

ही कागदपत्रे असणं आवश्यक?

बँकेकडून कर्ज घेण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्र सादर करावी लागतात. यामध्ये तुम्हाला पासपोर्ट आकाराचे चार फोटो द्यावे लागतात. याबरोबरच महत्वाचं म्हणजे पाठीमागील सहा महिन्यांचे बँकेचे स्टेटमेंट असणे देखील अनिवार्य आहे. याबरोबर तुमचा कायमचा रहिवासी पत्ता देखील बँकेला सादर करावा लागतो. याबरोबरच उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, तुमचे रेशन कार्ड, याबरोबर जात प्रमाणपत्र, आदिवासी प्रमाणपत्र, शेळीपालन प्रकल्प अहवाल, जमीन नोंदणी दस्तऐवज इत्यादी कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.  आता रेशन दुकानात मिळणार नाही गहू, यामुळे सरकारने घेतला मोठा निर्णय 

आता आपण कर्ज घेण्यासाठी अर्ज कसा करायचा याविषयी सविस्तर जाणून घेऊ..

जर तुम्हाला शेळीपालनासाठी बँकेकडून कर्ज घ्यायचं असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला, तुमच्या ग्रामपंचायतीध्ये जावून शेळीपालन संदर्भातला फॉर्म घ्यावा लागेल. ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध नसेल, तर तुम्ही पंचायत समितीमधून देखील घेऊ शकता. संबंधित अर्जामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती अचूक लिहावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला या फॉर्म वरच लागणारी सर्व कागदपत्रे दिलेली असतील. ती सविस्तर वाचून या अर्जासोबत कागदपत्रे जोडावी लागणार आहेत. त्यानंतर जर तुम्ही पात्र असाल, तर तुमचे कर्ज मंजूर केले जाईल.

हे देखील वाचा Death signs: मृत्यू होण्यापूर्वी मनुष्याला मिळतात हे आठ संकेत..

Jobs in Maharashtra: बारावी आणि ग्रॅज्युएशन विद्यार्थ्यांनासाठी नोकरीची सुवर्णसंधी! परीक्षा विना केली जाणार निवड; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

MHA CEPI Recruitment 2022: गृह मंत्रालयात विविध पदांसाठी निघाली मेगा भरती! इच्छुक आणि पात्र उमेदवारांना असा करता येणार अर्ज..

Second hand Maruti Suzuki Alto: जबरदस्त ऑफर! Alto कार केवळ ५० हजारांत; जाणून घ्या सेल विषयी सर्व डिटेल्स..

Lifestyle: या पाच कारणांमुळे मुलं साडी नेसलेल्या मुलींकडे होतात आकर्षित: कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित..

व्हायग्रा पुरुषांच्या लैंगिकतेवर असं करत काम; अतिसेवन झाल्यास होतात हे गंभीर दुष्परिणाम..

Lifestyle: महिलांच्या या  भागांवर केस असतील तर मानले जाते शुभ नवराही समजला जातो भाग्यवान..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.