Sarkari Yojana: या शेतकऱ्यांना आता दरमहा मिळणार तीन हजार; मायबाप सरकारचा मोठा निर्णय! ‘असा’ करा अर्ज..

0

Sarkari Yojana: भारतात तब्बल १०.७ कोटी कुटुंब शेती या व्यवसायावर अवलंबून असल्याचं नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजेच (NABARD) नाबार्डने जारी केलेल्या माहितीत समोर आलं आहे. म्हणजेच ही संख्या देशातील एकूण कुटुंबांपैकी 48 टक्के आहे. याचा अर्थ देशातील 50 टक्‍क्‍यांहून अधिक लोकं शेतीवर अवलंबून आहेत. देशातील बहुसंख्य लोकं ही शेतीवर अवलंबून असल्याने, शेतकऱ्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहामधून कदापीही दूर करता येणार नाही. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकार देखील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असतं. त्यातलीच एक योजना म्हणजे पीएम (PM kisan) किसान योजना आहे.

आता या योजनेतील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने आणखी एक योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून, पीएम किसान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना तसेच ज्या शेतकऱ्यांची जमीन 2 हेक्टर पेक्षा कमी आहे, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने 60 वर्षावरील शेतकऱ्यांना आता पेन्शन राबवण्याचा निर्णय घेतला असून, वरील संबंधित शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि वृद्धकाळात शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीस हातभार लागून त्याचे रक्षण व्हावे, यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. खरं तर ही योजना 2019 ला सुरू करण्यात आली आहे. मात्र या योजनेचे आता नव्याने महत्त्व पटवून देण्यात येत आहे.

काय आहे योजनेचे स्वरूप

पीएम किसान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना तसेच दोन हेक्‍टरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 60 वर्षांनंतर दरमहा तीन हजार रुपये किंवा वार्षिक छत्तीस हजार रुपये पेन्शन केंद्र सरकारकडून दिली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना दर महिना ५५ रुपये साठ वर्षांपर्यंत भरावे लागणार आहेत. ज्या शेतकऱ्यांचे वय वर्ष अठरा आहे, अशा शेतकऱ्यांनी 18 वर्षांपासून साठ वर्षापर्यंत 55 रुपये भरायचे आहेत. तर ज्या शेतकऱ्यांचे वय 40 आहे, अशा शेतकऱ्यांनी साठ वर्षापर्यंत म्हणजेच वीस वर्ष २०० रुपये दरमहा भरणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी साठ वर्षापर्यंत 55 आणि दोनशे रुपये भरल्यानंतर साठ वर्षानंतर या शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन दिली जाणार आहे. शेतकऱ्यांचा जर मृत्यू झाला तर, या शेतकऱ्याच्या जोडीदाराला 50 टक्के पेन्शन मिळणार आहे. म्हणजेच दीड हजार रुपये प्रति महिना पेन्शन केंद्र सरकारकडून मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही योजना एक वरदान ठरत असून, वृद्धापकाळात शेतकऱ्यांचे जीवनमान व्यवस्थित चालावे, यासाठी ही योजना खूप उपयोगी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता आपण या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत, आणि या योजनेच्या अटी काय आहेत? हे सविस्तर जाणून घेऊ.

या आहेत अटी

सरकारने सुरू केलेल्या पीएम किसान मानधन (PM kisan mandhan YOJANA) योजनेच्या पात्रतेविषयी बोलायचं झाल्यास, जे शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, तसेच ज्या शेतकऱ्यांना दोन हेक्‍टरपेक्षा कमी लागवड क्षेत्र आहे, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मात्र या शेतकऱ्यांना 55 रुपये आणि दोनशे रुपये प्रति महिना भरणे देखील बंधनकारक आहे. त्यांचं वय 18 आहे अशा शेतकऱ्यांनी 55 रुपये तर ज्यांचे वय 40 आहे अशा शेतकऱ्यांनी प्रती महिना दोनशे रुपये भरणे आवश्यक आहे.

कसं करणार रजिस्ट्रेशन

आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी रजिस्टेशन कसं करायचं? या संदर्भात सविस्तर माहिती घेऊया. पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्रात म्हणजेच कॉमन सर्विस सेंटरला भेट द्यावी लागणार आहे. या ठिकाणी तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लागणारी सर्व कागदपत्रे सांगितले जातील. तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला, सातबारा उतारा या योजनेचा लाभ घेण्यासाठी सादर करावा लागणार आहे. तसेच तुम्हाला बँक खात्यासंबंधीची देखील सर्व माहिती या ठिकाणी द्यावी लागणार आहे. कॉमन सर्विस सेंटरला तुम्ही अर्ज केल्यानंतर, आधारकार्ड लिंक करून तुम्हाला पेन्शन खाते क्रमांक दिला जाणार आहे.

हे देखील वाचा Wheat growers farmer: गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर उठले मोदी सरकार; आता गहू कवडीमोल भावाने विकला जाणार हे आहे कारण..

Second hand car: Maruti Suzuki, सह नामांकित कंपन्यांच्या सेकंड हॅन्ड कार मिळतायत टू-व्हीलर पेक्षाही कमी किंमतीत; जाणून घ्या कुठे सुरू आहे सेल..

PM kisan Update: मोठी बातमी! अकरावा हप्ता आलेल्या लाभार्थ्यांची यादी केंद्र सरकारकडून जाहीर; अशी चेक करा यादी..

Ration Card: आता या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद! सरकारचा महत्वपूर्ण निर्णय 

SAUR KRUSHI PUMP YOJANA: सौर कृषी पंपासाठी राज्य सरकारकडून आता ९५ टक्के अनुदान; असा करा अर्ज..

Smam Scheme: स्माम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अवजारे घेण्यासाठी मिळतेय तब्बल 80 टक्के अनुदान; असा घ्या लाभ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.