Smam Scheme: ‘स्माम’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अवजारे घेण्यासाठी मिळतेय तब्बल 80 टक्के अनुदान; ‘असा’ घ्या लाभ..

0

Smam Scheme: सुरुवातीला कोरोणाचा खूप मोठा फटका इतर क्षेत्राबरोबर शेतकऱ्यांला देखील बसला. कोरोणानंतर आता महागाईचा फटका देखील शेतकऱ्यांना बसत असून, शेतकऱ्यांना शेती करणं परवडत नसल्याचं चित्र आहे. शेतीच्या मशागती पासून पीक काढणीला येईपर्यंत शेतकऱ्यांना खूप मोठा उत्पादन खर्च येत आहे. अनेक बी- बियाणांच्या, कीटकनाशकांच्या किंमती गगनाला भिडल्या असल्याने, शेतकरी अलीकडच्या काळात चिंतेत असल्याचे दिसून येतं. मात्र आता शेतकऱ्यांना थोडाफार हातभार लागावा म्हणून केंद्र सरकारने, ‘स्माम’ योजना (Smam Scheme) सुरू केली आहे.

आपण पाहतो, शेती करायची म्हटलं तर, शेतीची मशागत उत्तमरित्या होणं गरजेच असतं. यासाठी कृषी अवजारं शेतकऱ्यांजवळ असणं आवश्यक असतं. मात्र अनेकांना प्रचंड महाग असणारी कृषी अवजारे घेणे परवडत नाही. आणि मग शेतकरी मशागतीमध्ये तडजोड करतो. मात्र आता केंद्र सरकार शेतकऱ्यांना कृषी अवजारे खरेदी करण्यासाठी तब्बल 80 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान देणार आहे. केंद्र सरकारने यासाठी ‘स्माम’ (Smam Scheme) ही जोजना सुरू केली आहे.

तसं पाहायला गेलं तर, ही योजना जूनीच आहे, मात्र याविषयी अनेकांना माहिती नाही, आणि म्हणून या योजनेविषयी नव्याने आपल्याला माहिती मिळावी यासाठी आम्ही सविस्तर माहिती घेऊन आलो आहोत. केंद्र सरकार ‘स्माम’ (Smam Scheme) या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असणारी अवजारे खरेदी करण्यासाठी ५० ते ८० टक्के अनुदान देत आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त आपल्या नावावर सातबारा असणे गरजेचे आहे. जर शेतकऱ्यांच्या नावावर सातबारा असेल, तर तुम्हाला शेती करण्यासाठीची जी उपकरणे आवश्यक आहेत, ती 80 टक्के पर्यंतच्या अनुदानात खरेदी करता येणार आहेत. यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. याविषयी देखील आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत. तसेच यासाठी कोण-कोणती कागदपत्रे लागणार आहेत, याविषयी देखील आपण जाणून घेऊया. 

लाभ घेण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक

स्माम’ (Smam Scheme) या योजनेचा लाभ घेण्याकरिता सातबाऱ्यावर नाव असणं आवश्यक आहे. सोबतच ज्यांच्या नावावर सातबारा आहे, त्याचे आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, ८-अ तसेच बँक पासबूक, का स्ट सर्टिफिकेट पासपोर्ट साईजचे फोटो, इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. आता आपण या संदर्भात ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे पाहूया..

असा’ करा अॉनलाईन अर्ज 

‘स्माम’ या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना सर्व प्रथम आपल्या मोबाईलच्या क्रोमवर जाऊन https://agrimachinery.nic.in/ असं सर्च करायचं आहे. तुम्ही असं सर्च केल्यानंतर, तुमच्यासमोर या संदर्भातली केंद्र सरकारची अधिकृत वेबसाईट ओपन झालेली दिसेल.

केंद्र सरकारची ही अधिकृत वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर, Registration हा पर्याय दिसेल. यामध्ये तुम्ही ‘Farmer’ हा पर्याय निवडायचा आहे. ‘Farmer’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन झालेलं दिसेल.

Farmer या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमच्यासोबत जे नवीन पेज ओपन झालेलं आहे, त्यावर तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी करताना यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. यानंतर तुम्हाला समोर दिसत असणारी माहिती व्यवस्थित भरावी लागणार आहे. सविस्तर माहिती भरून झाल्यानंतर शेवटी तुम्हाला, ‘Submit’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची प्रक्रिया पूर्ण होईल.

हे देखील वाचा KCC: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना आता ग्रामपंचायतमध्येच मिळणार किसान क्रेडिट कार्ड; जाणून घ्या सविस्तर..

PM kisan: पीएम किसान योजनेच्या अकराव्या हप्त्यात मोठा बदल; फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार अकरावा हप्ता..

Emergency Led Bulb: लाईट गेली तरी चालूच राहतिल हे एलईडी बल तब्बल ;एवढ्ये तास; ॲमेझॉनवर सेल सुरू..

HPCL Recruitment 2022: डिप्लोमा आणि पदवीधर विद्यार्थ्यांना HPCL मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी! जाणून घ्या डिटेल्स..

Bank of India Recruitment 2022: बँक ऑफ इंडियात निघाली मेगा भरती; या पदांसाठी असा; करा अर्ज..

Viral video: ह ल्ला करणाऱ्या सापाशी उंदराने केले दोन हात; थरारक झुंजीत सापाने टाकली नांगी! विश्वास नाही बसत? पहा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.