MHA CEPI Recruitment 2022: गृह मंत्रालयात विविध पदांसाठी निघाली मेगा भरती! इच्छुक आणि पात्र उमेदवारांना असा करता येणार अर्ज..

0

MHA CEPI Recruitment 2022: सरकारी नोकरी मिळवणं हे अनेकांचे स्वप्न असतं. त्यात मंत्रालयात नोकरी मिळवली म्हणजे, खूप मोठी मजल मारली असं समजलं जातं. जर तुम्ही उच्च शिक्षीत असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी गृहमंत्रालयात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार CEPI मध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आलं आहे. तुम्हीही जर CEPI मध्ये नोकरी करु इच्छित असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. Lifestyle: दररोज से क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर.

उच्च शिक्षण घेऊन देखील सरकारी नोकरी मिळणे अलीकडच्या काळात खूप कठीण झालं आहे. बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळेलच असं नाही. उच्च शिक्षण घेऊन गुणवत्ता सिद्ध करून देखील अनेकांना बेरोजगार म्हणून जगावं लागतं. हे कोणालाही वेगळे सांगण्याची गरज नाही. आता महागाई देखील वाढत चालली असल्याने, चार पैशाची नोकरी मिळवणं आता फार आवश्यक बनलं आहे. अनेकदा नोकरीच्या संधी उपलब्ध आहे, की नाही हे देखील माहित पडत नाही. म्हणून आम्ही तुम्हाला या संदर्भात सविस्तर माहिती देणार आहोत.

या ठिकाणी केली जाणार भरती

गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, CEPI मध्ये करण्यात येणारी भरती ही नवी दिल्ली येथील मुख्यालय मुंबई, कोलकत्ता, आणि लखनऊ या ठिकाणी केली जाणार आहे. जर तुम्ही या शहरात नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल, तर तुम्हाला अधिसूचना पाहून अर्ज करणे आवश्यक आहे. या भरती संदर्भात आम्ही तुम्हाला आता सविस्तर माहिती सांगणार आहोत.

या पदांसाठी केली जाणार भरती

गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, CEPI मध्ये करण्यात येणाऱ्या भरतीसाठी एकूण 42 पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती तीन वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. उमेदवारांनी केलेल्या परफॉर्मन्सवर एक वर्ष अतिरिक्त वाढवून देखील दिलं जाणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. प्रशासन अधिकारी, मुख्य पर्यवेक्षक, पर्यवेक्षक सल्लागार, आणि सर्वेक्षण कायदा अधिकारी अशी रिक्त पदे या भरतीसाठी भरण्यात येणार आहेत. आता आपण या भरतीसाठी अर्ज कसा करायचा? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

असा करा ऑनलाइन अर्ज

गृहमंत्रालयाकडून CEPI साठी भरण्यात येणाऱ्या विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना, mha.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन तुम्ही mha.gov.in असं सर्च करायचं आहे. क्रोमवर जाऊन तुम्ही असं सर्च केल्यानंतर, CEPI हा पर्याय पाहून तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे. याशिवाय तुम्ही यावर क्लिक करून भरती संदर्भातला फॉर्म डाऊनलोड करू शकता.

डाऊनलोड केलेला फॉर्म तुम्ही व्यवस्थित भरल्यानंतर, हा फॉर्म तुम्ही स्कॅन करा. स्कॅन केलेला फॉर्म तुम्ही ई-मेलशी संलग्न करून cepi.del@mha.gov.in या ईमेल आयडी पत्त्यावर पाठवायचा आहे. याशिवाय उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने देखील आपला अर्ज सबमिट करता येणार आहे. अधिसूचनेवर नमूद केलेल्या पत्त्यावर 24 जून पर्यंत पाच वाजेपर्यंत तुम्हाला भरलेला फॉर्म सबमिट करता येणार आहे. अधिसूचना पाहण्यासाठी यावर क्लिक करा अधिसूचना पाहण्यासाठी यावर क्लिक करा..

पात्रता आणि वयोमर्यादा

या भरतीसाठी पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवारांचे वय ६२ वर्षांपेक्षा जास्त नसणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कायदा अधिकारी या पदासाठी कायद्यातील पाच वर्षाच्या पदवीचा अनुभव असणे आवश्यक आहे.

त्याचबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, या पदासाठी सरकारी सेवानिवृत्त कर्मचारी असणे आवश्यक आहे.

मुख्य सल्लागार या पदासाठी उमेदवार हा सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी असणे आवश्यक आहे.

त्याचबरोबर पर्यवेक्षक सल्लागार या पदासाठी उमेदवाराची एमबीए तसेच बीबीए पदवीधर असला पाहिजे. तसेच हिंदी आणि इंग्रजीचे उत्तम ज्ञान देखील असणे आवश्यक आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, उमेदवाराला बारावीमध्ये कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून गणित या विषयांत साठ टक्क्यांहून अधिक गुण असणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा Mahaforest Recruitment 2022: महाराष्ट्र वन विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी! मासिक वेतन ४० हजार.. 

10th result 2022: ठरलं! दहावीचा निकाल लागणार या तारखेला; या पद्धतीने पाहता येणार निकाल.. 

व्हायग्रा पुरुषांच्या लैंगिकतेवर अस करत काम; अतिसेवन झाल्यास होतात हे गंभीर दुष्परिणाम..

effects of lack of sex: शारीरिक संबंधांमध्ये अधिक अंतर पडल्यास, तुमच्या आरोग्यावर होतात हे सहा गंभीर परिणाम..

Viral video: बाप-लेकीचा आणि बहीण-भावाचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही रोखू शकणार नाही अश्रू; मुलगी असावी तर अशी..

Lifestyle: महिलांच्या या भागांवर केस असतील तर मानले जाते शुभ नवराही समजला जातो भाग्यवान..

youtube income: या नियमात राहून YouTube वर हे व्हिडिओ अपलोड केल्यास मिळतील लाखों रुपये..

Flipkart End of Season Sale: Flipkart चा धूमधडाका! हे स्मार्टफोन खरेदी करता येणार निम्म्या किंमतीत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.