UPI Pin Change: ‘या’ सोप्या पद्धतीने बदला UPI पिन, आणि भविष्यातील धोक्यापासून स्वतःला वाचवा..

UPI Pin Change: तंत्रज्ञानाच्या या जमान्यात अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्या आहेत. मात्र तंत्रज्ञानाच्या या जमान्यात अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्या असल्या तरी याचा वापर करताना आपल्याला अधिक काळजी देखील घेणे आवश्यक आहे. अन्यथा क्षणात सगळं होत्याचे नव्हतं होवून बसू शकतं. UPI मुळे आपण देशात कुठेही कधीही सहज ऑनलाईन पैसे पाठवू शकतो. पूर्वी पैसे पाठवण्यासाठी बँकेत जावे लागत होते. एवढंच नाही, तर पाठवलेले पैसे काढण्यासाठी देखील बँकेतच जावे लागत होते. मात्र आता हा त्रास कमी झाला आहे. आता किरकोळ पैशाची आवश्यकता असेल, तर आपल्याला बँकेत जाण्याची आवश्यकता नाही.  हातावर या रेषा असतील तर वैवाहिक जीवनात येतात खूप अडचणी..

UPI मुळे आता आपण कोणालाही कुठेही कधीही पैसे पाठवू शकतो. या शिवाय कुठल्याही दुकानातून आपण ऑनलाईन पैसे पाठवून हवं ते सामान देखील खरेदी करू शकतो. एकही रुपया जवळ नसला, तरी देखील आपण किराणा वस्तू, कपडे सहज खरेदी करू शकतो. आपण या महत्वपूर्ण सुविधांचा लाभ सहज घेत असलो तरी याची खबरदारी घेणे देखील महत्वाचे आहे. काही ठराविक कालावधीनंतर तुम्ही तुमचा UPI पिन बदलणे आवश्यक आहे. काही काळानंतर UPI बदलणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. यामुळे भविष्यातील धोक्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. जर तुम्ही देखील तुमचा UPI पिन बदलू इच्छित असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. सर्वप्रथम आपण ‘UPI’ म्हणजे काय याविषयी सविस्तर जाणून घेऊया.  या पाच कारणांमुळे मुलं साडी नेसलेल्या मुलींकडे होतात आकर्षित: कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित..

UPI म्हणजे काय

UPI या तीन अक्षरांचा लाँग फॉर्म आहे, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस. ही सुविधा NPCI यांनी विकसित केली आहे. NPCI याविषयी अधिक सांगायचं झालं तर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असं या आंतर-बँक व्यवहारांकरता तयार केलेल्या सिस्टीमचे नाव आहे. UPI पेमेंट हे अगदी सुरक्षित आहे. कारण हे RBI म्हणजेच, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियंत्रित केले आहे. महिलांमध्ये हे पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..

UPI मार्फत तुम्ही एक रुपया पासून एक लाखांपर्यंत पेमेंट करू शकता. विशेष म्हणजे, हे पेमेंट तुम्ही चुटकीसरशी करू शकता. याबरोबरच तुम्ही चोवीस तास कधीही पेमेंट ट्रान्स्फर करू शकता. तुम्ही ज्यांना पेमेंट पाठवले आहे, तो ग्राहक देखील आलेल्या पेमेंटचा लगेच उपभोग घेऊ शकतो. आता आपण UPI पिन कसा बदलायचा याविषयी सविस्तर जाणून घेऊ…

या सोप्या पद्धतीने बदला UPI पिन

तुम्ही जे ऑनलाईन पेमेंट ॲप वापरून UPI पेमेंट करत असाल, ते ॲप तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाइलमधे उघडायचं आहे. अनेकजण Google Pay या UPI पेमेंट ॲपचा वापर करताना पाहायला मिळतात. साहजिकच आपण याविषयी माहिती घेऊया. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये असणारे Google Pay ॲप ओपन करायचे आहे. हे ॲप ओपन केल्यानंतर, तुम्हाला डाव्या बाजूला जे ‘प्रोफाइल आयकॉन’ आहे त्यावर क्लिक करायचं आहे.

प्रोफाइल आयकॉनवर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला ‘पेमेंट मेथड’ हा पर्याय पाहायला मिळेल, तुम्हाला बरोबर यावर क्लिक करायचं आहे. ‘पेमेंट मेथड’ पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला उजव्या बाजूला तीन टिपके पाहायला मिळतील. तुम्हाला बरोबर यावर क्लिक करायचं आहे. तीन टिपक्यावर क्लिक केल्यानंतर, तुमच्यासमोर एक सूची उघडेल. या सुचीमध्ये तुम्हाला ‘UPI change’ हा पर्याय पाहायला मिळेल. तुम्हाला यावर क्लिक करायचे आहे.

‘UPI change या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला दोन मोकळ्या जागा पाहायला मिळतील. यातील तुम्हाला एका जागेत तुमचा सध्याचा UPI पिन टाकायचा आहे. तर दुसऱ्या जागेत नवीन UPI पिन टाकायचा आहे. दुसऱ्या रकान्यात तुम्ही नवीन पिन टाकल्यानंतर आणखी एकदा तुम्हाला नवीन पिन टाकायचा आहे. नवीन पिन टाकून झाल्यानंतर, खाली ‘ok’ या पर्यायावर क्लिक करा. ‘Ok’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमचा नवीन UPI यशस्वीरित्या सक्सेसफुल होईल.

हे देखील वाचा  लहानपणीच मुलांना ‘या’ पाच गोष्टी शिकवल्यास, मुलं पोहोचतील यशाच्या शिखरावर..

तळहातावर ही खूण असेल, तर तुमच्या नशिबात आहे भरपूर पैसा..

जाणून घ्या भिजवलेले बदाम खाण्याचे आठ आश्चर्यकारक फायदे..

Aadhar card: आधारकार्डला देखील असते एक्सपायरी डेट; या सोप्या पद्धतीने जाणून घ्या डिटेल्स..

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.