Police Bharti Update: पोलीस भरती प्रक्रियेत होणार मोठा बदल? शिंदे सरकारचा पोलीस भरती करणाऱ्या पोरांना दणका..

Police Bharti Update: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात न भूतो न भविष्यति असे, उलटभर पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर, महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या अनेक प्रोजेक्टला स्थगिती दिली. शिंदे सरकार (Shinde Sarkar)आता पोलिस भरतीच्या नियमात देखील बदल करण्याच्या तयारीत आहे. मंत्रीमंडळ विस्तारानंतर, पोलिस भरती संदर्भात मोठा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्याकडे गृहमंत्री पद देण्यात येणार असून, महाविकास आघाडी सरकारने घेतलेला पोलिस भरती संदर्भातला निर्णय रद्द करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दहावी पास उमेदवारांना भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी..

ग्रामीण भागातील मुलांना पोलिस भरतीत (police Bharti) प्राधान्य मिळावे, यासाठी तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील (R R Patil) यांनी नियमात बदल करून पहिल्यांदा लेखी ऐवजी मैदानी चाचणी घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. आर-आर पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील हजारो मुलं पोलीस होऊ शकली. मात्र 2014 ला भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर, या नियमात पुन्हा बदल करण्यात आला, आणि पहिल्यांदा मैदानी चाचणी ऐवजी लेखी चाचणी घेण्यात आली. या विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना केली जाणार निवड..

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय ग्रामीण भागातील तरुणांना अन्यायकारक वाटला. मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर, पुन्हा या नियमात बदल करण्यात आला. आणि पुन्हा एकदा पहिल्यांदा लेखी ऐवजी मैदानी चाचणी घेण्याचा दृष्टिकोनातून पाऊले टाकण्यात आली. ग्रामीण भागातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही म्हत्वाची बातमी होती. मात्र आता पुन्हा एकदा या नियमाने डोकं वर काढले आहे. या पाच कारणांमुळे मुलं साडी नेसलेल्या मुलींकडे होतात आकर्षित: कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित..

खेडेगावात घरच्यांना मदत करत पोलीस भरती करणाऱ्या तरुणांची मोठी संख्या असल्याचे पाहायला मिळते. साहजिकच यामुळे तरुणांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. मैदानी चाचणीची तयारी करण्यासाठी खेडेगावात पोषक वातावरणही असत. आणि म्हणून या मुलांची मैदानी चाचणी उत्तम असते. साहजिकच यामुळे पहिल्यांदा मैदानी चाचणी हा या मुलांसाठी मोठा आशेचा किरण होता. महिलांमध्ये हे पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..

मात्र महाविकास आघाडी सरकार जुलै-ऑगस्टमध्ये पहिल्या टप्प्यात ज्या 7231 पदांची भरती करण्यात येणार होती, त्या भरती प्रक्रियेत आता मोठा बदल करण्याच्या तयारीत शिंदे सरकार असल्याचे बोलले जात आहे. पहिल्यांदा मैदानी चाचणी ऐवजी आता शिंदे सरकार पहिल्यांदा लेखी चाचणी घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. एवढच नाही, तर पहिल्या टप्प्यात 7231 पदांची भरती केली जाणार का? याविषयी देखील शंका असल्याचे बोललं जात आहे.  मूल होत नसेल तर महिलांना दोष देणं चूकीचे; पुरुषांमध्येच असतात हे प्रॉब्लेम; जाणून घ्या समस्या, लक्षणे, उपाय..

महाराष्ट्र गृह विभागात पाठीमागच्या दोन वर्षांपासून कोणतीही नवीन पोलीस भरती झालेली नाही. 2019 मध्ये घोषित करण्यात आलेली पाच हजारांची भरती तब्बल दीड वर्ष चालली. मात्र या भरतीत अनेक घोटाळे देखील उघडकीस आले. 2020 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या पोलीस भरतीला 2022 उलटलं, तरी देखील मुहूर्त सापडला नव्हता. व्हायग्रा पुरुषांच्या लैंगिकतेवर असं करत काम; अतिसेवन झाल्यास होतात हे गंभीर दुष्परिणाम..

मात्र महाविकास आघाडी सरकार जूलै ऑगस्टमध्ये पहिल्या टप्प्यात 7231 पदांसाठी भरती घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती. या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण देखील झाली होती. मात्र तेवढ्यात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं राजकीय नाट्य घडलं आणि महाविकास आघाडी सरकार पडले. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर, आता पोलिस भरती करणाऱ्या तरूणांमध्ये देखील संभ्रमता असल्याचे पाहायला मिळत आहे.  हातावर या रेषा असतील तर वैवाहिक जीवनात येतात खूप अडचणी..

भरती प्रक्रियेच्या नियमात बदल

२०१४ ला सत्तेवर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा लेखी परीक्षा घेत पोलिस भरती संदर्भातला नियम बदलला. मात्र महाविकास आघाडी सरकारने पुन्हा या नियमात बदल करत पुन्हा पहिल्यांदा मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यामध्ये पहिल्यांदा गोळाफेक, लांबउडी, पुलअप्स त्याचबरोबर १०० मीटर धावणे, असं या मैदानी चाचणीचे स्वरूप होतं. मात्र आता या नियमात बदल करून पहिल्यांदा लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.

हे देखील वाचा 

USSD Code: हा कोड वापरून मोबाईल नंबर ट्रॅक झाला आहे, की नाही हे चेक करा; हरवलेला मोबाइल देखील करू शकता ट्रॅक..

किस आरोग्यासाठी रामबाण उपाय; किस करण्याचे हे आहेत १० आश्चर्यकारक फायदे..

हाडे कमकुवत होण्याची ही आहेत धक्कादायक 9 कारणे; मजबूत हाडांसाठी या पदार्थांचे सेवन करा..

Belly Fat : खरंच उभं राहून पाणी पिल्यामुळे पोटाची चरबी वाढतेय का? लगेच जाणून घ्या नाहीतर..

Today Steel Rate: घर बांधणाऱ्यांसाठी गोड बातमी, स्टील सिमेंट झाले स्वस्त; जाणून घ्या आजचे दर..

Vastu Tips: चुकूनही घराजवळ लावू नका ही चार झाडे, अन्यथा होईल सत्यानाश..

Viral video: वाघाच्या तीन बछड्यांना माकडाने दूध पाजून सांभाळलं, पण बछड्यांनी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.