Today Steel Rate: घर बांधणाऱ्यांसाठी गोड बातमी, स्टील सिमेंट झाले स्वस्त; जाणून घ्या आजचे दर..

Today Steel Rate: आपलं स्वतःचं घर असावं अशी इच्छा सर्वसामान्यापासून ते श्रीमंतापर्यंत प्रत्येकाची असते. घरासाठी बऱ्याच लोकांनी स्वप्न पाहिलेले असते. बरेचदा आपली इच्छा असून देखील आपल्याला हवं तसं घर बांधता येत नाही. मध्यंतरी आलेल्या कोरोना महामारी पासून बांधकाम साहित्यामध्ये प्रचंड वाढ पाहायला मिळाली. त्यामुळे बऱ्याच लोकांचे घर बांधण्याचे स्वप्न साकार झाले नाही. स्टीलच्या दरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळाली. सिमेंटचे दर देखील वाढलेले पाहायला मिळाले. यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. घरासाठी बऱ्याच लोकांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. सर्वसामान्य लोकांची आयुष्यभर साठवलेली रक्कम घरासाठी खर्च होत असते.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने बऱ्यापैकी सर्वत्र पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. जून महिन्यात हवा तसा प्रतिसाद पावसाकडून मिळाला नाही. परंतु जुलै मध्ये पावसाने चांगल्या प्रकारे हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. पावसाचा परिणाम घरांच्या बांधकामांवर होत असतो. साधारण जून ते सप्टेंबर या काळात  बांधकाम क्षेत्रातील कामे मंद गतीने चालू असतात. घरासाठी लागणारी अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे वाळू. वाळूचा तुटवडा पावसाळ्यात होत असतो. कारण पावसामुळे ओढ्याला, नदीला मुबलक पाणी वाहत असते. त्यामुळे वाळू काढणे अवघड होऊन जाते. सध्याच्या काळात बांधकामासाठी कचीचा वापर होत आहे. परंतु अजून देखील लोकांचा वाळूकडे कल असल्याचे पाहायला मिळते.

घरांच्या बांधकामासाठी लागणारे साहित्याचे दर मार्च व  एप्रिल या दोन महिन्यात प्रचंड वाढलेले पाहायला मिळत होते. जून मध्ये संपूर्ण देशभरात सळईचा भाव  प्रति टन 4500 रुपये एवढा महागला होता. त्यानंतरच्या काळात मात्र मोठ्या प्रमाणात स्टीलचे भाव घसरले. दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या स्टीलच्या भावाला आवाक्यात ठेवण्यासाठी शासनाने देखील प्रयत्न केले. स्टीलसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावर आयात शुल्क कमी केले व काही घटकांवर निर्यात शुल्क वाढवल्याने देशांतर्गत स्टीलचे दर आवाक्यात आल्याचे पाहायला मिळाले. सध्या सिमेंट देखील स्वस्त झाले आहे. परंतु येणाऱ्या काळात स्टील, सिमेंटच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुमच्या घराचे बांधकाम चालू असेल तर स्टील तुम्ही घेऊन ठेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला आर्थिक फटका बसणार नाही.

मार्च 2022 मध्ये देशातील काही भागात सळईच्या किंमती 85 हजार रुपये प्रति टनापर्यंत गेल्या होत्या.  सध्या देशातील विविध भागात स्टीलच्या सळईचा दर 49 हजार ते 59 हजार रुपयांपर्यंत घसरला आहे. यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला स्टीलच्या भावात कमालीची घसरण झालेली पाहायला मिळाली. जूनमध्ये स्टीलचे भाव 44 हजार रुपये प्रति टन झाले. त्यामुळे घर बांधकाम करणाऱ्या लोकांना चांगलाच दिलासा मिळाला होता. परंतु सध्या देशातील बऱ्याच भागात स्टीलच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. स्टीलचे भाव प्रति टन 1100 ते 4500 रुपयांनी वाढलेले पाहायला मिळत आहे.

आपल्या राज्याचा विचार केल्यास मुंबई मध्ये स्टीलचे दर जूनमध्ये 55 हजार 200 रुपये एवढा होता. जुलै महिन्यात त्यामध्ये घट होऊन 54 हजार 800 रुपयांवर आला. म्हणजे दरात 400 रुपयांची घट झाली. नागपूरमध्ये स्टीलचा भाव हा जून महिन्यात 51 हजार रुपये प्रति टन होता. जुलै महिन्यात 54 हजार 200 रुपये रुपये प्रति टन झाला आहे. म्हणजेच 3200 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. जालना शहरात स्टीलचे दर जून मध्ये प्रति टन 54 हजार रुपये होते. हेच दर जुलै महिन्यात 1100 रुपयांनी वाढून 55 हजार 100 रुपये प्रति टन झाले.

महत्वाच्या बातम्या: India Post Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांना भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी.. 

healthy food: जाणून घ्या भिजवलेले बदाम खाण्याचे आठ आश्चर्यकारक फायदे.. 

Lifestyle: दररोज से’क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर..

Healthy Food For Kidney: यामुळे किडनीच्या समस्या उद्भवतात; या पदार्थाचे सेवन केलयास किडनीच्या समस्या होतात दूर.. 

Palmistry: तळहातावर ही खूण असेल, तर तुमच्या नशिबात आहे भरपूर पैसा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.