Vastu Tips: चुकूनही घराजवळ लावू नका ‘ही’ चार झाडे, अन्यथा होईल सत्यानाश..

Vastu Tips: आपलं घर हे परिपूर्ण असावं, असं प्रत्येकाला वाटत असतं. आयुष्यात एक उत्कृष्ट घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. साहजिकच यामुळे अनेक जण घर कसं असावं, त्याची दिशा कोणत्या बाजूला असावी? अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करूनच घर बांधतात. घराच्या दिशेबरोबरच घराच्या जवळ झाडे लावण्याचा सल्ला देखील अनेकांकडून दिला जातो. घराभवती झाडे असतील, तर घर अधिक उठून दिसतं. आणि म्हणून अनेकजण घर बांधायला करतानाच अनेकजण घराच्या अवतीभवती झाडे लावतात. घराच्या अवतीभवती झाडे असल्यानंतर, घर अधिक सुंदर दिसतं. हे जरी खरं असलं तरी, घराच्या जवळ कोणकोणती झाडे नसावी, याविषयी देखील वास्तुशास्त्रात माहिती देण्यात आली आहे.

घराच्या अवतीभवती झाड असल्याने घर अधिक सुंदर हिरवंगार राहतं. घराच्या भोवती झाडे असल्याने घरातील वातावरण देखील नेहमीच करात्मक राहतं. याविषयी देखील अधिक सांगण्याची आवश्यकता नाही. याविषयी वास्तुशास्त्रात देखील सांगण्यात आले आहे. घराभोवती अनेक झाडे असतील, तर घरात नेहमी आनंदाचे वातावरण आणि ऊर्जा राहते. मात्र प्रत्येक झाडापासून सकारात्मक ऊर्जा मिळतेच असं नाही. काही झाडांमुळे घरात दुःख आणि नकारात्मकता देखील पसरू शकते. एवढेच नाही तर गरिबी देखील येऊ शकते. याविषयी वास्तुशास्त्रात सविस्तर माहिती सांगण्यात आली आहे. आज आपण अशा चार झाडांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

प्लम ट्री (Plum Tree)- घराजवळ कोणतीही काटेरी झाडं नसावीत, असं तुमचे पूर्वज अनेकदा म्हणल्याचं तुम्ही ऐकलंही असेल. वास्तुशास्त्रात सांगितल्यानुसार, तुमच्या घरात जर आनंदी वातावरण हवं असेल, तुम्ही अनेक प्रकारची झाडे लावा. मात्र प्लम ट्री कधीही लावू नका. प्लम ट्री लावल्याने तुमच्या घरातील आनंदाच्या वातावरणात बाधा येऊ शकते. Plum Tree या झाडाला काटे असतात. घराच्या जवळ काटेरी झाडे लावल्याने घरातील सदस्यांच्या आयुष्यात अडथळा येण्यास सुरुवात होते. असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. सहाजिकच यामुळे घराजवळ प्लम ट्री लावणे तुमच्यासाठी धोकादायक आहे.

निवडूंग लावणं टाळा- निवडुंगाच्या झाडांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात काटे असतात, हे आपल्याला माहिती आहे. वास्तुशास्त्रात निवडुंगाचे झाड देखील घराजवळ असेल, तर ते घरासाठी धोकादायक मानलं जातं. या झाडाला मोठ्या प्रमाणात काटे असल्याने, घरातील सदस्य जेव्हाही या झाडाकडे पाहतात, तेव्हा त्याला त्याच्या आयुष्यात देखील काटे दिसू लागतात‌. यामुळे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात निराश होतो, आणि त्याच्या अंगामध्ये नकारात्मकता निर्माण होते. निवडुंगाचे झाड घराजवळ लावल्यास कुटुंबामध्ये आर्थिक संकटाची देखील समस्या उद्भवू लागते. याबरोबरच परस्पर असणारे चांगले संबंध देखील बिघडण्यास सुरुवात होते.

लिंबाचं झाड- लिंबू हे आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे अनेकांना माहिती आहे. लिंबू हे अनेक समस्यांवर रामबाण उपाय असल्याचं बोललं जातं. प्रत्येकाच्या घरात बाराही महिने लिंबू असल्याचं आपण पाहतो. अनेकांना स्वतःच्या आहारामध्ये लिंबू नसेल, तर त्यांना जेवण देखील जात नसल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं देखील असेल. मात्र वास्तुशास्त्रात घराजवळ लिंबू कधीही लावू नये, असं सांगण्यात आलन आहे. कारण लिंबू हे चवीला आंबट असते, आणि लिंबाच्या चवीप्रमाणेच घरातील सदस्यांच्या आयुष्यावर देखील परिणाम होतो. घरातील सदस्यांच्या आयुष्यात गोडवा न येता कडूपणा निर्माण होतो. आणि म्हणून लिंबाचे झाड घराजवळ नसावं, असं वास्तुशास्त्र सांगण्यात आलं आहे.

आवळ्याचं झाडं- लिंबा प्रमाणेच आवळा देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये व्हिटामिन सी हे जिवन सत्व आढळते. डॉक्टर देखील आवळा नियमित खाण्याचा सल्ला देत असतात. आवळ्यामुळे पचनक्रिया सुधारते, याबरोबरच पोटाचे अनेक विकार नाहीसे देखील होण्यास आवळा मदत करतो. मात्र वास्तुशास्त्रामध्ये आवळ्याचं झाड घराजवळ लावू नये असे सांगण्यात आलं आहे. लिंबाप्रमाणे आवळा देखील खायला आंबट आणि तुरट असतो. सहाजिकच याच्या गुणधर्मप्रमाणे घरातील सदस्यांच्या आयुष्यात देखील आंबटपणा येतो. आणि म्हणून वास्तुशास्त्र आवळ्याचं झाड घराजवळ लावू नये, असं सांगण्यात आलं आहे. टीप– ही माहिती गृहीतके आणि प्राथमिक माहितीच्या आधारावर देण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकशाही याच्याशी सहमत असण्याचे कारण नाही.

हे देखील वाचा India Post Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांना भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी..

Viral video: वाघाच्या तीन बछड्यांना माकडाने दूध पाजून सांभाळलं, पण बछड्यांनी..

Today Steel Rate: घर बांधणाऱ्यांसाठी गोड बातमी, स्टील सिमेंट झाले स्वस्त; जाणून घ्या आजचे दर..

UPI Pin Change: या सोप्या पद्धतीने बदला UPI पिन, आणि भविष्यातील धोक्यापासून स्वतःला वाचवा..

Aadhar card: आधारकार्डला देखील असते एक्सपायरी डेट; या सोप्या पद्धतीने जाणून घ्या डिटेल्स..

Palmistry: तळहातावर ही खूण असेल, तर तुमच्या नशिबात आहे भरपूर पैसा..

Amazon Prime Day Sale 2022: अमेझॉनवर मान्सून ऑफरचा धुमधडाका! स्मार्टफोनसह या वस्तूंवर तब्बल ५५ टक्क्यांपर्यंत सूट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.