Viral video: वाघाच्या तीन बछड्यांना माकडाने दूध पाजून सांभाळलं, पण बछड्यांनी..

Viral video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे काही सांगता येत नाही. त्यातल्या त्यात प्राण्याचे व्हिडिओ असतील, तर मग बोलायलाच नको. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. प्राण्याच्या जीवनशैली विषयी अनेकांना जाणून घेण्याची उत्सुकता कायम असते. सोशल मीडियावर तुम्ही अनेकदा प्राणी एकमेकांची शिकार करताना पाहिले असेल. मात्र सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हीही चक्रावून जाल.

सिंह, वाघ, चित्ता, मगर, हे प्राणी किती हिंस्र आहेत, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. या प्राण्यांच्या चुकूनही कोणी नादी लागत नाही. या प्राण्यांच्या कोणी वाटेला गेला, तर त्याचा खेळ खल्लास झाला म्हणून समजा. या प्राण्याच्या जवळ कोणताही प्राणी जात नाही. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत एक माकड चक्क वाघांच्या बछड्यांना स्वतःच्या हाताने दूध पाजताना पाहायला मिळत आहे. एवढच नाही, तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत माकड वाघांच्या अनेक बछड्यांना ज्या प्रकारे खेळवत आहे, ज्या प्रेमाने आपल्या मिठीत घेत आहे, हे दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यावरचा विश्वास उडाला आहे.

सिंह, वाघ यांपासून जंगलातले प्राणी एकमेकांना वाचवत असल्याचं बोललं जातं. माकड हे हरीण तसेच इतरही काही प्राण्यांना वाघाच्या आणि सिंहाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी संकेत देत असतं. सोशल मीडियावर तुम्ही अनेकदा माकड सिंहाची मजा घेताना पाहिलं असेल. कधी-कधी सिंह देखील माकडाची शिकार करताना देखील तुम्ही पाहिलं असेल. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एक ‘चिपांझी माकड’ चक्क वाघाच्या तीन बछड्यांची आई झाल्याचं पाहायला मिळत आहे. खरंतर ही कल्पनेच्या बाहेरची गोष्ट आहे. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक चिपांझी माकड वाघांच्या तीन बछड्यांना स्वतःचे लेकरू असल्यासारखं सांभाळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

काय घडलं नेमकं 

मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत एका जंगलात एक चिपांझी माकड वाघांच्या तीन बछड्यांना सांभाळत असल्याचे पाहायला मिळत आहे. वाघाचे तीन बछडे देखील माकडानेच आपल्याला जन्म दिला असल्यासारखं, त्याच्या अंगावर उड्या मारतायत, माकडाचे तोंड चाटतायत. एवढंच नाही तर माकड देखील बाटलीने बछड्याला स्वतःच्या हाताने दूध पाजताना पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या हा व्हिडीओ इतका प्रेमळ आहे, की आतापर्यंत जवळपास तीन कोटी लोकांना हा व्हिडीओ पाहायला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ, आयएफएस ऑफीसर डॉ. सम्राट गोवडा यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, माणसांपेक्षाही जास्त प्राण्यांना भावना असतात, हे पुन्हा एकदा सिद्ध होतात पाहायला मिळत आहे. माणसांप्रमाणेच प्राणी देखील एकमेकांची मदत करतात. “लहान मुलं देवाघरची फुलं असतात” असं आपण नेहमी ऐकत आलो आहे. अनेकांना लहान मुलांविषयी प्रचंड प्रेम असतं, मग मुल कोणाचंही असो. माणसांप्रमाणेच हे माकड देखील वाघाच्या तीन अनाथ बछड्यांची आई झाल्याचे पहायला मिळत आहे.

काय म्हणाले नेटकरी  

सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल केला जात असून, अनेकांनी या व्हिडिओखाली भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडिओविषयी भावना व्यक्त करताना अनेकांनी म्हटले आहे, वाघ अतिशय धोकादायक प्राणी आहे. हे माहीत असताना देखील या माकडाने वाघाच्या बछड्यांना लावलेला जीव, केलेलं प्रेम, हे शब्दात व्यक्त करता येऊ शकतं नाही. आणखी एका नेटकऱ्याने कमेंट करताना म्हटले आहे, प्रेम दिलं की प्रेम मिळत असतं, धोकादायक समजल्या जाणारे बछडे देखील माकडाला आपली आई मानतायत, यावरून तुम्ही जगात कुठेही जावा, प्रेमाला मरण नाही. हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.

हे देखील वाचा.  Today Steel Rate: घर बांधणाऱ्यांसाठी गोड बातमी, स्टील सिमेंट झाले स्वस्त; जाणून घ्या आजचे दर..

India Post Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांना भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी..

Palmistry: तळहातावर ही खूण असेल, तर तुमच्या नशिबात आहे भरपूर पैसा..

Aadhar card: आधारकार्डला देखील असते एक्सपायरी डेट; या सोप्या पद्धतीने जाणून घ्या डिटेल्स..

Amazon Prime Day Sale 2022: अमेझॉनवर मान्सून ऑफरचा धुमधडाका! स्मार्टफोनसह या वस्तूंवर तब्बल ५५ टक्क्यांपर्यंत सूट..

Edible Oil Price: गोड बातमी! खाद्यतेल अजून एवढ्या रुपयांनी झाले स्वस्त, हे आहे कारण..

UPI Pin Change: या सोप्या पद्धतीने बदला UPI पिन, आणि भविष्यातील धोक्यापासून स्वतःला वाचवा..

healthy food: जाणून घ्या भिजवलेले बदाम खाण्याचे आठ आश्चर्यकारक फायदे..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.