Edible Oil Price: गोड बातमी! खाद्यतेल अजून ‘एवढ्या’ रुपयांनी झाले स्वस्त, ‘हे’ आहे कारण..

Edible Oil Price: खाद्य तेल म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा घटक. रोजच्या जेवणासाठी खाद्य तेलाची (Edible Oil) गरज आहेच. बाजारात विविध प्रकारचे खाद्यतेल उपलब्ध आहेत. सोयाबीन तेल, शेंगदाणा तेल, राईस ब्रान ऑईल ई. प्रकारचे तेल बाजारात उपलब्ध आहेत. गेल्या काही काळात खाद्यतेलाचे दर (Edible Oil Price) प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहायला मिळाले. सर्वसामान्य लोकांचे वाढत्या महागाईने कंबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेलसह रोजच्या दैनंदिन जीवनातील वस्तूंच्या किमती प्रचंड वाढलेल्या पाहायला मिळत आहेत. त्यात खाद्यतेलाचे गगनाला भिडलेले दर सर्वसामान्य लोकांसाठी खूपच त्रासदायक आहेत.

त्यातच आता केंद्र सरकारकने उचललेल्या काही पावलांमुळे सर्वसामान्यांना आता खाद्यतेल स्वस्त (Edible Oil Price) मिळू शकेल असे संकेत मिळत आहेत. मध्यंतरी खाद्यतेलाच्या किंमती आवाक्यात आणण्यासाठी केंद्र शासनाने काही निर्णय घेतले होते. त्यामुळे थोड्या प्रमाणात सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता. आता पुन्हा एकदा केंद्राने घेतलेल्या निर्णयामुळे खाद्यतेल आणखी स्वस्त होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मध्यंतरी केंद्र सरकारने सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावर आयात शुल्क आणि कृषी इन्फ्रा डेव्हलपमेंट सेसमध्ये सूट जाहीर केली होती.

तसेच तेलाची शुल्कमुक्त (Tax-free) आयातीची मर्यादा प्रति वर्ष २० लाख मेट्रिक टन एवढी ठेवण्यात आली होती. चालू आर्थिक वर्षासह पुढील दोन आर्थिक वर्षांसाठी ही सूट केंद्र सरकारने जाहीर केली आहे. त्याअगोदर कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर ५% एवढा होता. तसेच साठेबाजीवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देखील यंत्रनांना देण्यात आले होते. या निर्णयामुळे खाद्यतेलाचा पुरवठा वाढेल आणि तेलाच्या किमती आवाक्यात येतील अशी आशा सरकारला होती. हेही वाचाLifestyle: दररोज से’क्सके काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर

किरकोळ बाजारात खाद्यतेलाच्या किमती (Edible Oil Price) आवाक्यात आणण्यासाठी बुधवारी केंद्र सरकारची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीला तेल उत्पादकांसह निर्यातदारांनाही बोलावण्यात आले होते. या बैठकीत सरकारने तेल विक्रेत्यांना एमआरपी बदलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एमआरपी (MRP) प्रति लिटर 10 रुपये कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक तेल कंपनीचे दर प्रति लिटर 10 रुपये कमी झालेले पाहायला मिळतील. सरकारकडून तसे आदेश खाद्यतेल कंपन्यांना देण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती 10 टक्क्यांनी पडल्या आहेत. त्याचाच लाभ सर्वसामन्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने बैठक आयोजित करून तसे आदेश दिले आहेत.

“आम्ही खाद्यतेल कंपन्यांना सांगितले की, गेल्या एका आठवड्यापासून तेलांच्या जागतिक किंमतीत 10 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. याचा फायदा वापरकर्त्यांना झाला पाहिजे. आम्ही कंपन्यांना एमआरपी (MRP) कमी करण्याचे आदेश दिले आहेत. पामतेल, सोयाबीन तेल निर्माता प्रमुख कंपन्यांनी पुढील एका आठवड्यात खड्यतेलाचे दर 10 रुपयांनी कमी करू असे मान्य केले आहे. खाद्यतेलासोबतच इतर जेवणासाठी लागणाऱ्या तेलांच्या किमतीत 10 रुपये घट करण्यात येईल.” असे केंद्राचे अन्न आणि पुरवठा सचिव सुधांशू पांडे यांनी मीडियाला सांगितले. तसेच खाद्यतेल उत्पादकांना देशभरात एकाच ब्रँडच्या तेलाची MRP सर्वत्र समान ठेवण्यास सांगितले आहे. सध्या विविध राज्यात लिटरमागे तीन ते पाच रुपयांचा फरक आहे.

हेही वाचा: Amazon Prime Day Sale 2022: अमेझॉनवर मान्सून ऑफरचा धुमधडाका! स्मार्टफोनसह या वस्तूंवर ५५ टक्क्यांपर्यंत सूट..

Today Steel Rate: घर बांधणाऱ्यांसाठी गोड बातमी, स्टील सिमेंट झाले स्वस्त; जाणून घ्या आजचे दर..

Palmistry: तळहातावर हीखू असेल, तर तुमच्या नशिबात आहे भरपूर पैसा..

healthy food: जाणून घ्या भिजवलेले बदाम खाण्याचे आठ आश्चर्यकारक फायदे..

Lifestyle: दररोज से’क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.