Amazon Prime Day Sale 2022: अमेझॉनवर मान्सून ऑफरचा धुमधडाका! स्मार्टफोनसह ‘या’ वस्तूंवर तब्बल ५५ टक्क्यांपर्यंत सूट..

Amazon Prime Day Sale 2022: अमेझॉन आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक भन्नाट ऑफर घेऊन येत असतं. धावपळीच्या जमान्यात अनेकजण प्रत्येक्ष दुकानात जाऊन शॉपिंग करण्याऐवजी ऑनलाईनच शॉपिंग करताना पाहायला मिळतात. वेळेबरोबरच ई-कॉमर्स वेबसाईटवर दुकानाच्या तुलनेत जबरदस्त सूट देण्यात येते. साहजिकच या सगळ्या गोष्टींचा विचार करून ग्राहक देखील ई-कॉमर्स वेबसाईटचा वापर करतात. यात सगळ्यात अग्रेसर असणारी ई-कॉमर्स वेबसाईट म्हणजे अमेझॉन. अमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटवरून असंख्य ग्राहक अनेक वस्तू खरेदी करताना पाहायला मिळतात.

आता पुन्हा एकदा Amazon India ने आपल्या ग्राहकांसाठी Amazon Prime Day Sale चे आयोजन केले आहे. आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि ग्राहकांना इलेक्ट्रिक वस्तू, स्मार्ट फोन खरेदी करता यावा म्हणून, अमेझॉनने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. हा सेल ग्राहकांच्या सेवेसाठी २३ जुलैपासून अमेझॉनवर उपलब्ध होणार आहे.

Amazon Prime Day हा सेल २३ जुलैला सुरू होणार आहे. तर २४ जुलैला संपणार आहे. हा सेल केवळ एकच दिवस चालणार असल्याने, ग्राहकांची मोठी तारांबळ उडणार आहे. या सेलमधे ठेवण्यात येणाऱ्या विक्रीच्या तपशिलाविषयी जाणून घ्यायचं झाल्यास, अनेक इलेक्ट्रिक वस्तूंवर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने मोबाईल, टेलिव्हिजन, लॅपटॉप आणि ऑडिओ उत्पादनांचा समावेश असणार आहे. ग्राहकांना तबब्ल तीस हजाराहून अधिक उत्पादने या सेलमध्ये पाहता येणार आहेत.

Amazon ने आयोजित केलेल्या Amazon Prime Day या सेलमध्ये ग्राहकांना Samsung, Intel त्याचबरोबर Xiaomi या सारख्या नामांकित कंपनींची उत्पादने खरेदी करता येणार आहेत. विशेष म्हणजे, या सेलमध्ये ग्राहकांना या उत्पादकांवर तब्बल ५५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. हा सेल २३ जुलैला दुपारी 12:00 वाजता सुरू होताना पाहायला मिळणार आहे. महत्वाची बाब म्हणजे, हा सेल केवळ ४८ तासच सुरू राहणार असल्याने ग्राहकांसाठी ही थोड्या प्रमाणात त्रासदायक काम असणार आहे.

या सवलती देखील उपलब्ध असणार

Amazon Prime Day या सेलमधे ग्राहकांना फक्त फ्लॅट डिस्काउंटच नाही, तर क्रेडिट तसेच डेबिट कार्डवर देखील मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येणार आहे. या विषयी अधिक सांगायचे झाल्यास Amazon ने याविषयी जाहीर करताना म्हंटले आहे की, ICICI बँक याबरोबरच SBI कार्ड्सने ग्राहकांनी खरेदी केलेल्या वस्तूंचे बिल कार्डद्वारे केले तर ग्राहकांना या खरेदीवर अतिरिक्त 10 टक्के सवलत मिळणार आहे.

हे देखील वाचा India Post Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांना भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी..

Palmistry: तळहातावर ही खूण असेल, तर तुमच्या नशिबात आहे भरपूर पैसा..

Aadhar card: आधारकार्डला देखील असते एक्सपायरी डेट; या सोप्या पद्धतीने जाणून घ्या डिटेल्स..

UPI Pin Change: या सोप्या पद्धतीने बदला UPI पिन, आणि भविष्यातील धोक्यापासून स्वतःला वाचवा..

healthy food: जाणून घ्या भिजवलेले बदाम खाण्याचे आठ आश्चर्यकारक फायदे..

Child Confidence: लहानपणीच मुलांना या पाच गोष्टी शिकवल्यास, मुलं पोहोचतील यशाच्या शिखरावर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.