Belly Fat : खरंच उभं राहून पाणी पिल्यामुळे पोटाची चरबी वाढतेय का? लगेच जाणून घ्या नाहीतर..

Belly Fat: आजकाल बऱ्याच जीवनशैली ही वेगळ्याच मार्गावर असल्याचे पाहायला मिळते. म्हणजे आजकाल बरेच लोक आपल्या स्वास्थ्याकडे गांभीर्याने पहात नाहीत. आजकाल बऱ्याच लोकांना बैठी कामे असतात. असे लोक दिवसभर देखील ऑफिस मध्ये बसून असतात आणि घरी आल्यावर देखील, तसेच मोबाईल चाळत बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. अशा लोकांची शरीराची हालचाल कमी होत असते. त्यामुळे मग हे स्वतःहून वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देत असतात. पाठीचे दुखणे, मणक्याचे दुखणे तसेच लठ्ठपणाला हे लोक आमंत्रण देत असतात.

लठ्ठपणाची कारणे तशी वेगवेगळी आहेत. जर तुमचा आहार व्यवस्थित नसेल तरीदेखील तुम्हाला लठ्ठपणाचा सामना करावा लागू शकतो. काही लोकांना वारंवार चमचमीत खाण्याची सवय असते. अशा लोकांना घरचे पोष्टिक जेवण सोडून बाहेरचे खाण्यात जास्त रस असतो. बरेचजण सतत काहीतरी खात असताना पाहायला मिळतात. फास्टफुड देखील लठ्ठपणाचे एक महत्वाचे कारण आहे. बरेच लोक नशेच्या आहारी गेलेले असतात. रोज दारू प्रमाणापेक्षा जास्त पिल्याने लठ्ठपणा वाढू शकतो. त्याशिवाय जर तुम्ही कुठल्या आजाराने ग्रस्त असाल, तरीदेखील तुमचे वजन वाढून लठ्ठपणा येऊ शकतो.

लठ्ठपणा हे बऱ्याच आजारांचे कारण आहे. जसे की कॅन्सर (Cancer), मधुमेह (Diabetes), स्ट्रोक किंवा हृदयविकार (Heart Attack) या सर्व आजारांचं मुख्य कारण लठ्ठपणा आहे. बऱ्याचदा आपण लठ्ठपणाला दुर्लक्षित करत असतो. लठ्ठपणा हा अचानक येत नसतो. तो हळू हळू येत असतो. बऱ्याचदा काही लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी व्यायाम करतात. परंतु काही लोकांच्या बाबतीत रिझल्ट लगेच न आल्याने नैराश्य येते आणि मग हे लोक व्यायाम करून देखील चरबी कमी होत नसल्याची तक्रार करतात. परंतु अशा लोकांनी संयम ठेवण गरजेचे आहे. फक्त व्यायाम करून चरबी कमी होईल असे देखील नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात देखील बदल करण्याची गरज आहे.

खरंच उभं राहून पाणी पिल्याने पोटाची चरबी वाढते का? अजून काय गंभीर परिणाम होतात? जाणून घेऊया सविस्तर:
बऱ्याच लोकांना उभं राहून पाणी पिण्याची सवय असते. कधीकधी धावपळीत किंवा गरबडीत आपण वारंवार उभे राहून पाणी पित असतो. मग ऑफीस असेल किंवा प्रवास असेल बऱ्याचदा उभे राहून पाणी पिल्याने बऱ्याच आजारांना तुम्ही निमंत्रण देत आहात. यामुळे पोटाची चरबी तर वाढतेच, परंतु पोट फुगणे ही समस्या देखील उद्भवू शकते. आपल्या शरीराची रचना अशा प्रकारची आहे की, जर तुम्ही बसून पाणी प्यायलं तरच त्याचा फायदा शरीराला होतो. त्याचसोबत तुम्हाला सांधेदुखी सुध्दा उद्भवू शकते. उभे राहून पाणी पिल्याने शरीराच्या सांध्यांमधील द्रवपदार्थांचे संतुलन बिघडते. त्यामुळे अचानक सांधे दुखीला सुरुवात होते आणि मग असे आजार आयुष्यभर पाठ सोडत नाहीत.

उभे राहून पाणी पिण्याने आपली पचनसंस्था बिघडून जाते. कारण यामुळे जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पिता तेव्हा पाणी थेट अन्ननलिकेद्वारे पोटात जात असते. त्यामुळे अन्ननलिकेच्या स्थायूंवर दाब (Pressure) पडतो. त्यामुळे आपल्या पचनप्रक्रियेत बिघाड होऊन पचनाचे विविध आजार होऊ शकतात. तसेच जर उभे राहून पाणी पिल्याने पाणी शरीरातून थेट वाहून जाते आणि त्याचा शरीराला विशेष उपयोग होत नाही. मूत्रमार्ग आणि किडनीतील यामधील घाण तशीच राहते. त्यामुळे मूत्रमार्ग किंवा किडनीत संसर्ग होण्याची शक्यता असते. हे किडणीच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. एकंदरीत जर तुम्ही उभे राहून पाणी पित असाल तर ती सवय आत्ताच बदला आणि खाली बसून निवांत पाणी प्या. हे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

महत्वाच्या बातम्या: Lifestyle: दररोज सेक्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर.. 

 

HPCL Recruitment 2022: या विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना केली जाणार निवड.. 

Viral video: वाघाच्या तीन बछड्यांना माकडाने दूध पाजून सांभाळलं, पण बछड्यांनी.. 

Today Steel Rate: घर बांधणाऱ्यांसाठी गोड बातमी, स्टील सिमेंट झाले स्वस्त; जाणून घ्या आजचे दर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.