Causes of weak bones: हाडे कमकुवत होण्याची ही आहेत धक्कादायक 9 कारणे; मजबूत हाडांसाठी या पदार्थांचे सेवन करा..

Causes of weak bones: निरोगी आयुष्य ही मानवाची खूप मोठी संपत्ती आहे. निरोगी आयुष्य हीच आनंदाची गुरुकिल्ली आहे, असं समजलं जातं. अलीकडच्या काळात अनेकांची जीवनशैली बदलली असल्याने, निरोगी आयुष्य जगणं खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे. धावपळीच्या युगात निरोगी आयुष्य ठेवणं प्रत्येका पुढे खूप मोठं आव्हान आहे. निरोगी आयुष्य जगण्यासाठी तुमची हाडं देखील मजबूत असणे आवश्यक आहे. आणि म्हणून आज आम्ही तुम्हाला कोण-कोणत्या गोष्टींमुळे तुमची हाडं कमकुवत होऊ शकतात, याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत. याबरोबरच तुमची हाडं मजबूत ठेवाण्यासाठी काय आवश्यक आहे. याविषयी देखील माहिती देत आहोत. सर्वप्रथम आपण हाड कमकुवत होण्याची कोणती कारणे आहेत, याविषयी माहिती घेऊ.

सॉप्ट ड्रिंक्सचे सेवन

अनेकांना जेवणाबरोबरच सॉफ्ट ड्रिंक पिण्याची देखील सवय असते. मात्र सॉफ्ट ड्रिंकच्या सेवनामुळे तुमच्या हाडांची मजबुती कमी होऊ शकते. सॉफ्ट ड्रिंकमध्ये मोठ्या प्रमाणात सोड्याचं प्रमाण असतं. आणि सोडा आपल्या हाडांच्या कॅल्शियमचे प्रमाण कमी करण्याचे काम करतो. जर तुम्हाला हाडांची मजबूती हवी असेल, तर तुम्ही सॉफ्ट ड्रिंकचे सेवन टाळणे आवश्यक आहे.

धुम्रपान टाळणे आवश्यक; मानवाच्या शरीरासाठी धूम्रपान हे खूप धोकादायक मानलं जातं. धुम्रपणामुळे हृदयाचे देखील अनेक रोग जडण्याची दाट शक्यता असते. याबरोबरच मानवाचा ऑक्सिजन देखील धूम्रपानामुळे कमी होतो. धुम्रपानामुळे मनुष्याची हाडे देखील कमकुवत होतात. धूम्रपणामुळे पेशी कमकुवत होतात, आणि पेशी कमकुवत झाल्याने हाडांना कॅल्शियम मिळत नाही. आणि म्हणून धूम्रपान केल्याने आपली हाडे कमकुवत होतात.

अल्कोहोलचे अधिक सेवन; पुरुषांप्रमाणेच महिलांमध्ये देखील अलिकडच्या काळात अल्कोहोल सेवन करण्याचे प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळतं. अल्कोहोलचे सेवन केल्याने आपण अनेक आजारांना आमंत्रण देतो. याविषयी तुम्हाला देखील माहिती असेल. अल्कोहोलमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. याबरोबरच हृदयाचे देखील अनेक आजार जडतात. अल्कोहोलचे सेवन केल्याने, हाडे कॅल्शियम शोषूण घेण्याचं काम करत नाहीत.

आळस: तुमचा आळस देखील तुमच्या हाडांचा शत्रू बनू शकतो. शरीराची हालचाल व्यायाम न झाल्यास तुमची हाड कमकुवत बनतात. आळस केल्याने तुमच्यामध्ये सतत नकारात्मकता निर्माण होते. याबरोबर तुम्हाला लठ्ठपणाचा देखील सामना करावा लागतो. साहजिकच यामुळे त्याचा संपूर्णतः तुमच्या हाडावर परिणाम होतो. हाडे कॅल्शियम शोषून घेण्याचे काम करत नसल्याने, आळसामुळे तुमची हाडं कमकुवत बनतात.

वजन कमी करणं: अनेकांना लठ्ठपणाचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो‌. अनेक जण आपला लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करत असतात. मात्र एकाच वेळी तुम्ही तुमचं वजन कमी केल्यास, हे देखील तुमच्यासाठी खूप धोकादायक आणि हानिकारक ठरू शकतं. एकाच वेळी तुम्ही तुमचं वजन कमी केलं तरीदेखील तुमच्या हाडांचे कॅल्शियमचे प्रमाण कमी होतं. आणि हाडे कमकुवत बनतात.

कॉफीचे अतिसेवन झाल्यास..; अनेकांना कॉपी पिण्याची सवय असते, मात्र कॉफीचे अति सेवन झाल्यास देखील हाडे ठिसूळ बनतात. याचे कारण म्हणजे, कॉपीमध्ये कॅफिन नावाचा घटक आपल्या हाडांच्या कॅल्शियमची पातळी कमी करण्याचे काम करतो. साहजिकच यामुळे आपली हाडे कमकुवत होतात. आणि म्हणून कॉपीचे सेवन करणे टाळणे आवश्यक आहे.

मिठाचं जास्त सेवन करणं टाळावं; आहारामध्ये मीठ नेहमी कमी खावं, असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, डॉक्टर देखील हा सल्ला देतात. मिठाचे अति सेवन केल्याने, किंवा भाजीत नंतर वरून तुम्ही मीठ खाल्लं, तर तुमच्या हाडामधील असणारे कॅल्शियम तुमच्या लघवीद्वारे बाहेर पडते, आणि तुमची हाडे कमकुवत होतात. हाडं कमकुवत होण्याची कारणे आपण पाहिली. मात्र हाडं मजबूत करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे? याविषयी देखील आपण सविस्तर माहिती घेऊ.

विटामिन ‘डी’ ची आवश्यकता; हाडं मजबूत करण्यासाठी विटामिन ‘डी’ ची आवश्यकता असते. म्हणून सकाळचं कोवळं ऊन तुम्हाला विटामिन डी हे जीवनसत्व मिळवून देते. आणि म्हणून तुम्ही सकाळच्या कोवळ्या उन्हात तीस ते चाळीस मिनिटं बसणं आवश्यक आहे. यामुळे तुमच्या शरीरातील हाडे मजबूत होण्यास मदत होते.

या पदार्थांचे सेवन आवश्यक: तुमच्या शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात काही फळांचा समावेश करणे देखील आवश्यक आहे. आपण काय खातो, यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं. हाडांमधील कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्यासाठी तुम्हाला फ्लावर, केळी, डेअरीयुक्त पदार्थ, याबरोबरच बदाम, तसेच सोयाबीन, आणि मटण देखील खाणे आवश्यक आहे.

हे देखील वाचाIndia Post Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांना भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी..

Viral video: वाघाच्या तीन बछड्यांना माकडाने दूध पाजून सांभाळलं, पण बछड्यांनी..

Today Steel Rate: घर बांधणाऱ्यांसाठी गोड बातमी, स्टील सिमेंट झाले स्वस्त; जाणून घ्या आजचे दर..

Kissing benefits: Kiss आरोग्यासाठी रामबाण उपाय; किस करण्याचे हे आहेत दहा आश्चर्यकारक फायदे..

BCCI या पद्धतीने BCCI करते कर्णधारांची निवड, व्हिडिओ देखील झाला व्हायरल..

Belly Fat : खरंच उभं राहून पाणी पिल्यामुळे पोटाची चरबी वाढतेय का? लगेच जाणून घ्या नाहीतर..

Vastu Tips: चुकूनही घराजवळ लावू नका ही चार झाडे, अन्यथा होईल सत्यानाश..

HPCL Recruitment 2022: या विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना केली जाणार निवड..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.