BCCI: ‘या’ पद्धतीने BCCI करते कर्णधारांची निवड, व्हिडिओ देखील झाला व्हायरल..

0

BCCI: भारतात क्रिकेट (cricket) हा खेळ अलीकडच्या काळात प्रचंड लोकप्रिय झाला आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी असला तरी, सर्वाधिक चाहते, हे क्रिकेटचे असल्याचे पाहायला मिळते. जगात सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून, बीसीसीआयकडे (BCCI) पाहिलं जातं. अर्थात यामुळे खेळाडूंचे मानधन आणि फॅसिलिटी ह्या दर्जेदार असणार हे तुम्हाला अधिक सांगण्याची गरज नाही. बॉलीवूड कलाकारांपेक्षाही (Bollywood celebrities) जास्त ग्लॅमर आणि लोकप्रियता (popularity) क्रिकेटर्सना मिळत आहे. क्रिकेट बरोबरच भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारला (Indian cricket team captain) देखील वेगळं स्थान आहे. भारतीय संघाचा कर्णधार हा प्रत्येक खेळाडूंसाठी मोठा गौरव आहे.

मात्र सध्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार हा चेष्टेचा विषय बनला आहे. गेल्या सात महिन्यात भारतीय क्रिकेट संघाचे तब्बल सात कर्णधार झाले आहेत. विराट कोहलीला (Virat Kohli) भारतीय संघाच्या कर्णधार पदावरून पाय उतार व्हावे लागल्यानंतर, भारताने तब्बल सात कर्णधारांची निवड केली आहे. सोशल मीडियावर (social media) सध्या भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार पदाची निवड हा चेष्टाचा विषय बनला आहे. बीसीसीआयला उठ सुट कोणालाही कर्णधारपद वाटप सुटली असल्याने सोशल मीडियावर बीसीसीआय चांगलीच ट्रोल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

बीसीसीआय भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार पदाची निवड कशी करते, या संदर्भातला एक व्हिडिओ (video) सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, बीसीसीआयला दमदार पद्धतीने ट्रोल करण्यात येत आहे. गेल्या सात महिन्यात भारतीय क्रिकेट बोर्डाने तब्बल सात कर्णधार निवडले आहेत. विराट कोहलीला कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आल्यानंतर, भारतीय संघाच्या तिन्हीं फॉर्मेटचा नियमित कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड करण्यात आली. आगामी t20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून बीसीसीआय अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देऊन, नविन खेळाडूंना संधी देत आहे. अर्थात यामुळे वेगवेगळ्या मालिकांसाठी नवीन कर्णधारांची नियुक्ती करण्याची वेळ बीसीसीआयवर येत आहे.

बीसीसीआय भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार पदाची निवड कशी करते? यासंदर्भातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ प्रचंड मजेशीर असून, हा व्हिडीओ पाहून, अनेकांचा हसून हसून लोटपोट होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतून बीसीसीआय भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार पदाची निवड कशी करते, हे या व्हिडिओतून दाखवण्यात आले आहे.

टी-ट्वेंटी विश्वचषकात झालेल्या दारून पराभवानंतर, विराट कोहलीची वनडे संघाच्या कर्णधार पदावरून हकलपट्टी केली. त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला कसोटी संघाच्या कर्णधार पदाचा देखील कोहलीने राजीनामा दिला. विराट कोहलीनंतर, बीसीसीआयने रोहित शर्माची टी-ट्वेंटी, वन डे, आणि कसोटी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली. मात्र त्यानंतर रोहित शर्मा दुखापतीमुळे खेळू शकला नाही. आणि रोहित शर्माच्या जागी केएल राहुलची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर आता हार्दिक पांड्या, रिषभ पंत, बुमरा, शिखर धवनची निवड करण्यात आली.

शिखर धवनची कर्णधार म्हणून निवड

भारतीय संघाचा डावखूरा सलामवीर फलंदाज शिखर धवनची वेस्टइंडीज विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. या मालिकेसाठी अनेक मोठ्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, बुमरा हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, यासह अनेक खेळाडूंनाचा समावेश आहे. या मालिकेसाठी शिखर धवनची कर्णधार, तर रवींद्र जडेजाची उपकर्णधार म्हणून निवड केली आहे.

असा आहे वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारतीय संघ: शिखर धवन (कर्णधार), रविंद्र जडेजा (उपकर्णधार) सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दिपक हुड्डा, संजू सॅमसन,(विकेटकीपर) इशान किशन (विकेटकीपर) यजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज,अर्शदीप सिंह, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, ऋतुराज गायकवाड, अक्षर पटेल, आवेश खान.

हे देखील वाचा Viral video: वाघाच्या तीन बछड्यांना माकडाने दूध पाजून सांभाळलं, पण बछड्यांनी..

Today Steel Rate: घर बांधणाऱ्यांसाठी गोड बातमी, स्टील सिमेंट झाले स्वस्त; जाणून घ्या आजचे दर..

India Post Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांना भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी..

HPCL Recruitment 2022: ‘या’ विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना केली जाणार निवड..

Belly Fat : खरंच उभं राहून पाणी पिल्यामुळे पोटाची चरबी वाढतेय का? लगेच जाणून घ्या नाहीतर..

Vastu Tips: चुकूनही घराजवळ लावू नका ही चार झाडे, अन्यथा होईल सत्यानाश..

Edible Oil Price: गोड बातमी! खाद्यतेल अजून एवढ्य रुपयांनी झाले स्वस्त, हे कारण..

Amazon Prime Day Sale 2022: अमेझॉनवर मान्सून ऑफरचा धुमधडाका! स्मार्टफोनसह या वस्तूंवर तब्बल ५५ टक्क्यांपर्यंत सूट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.