Palmistry: ‘या’ तीन प्रकारे जाणून घेता येते, आपण किती वर्ष जगणार आहोत..

0

Palmistry : आपल्या भविष्याविषयी जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता, सवय असते. अनेकजण आपल्या आयुष्यात संपत्तीचा किती योग आहे? याविषयी देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. एवढेच नाही, तर काही अडचणी आल्या तरी देखील अनेक जण वास्तुशास्त्राचा सहारा घेऊन त्या अडचणी कशा दूर होतील, याविषयी जाणून घेण्याच्या प्रयत्न करतात. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र अनेक जण हस्तरेषाशास्त्राचा सहारा घेऊन आपले आयुष्य किती आहे? याविषयी देखील जाणून घेतात. आज आपण याविषयीच सविस्तर जनऊन घेणार आहेत.

आपण किती वर्ष जगणार आहोत? याविषयी अनेकजन जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, मात्र हस्तरेषाशास्त्रानुसार तुमच्या आयुष्याविषयी असणाऱ्या अनेक गोष्टींचा उलगडा केला जाऊ शकतो. तुमच्या आयुष्यात किती अडचणी येणार आहेत? तुमचे आयुष्य निरोगी असणार की नाही? तुमच्या आयुष्यात संपत्तीचा योग आहे की नाही? याचबरोबर तुम्ही किती वर्ष जगणार आहे? तुमचा मृत्यू कधी होणार आहे? याविषयी हस्तरेषा शास्त्रात सविस्तर माहिती मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया, हस्तरेषाशास्त्रानुसार तुमचे वय किती असणार आहे.

जर तुमचा हस्तरेषा शास्त्राचा अभ्यास असेल, तर तुम्हाला याविषयी माहिती असेल. मात्र जर तुमचा या संदर्भातला अभ्यास नसेल, तरीदेखील तुम्ही हे जाणून घेऊ शकता. आज आपण याविषयीच बोलणार आहोत. तुमच्या तळ हातावर ज्या रेषा असतात त्यामध्ये शुक्र रेषेच्या पर्वताभोवती जी वर्तुळासारखी रेष असते, त्या रेषेला आयु रेषा म्हणतात. तुमच्या हातावर असणारी ही आयु रेषा जर ठळक दिसत असेल, त्याबरोबरच ही आयु रेषा कुठेही मध्ये तुटत नसेल, तर तुमचं आयुष्य दीर्घकाळ आहे. असे हस्तरेषाशास्त्रात सांगितले आहे.

आयु रेषा जर दुसऱ्या कोणत्याही रेषेने तोडलेली नसेल, तर अशा व्यक्ती साधारण 70 वर्ष अधिक आपलं जीवन जगतात. विशेष म्हणजे हे जीवन जगत असताना कोणतेही आजार देखील उद्भवत नसल्याचं हस्तरेषा शास्त्रात सांगितलं आहे. मात्र जर आयु रेषा मध्येच तुटत असे, किंवा आणखी दुसऱ्या एखाद्या रेषेने तोडलेली असेल, तर अशा व्यक्ती नेहमी आजाराने ग्रासलेल्या असतात. या बरोबरच अशा लोकांचा मृत्यू जास्त करून अपघाताने होण्याची शक्यता असल्याचे, या शास्त्रात सांगितले आहे.

हस्तरेषा शास्त्रात हातावरच्या रेषांवरून व्यक्तींचे वय देखील ठरवण्यात आले आहे. या व्यक्तींच्या तळहाताच्या खाली मनगटाजवळ किती रेषा असतात, यावरून देखील व्यक्तींचे वय ठरवण्यात आले आहे. मनगटाजवळ ज्यांना दोन रेषा आहेत, या व्यक्तींचे वय साधारण पन्नास वर्षांपर्यंत असते. असे देखील हस्तरेषाशास्त्रमध्ये नमूद करण्यात आले आहे. याबरोबरच माणूस किती वर्ष जगणार आहे, हे ओळखण्याची आणखी एक पद्धत वास्तू शास्त्रात देण्यात आली आहे.

हस्तरेषा बरोबरच कपाळावर असणाऱ्या रेषांद्वारे देखील माणसांचे वय ओळखता येत असल्याचे वास्तुशास्त्रात नमूद करण्यात आले आहे. ज्या व्यक्तींच्या कपाळावरती असणाऱ्या रेषा स्पष्ट दिसतात, अशा लोकांच्या वयाचा अंदाज अधिक स्पष्टतेने लावता येतो. कपाळावर असणाऱ्या रेषांना क्षैतिज रेषा म्हणतात. यामधील एक रेषा हे वयोमान वीस असल्याचे दर्शवते. तुमच्या कपाळावर जर दोन रेषा असतील, तर तुमचे वय ४०, अशा प्रमाणे माणसांचे वयोमान असते. असे हस्तरेषाशास्त्रात सांगितले आहे.

या पद्धतीने देखील जाणून घेता येते वयोमान

गरुड पुराणांमध्ये देखील वेळ जाणून घेण्याच्या पद्धती विषयी भाष्य करण्यात आले आहे. जर तुम्ही तुमच्या शरीराचे मोजमाप तुमच्या बोटाने केले, आणि तुमची शरीराची 108 बोटा इतकी लांबी झाली, तर तुमचे वय शंभरी पार करणार असल्याचे म्हटलं गेलं आहे. या बरोबर जर तुमची लांबी शंभर बोटांच्या आसपास भरली, तर तुमचे वयोमान 80 ते 85 या दरम्यान असू शकते. असे देखील या गरुड पुराणांमध्ये सागितले आहे.

हे देखील वाचा Healthy Food For Kidney: यामुळे किडनीच्या समस्या उद्भवतात; या चार पदार्थाचे सेवन केलयास किडनीच्या समस्या होतात दूर..

तळहातावर ही खूण असेल, तर तुमच्या नशिबात आहे भरपूर पैसा..

Vastu Tips: चुकूनही घराजवळ लावू नका ही चार झाडे, अन्यथा होईल सत्यानाश..

Police Bharti Update: पोलीस भरती प्रक्रियेत होणार मोठा बदल? शिंदे सरकारचा पोलीस भरती करणाऱ्या पोरांना दणका..

Healthy lifestyle: वडे, सामोसे खाल्ल्याने होतायत हे चार गंभीर आजार; एकदा गरम केलेले तेल पुन्हा वापरू नका अन्यथा

USSD Code: हा कोड वापरून मोबाईल नंबर ट्रॅक झाला आहे, की नाही हे चेक करा; हरवलेला मोबाइल देखील करू शकता ट्रॅक..

Kissing benefits: kissआरोग्यासाठी रामबाण उपाय; किस करण्याचे हे आहेत १० आश्चर्यकारक फायदे..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.