Health Tips: गरम पाणी पिण्याचे फायदे कदाचित तुम्हाला माहितीही असतील; पण तोटे जाणुन तुम्हालाही बसेल धक्का..

Health Tips: आपण बर्‍याचदा अशी अनेक लोकं बघतो जे नेहमी गरम पाणी पितात. जास्तीत जास्त पाणी पिणे शरीरासाठी चांगलेच आहे. यामुळे आपण बर्‍याचशा प्राथमिक आजारांना आपल्या शरीरापासून दुर ठेऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरसुद्धा भरपुर पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. मात्र आपल्या आजुबाजुला असे पुष्कळजण आहेत जे साध्या पाण्याऐवजी गरम पाण्याचाच ऊपयोग तहाण भागवण्यासाठीसुद्धा करतात. कोरोनानंतर तर हे प्रमाण अधिकच वाढले आहे. कोरोनाच्यादरम्यान गरम पाणी सातत्याने पिल्याने कोरोना दुर राहतो असा समजसुद्धा लोकांमध्ये दृढ झाला होता. त्यामुळे साध्या पाण्याऐवजी नेहमिच गरम पाणी पिण्यास अनेकांनी प्राधान्य दिले. मात्र या सतत गरम पाणी पिण्याचे शरीरावर काय परिणाम होतात? याची कल्पना आपल्याला असणे आवश्यक आहे.

सहसा गरम किंवा कोमट पाणी पिण्याचे फायदे आपल्याला माहिती असतात. पाणी थोडे ऊकळुन घेतल्यास त्यातील दूषितपणा कमी होतो. आपण बघतो की अनेकांना अपचनाचा त्रास असतो. ज्यामुळं शरीरावरची चरबी वाढणे किंवा पोटासंबंद्धी ईतर विकार जडण्याची शक्यता अधिक असते. परंतू गरम पाणी पिल्याने अपचनाचा त्राससुद्धा दुर होतो. अशाप्रकारे गरम पाणी पिण्याचे पुष्कळ फायदे आहेत. परंतू सतत गरम किंवा कोमट पाणी पिल्याचे काही दुष्परिणामसुद्धा आपल्या शरीरावर होतात. त्यामुळे सातत्याने गरम पाणी पिण्याचे काही तोटेसुद्धा आहेत. आणि आपल्याला त्याची कल्पना असणे आवश्यक आहे. त्यामुळेच या लेखात सविस्तर जाणुन घेऊयात, नेहमी गरम पाणी पिण्याचे शरीरावर काय परिणाम होतात. सर्वप्रथम आपण फायदे जाणून घेऊया.

अपचन व ऍसीडीटीसाठी उपयुक्त 

धावपळीच्या काळात जवळपास सर्वांच्याच जेवणाच्या वेळा बदलल्या आहेत. खूप प्रयत्न करून देखील अनेकांना वेळेवर जेवण करणे शक्य होत नाही. अवेळी जेवण आणि त्यातसुद्धा फास्ट फुड, जंक फुडचा जेवणात समावेश अधिक असल्यामुळे अपचनाचा किंवा ऍसीडीटीचा त्रास ऊद्भवतो. जर तुम्हाला अपचन सारखी समस्या उद्भवत असेल, तर त्यासाठी गरम पाणी यावर कारगर ऊपाय ठरु शकतो. योग्य प्रमाणात गरम पाणी पिल्यास ऍसीडीटी आणि अपचनाच्या समस्येला आपण कायमचं दुर ठेऊ शकतो.

वजन कमी करण्यात मदत करते

वाढलेल्या वजनामुळेसुद्धा विविध आजार होऊ शकतात. त्यामुळं वजन कमी करण्यासाठी शारीरीक व्यायामासह योग्य आहारावर सुद्धा भर दिला जातो. योग्यप्रमाणात गरम पाणी पिल्यास वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवता येते. गरम पाण्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. तसेच भुक सुद्धा कमी लागते. परिणामी वजन कमी करण्यासाठी ते फायदेशीर ठरु शकते. वजन कमी करण्यासाठी पाणी मदत करू शकते हे खरं असलं तरी त्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. आपण तेही जाणून घेऊया.

गरम पाणी पिण्याचे तोटे

किडनीवर होतो परिणाम: किडनी हा आपल्या शरीरातील एक महत्वाचा अवयव आहे. शरीरातील अनावश्यक व विषारी पदार्थांना बाहेर टाकण्याचे काम किडनीद्वारे केले जाते. काही तज्ज्ञांच्या मते नेहमी गरम पाणी पिल्याने किडनीवर दुष्परिणाम होतो. सातत्याने गरम पाणी पिल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास अडथळा होतो. त्यामुळे याचा परिणाम थेट किडनीवर होऊन किडनीला हानी पोहचण्याची शक्यता असते.

पेशींवर हैतो परिणाम

गरजेपेक्षा जास्त गरम पाणी पिल्याने त्याचा थेट पेशींवर परिणाम होतो. रक्त आणि पेशी यांचे संतुलन राखण्यासाठी रक्तातील अतिरिक्त पाणी पेशींमध्ये घेतले जाते. त्यामुळे पेशी फुगतात आणि त्यांचा मेंदुंच्या पेशीवर दबाव निर्माण होतो. यामुळे बर्‍याचदा डोकेदुखी, डोळ्यासमोर अंधारी येणे किंवा चक्कर येणे असे प्रकारसुद्धा घडु शकतात. आणि म्हणून गरम किंवा कोमट पाणी पिताना आपण काळजी घेणे आवश्यक आहे.

निद्रानाशाची समस्या होऊ शकते. 

नेहमी गरम पाणी पिल्याने थेट झोपेवरसुद्धा परिणाम होतो. झोपेच्या अगोदर गरम पाणी पिणे सहसा टाळलेलेच बरे असते. झोपण्यापूर्वी गरम पाणी पिल्यास लगेचच झोप लागत नाही. त्यामुळे बर्‍याचदा निद्रानाशाची समस्यासुद्धा जडु शकते. पुर्ण झोप ही आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी आहे. परंतू अपुर्‍या झोपेचा परिणाम शरीरावर जाणवायला लागतो. अपुरी झोपसुद्धा विविध आजारांसाठी निमंत्रण देते. अशाप्रकारे गरम किंवा कोमट पाणी पिण्याचे परिणाम आणि दुष्परिणाम आपण आहेत. त्यामुळे मनाने कारभार न करता, वैद्यकीय सल्ल्यानुसारच आपण आपल्या आरोग्यासंदर्भातील पाऊले ऊचलणं आवश्यक आहे.

हे देखील वाचा Motorola: 200MP कॅमेरा असणारा Motorola चा हा स्मार्टफोन लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये..

flipkart big billion days: स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉप, फ्रीजसह अनेक वस्तूंवर तब्बल 50% हून अधिक डिस्काउंट; जाणून घ्या कधी सुरू होतोय सेल..

Sport shoes: तब्बल 72 टक्के डिस्काउंटवर खरेदी करा Reebok, Adidas, Redtape कंपनीचे शूज; पाहा कुठे सुरू आहे ऑफर..

brain tumor: ही लक्षणे जाणवत असतील, तर असू शकतो ब्रेन ट्युमर जाणून घ्या या आजाराविषयी सर्वकाही..

Best Partner Tips: योग्य जिवनसाथी निवडताना या गोष्टींची घ्या विशेष काळजी अन्यथा..

Relationship Tips धोकेबाज पार्टनरमध्ये असतात ही लक्षणे; आताच जाणून घ्या अन्यथा आयुष्य होईल उद्ध्वस्त..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.