Motorola: 200MP कॅमेरा असणारा Motorola चा ‘हा’ स्मार्टफोन लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये..

Motorola: बाजारात येणाऱ्या नवनवीन स्मार्टफोन (smartphone) विषयी जाणून घेण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. बाजारात येणाऱ्या नवनवीन स्मार्टफोनच्या फीचर्स बाबत अनेकांना कुतूहल असते. अनेकजण मार्केटमध्ये येणारे नवीन स्मार्टफोन खरेदी करताना देखील पाहायला मिळतात. अलीकडे ब्लॉगर (blogger) आणि यूट्यूबच्या (YouTube) या जमान्यात आता अनेकजण स्मार्टफोनमध्ये दर्जेदार कॅमेरा (camera) असेल तरच स्मार्टफोनकडे आकर्षित होतात. जर तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन विकत घ्यायचा विचार करत असाल, आणि तुमची पहिली पसंत कॅमेरा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. (Motorola Edge 30 Ultra smartphone launch)

अनेक स्मार्टफोन कंपन्या आता सर्वसामान्यांना परवडेल असे स्मार्टफोन बाजारात उतरवत असल्याचे दिसून येतं. कॉम्पिटिशनच्या या जमान्यात आता कमी किंमतीबरोबरच अनेक जबरदस्त पिक्चर ग्राहकांना प्रोव्हाइड करणे अनेक कंपन्यांसमोर मोठं आव्हान आहे. मात्र प्रचंड मोठं आव्हान असलं, तरी अनेक कंपन्या ग्राहकांची मागणी पूर्ण करताना देखील दिसून येतात. यापैकीच एक कंपनी म्हणजे मोटोरोला. Motorola कंपनी आपल्या ग्राहकांच्या मागणीनुसार आपल्या स्मार्टफोनची निर्मिती करताना दिसून येत असून, आता या कंपनीने तब्बल 200 मेगापिक्सल असणारा कॅमेरा लॉन्च केला असून, या स्मार्टफोनची जोरदार चर्चा मार्केटमध्ये रंगली आहे.

Motorola कंपनीने Motorola Edge 30 Ultra हा स्मार्टफोन लॉन्च केला असून, या स्मार्टफोनचा तब्बल 200MP कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोन बरोबरच कंपनीने आणखी दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. Edge 30 Fusion त्याचबरोबर Edge 30 Neo असं या दोन स्मार्टफोनचे नाव आहे. कॅमेरा बरोबरच कंपनीने तब्बल 125W चा चार्जर सपोर्ट देखील दिला आहे. आता आपण मोटोरोलाने लॉन्च केलेल्या तीनही स्मार्टफोन विषयी सर्व डिटेल सविस्तर जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण Motorola Edge 30 Ultra या स्मार्टफोनचे डिटेल्स जाणून घेऊ.

Motorola Edge 30 Ultra

मोटोरोला या कंपनीने लॉन्च केलेला Motorola Edge 30 Ultra या स्मार्टफोनचा कॅमेरा 200MP तर आहेच, मात्र याशिवाय स्मार्टफोनचा डिस्प्ले देखील दर्जेदार आहे. स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.67 इंच देण्यात आला आहे. सोबतच या स्मार्टफोनचा डिस्प्ले P-OLED देखील असणार आहे. जो खूप दर्जेदार समजला जातो. या स्मार्टफोनची स्क्रीन खूप स्मूथ देण्यात आली असून, याचा रिफ्रेश रेट 144Hz देण्यात आला आहे. जो HDR10 ला सपोर्ट करतो.

कॅमेरा

या स्मार्टफोन कॅमेराच्या सर्व डिटेल जाणून घ्यायच्या झाल्यास, स्मार्टफोनचा कॅमेरा हा सॅमसंग सेन्सरसह देण्यात आला आहे. 200MP Samsung ISOCELL हा याचा सेन्सर असणार आहे. त्याचबरोबर 50MP अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा देखील देण्यात आला आहे. या कॅमेराचा सेन्सर देखील Samsung चा असणार आहे. याबरोबरच 12MP टेलिफोटो लेन्स देखील ग्राहकांना मिळणार आहे. या स्मार्टफोनच्या फ्रंट कॅमेराचा विचार करायचा झाल्यास, सेल्फी त्याचबरोबर व्हिडिओ कॉलिंगसाठी देखील या कॅमेरेचा तब्बल 60MP OmniVision OV60A सेन्सर असणार आहे.

प्रोसेसर आणि बॅटरी

या स्मार्टफोनच्या प्रोसेसर आणि बॅटरी विषयी अधिक जाणून घ्यायचं झाल्यास, हा स्मार्टफोन नवीनतम स्नॅपड्रॅगन 8 प्लस Gen 1 वर चालतो. या स्मार्टफोन १२ जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेजसह लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या बॅटरीचा विचार करायचा झाल्यास, 4610mAh ची बॅटरी ग्राहकांना मिळणार आहे. चार्जिंग सपोर्ट विषयी सांगायचं झाल्यास, या स्मार्टफोनला 125W टर्बो चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 12 वर काम करतो.

किंमत आणि कलर

स्मार्टफोनच्या फीचर्स बरोबरच अनेकांना आकर्षित फोन आवडत असल्याने, आता कंपनी ग्राहकांसाठी आकर्षक फोन देखील प्रोव्हाइड करताना दिसून येते. या फोनचा लूक देखील खूप जबरदस्त देण्यात आला असून, हा फोन ब्लॅक त्याच बरोबर स्टारलाईट व्हाईट रंगांमध्ये उपलब्ध केला गेला आहे. स्मार्टफोनची किंमत जाणून घ्यायची झाल्यास, हा स्मार्टफोन ग्राहकांना खरेदी करण्यासाठी तब्बल 72 हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

हे देखील वाचा flipkart big billion days: स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉप, फ्रीजसह अनेक वस्तूंवर तब्बल 50% हून अधिक डिस्काउंट; जाणून घ्या कधी सुरू होतोय सेल..

PAKvsAFG: डिवचल्यानंतर अफगानच्या फॅनने पाकिस्तान चाहत्यांची खुर्चीने केली फिल्मी स्टाईल धूलाई; पाहा व्हिडिओ..

Sport shoes: तब्बल 72 टक्के डिस्काउंटवर खरेदी करा Reebok, Adidas, Redtape कंपनीचे शूज; पाहा कुठे सुरू आहे ऑफर..

Ayushman Card: या योजनेअंतर्गत मिळतो पाच लाखांपर्यंत दवाखान्याचा खर्च; जाणून घ्या केंद्र सरकारच्या या योजनेविषयी..

Cotton candy business: 8 हजार गुंतवून कॉटन कॅन्डचा व्यवसाय सुरू करा; दरमहा होईल लाखोंची उलाढाल..

Marriage Tips: एका वर्षानंतर मॅरेज लाईफ का होते बोरिंग? वैवाहिक जीवनात प्रेमाचा बहर फुलवत ठेवण्यासाठी फॉलो करा या 4 टिप्स..

snake entered the ear: महिलेच्या कानात शिरला साप; पुढे काय घडलं तुम्हीच पाहा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.