Marriage Tips: एका वर्षानंतर मॅरेज लाईफ का होते बोरिंग? वैवाहिक जीवनात प्रेमाचा बहर फुलवत ठेवण्यासाठी फॉलो करा या 4 टिप्स..

Marriage Tips: लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. प्रत्येकाला आपला पार्टनर हा प्रेमळ आणि सुंदर असावा असं वाटत असतं. मात्र प्रत्येकाला आपल्या म्हणण्यानुसार, पार्टनर मिळेलच असं नाही. मात्र ज्याच्या सोबत आपलं लग्न होतं त्याच्याशी वैवाहिक आयुष्य जगणं तुम्हाला क्रम प्राप्त होतं. नात्यात गोडवा असेल, तर माणसाचं आयुष्य खूप सुखाचा आणि समाधानाची जातं. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे माणसाच्या आयुष्यात तडजोड हा देखील खूप महत्त्वाचा भाग आहे. तडजोड केल्याशिवाय तुम्ही यशस्वी आयुष्य जगूच शकत नाही. हे वास्तव मान्य करून पुढे जाणं गरजेचं असतं. मात्र तडजोड कुठपर्यंत करायची, याला देखील मर्यादा असते.

अनेकदा आपण पाहतो, लग्नानंतर वर्ष दोन वर्षानंतर दोघांच्याही नात्यांमध्ये कटूता निर्माण व्हायला सुरुवात होते. वर्ष दोन वर्ष आनंद आणि प्रेमाने बहर आलेल्या नात्यात सातत्याने वाद होताना पाहायला मिळतात. त्याचे परिणाम घटस्फोटापर्यंत देखील येऊन पोहचतात. सुरवातीचे वर्ष दोन वर्ष प्रेमाने बहर आलेल्या नात्यामध्ये अचानक कटुता का निर्माण होते, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? नात्यामधील प्रेम कमी झालं की चिडचिडेपणा आणि एकमेकांवर तोंड टाकणे चालू होतं. यावरून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, प्रेम कमी झालं की समस्या निर्माण होतात. मग प्रेम कमी होऊ नये यासाठी काय खबरदारी घेणे आवश्यक आहे? जाऊन घेऊन या विषयी सविस्तर.

कटूता निर्माण होण्याची ही आहेत करणे

कोणत्याही नात्याची सुरुवात ही भावनांद्वारे होत असते. समोरच्याच्या आपण तितक्या जास्त भावना समजून घेऊ, तितकं नातं अधिक दृढ होत असतं. कुठल्याही नात्याच्या सुरुवातीला पार्टनर एकमेकांची प्रचंड काळजी घेत असतात. एकमेकांच्या भावनांचा आदर करून समोरच्याच्या भावना आपल्यामुळे दुखवता कामा नये. याची देखील खबरदारी घेतली जाते. मात्र हळूहळू एकमेकांविषयीच्या भावना कमी होत जातात. आणि दोघेही आपल्या जबाबदारदाऱ्यांवर विशेष लक्ष देतात. दोघांनाही आपल्या घराच्या भविष्याची काळजी अधिक असते. साहजिकच या सगळ्यांमध्ये दोघांचेही एकमेकांकडे लक्ष कमी होते. आणि मग हळूहळू नात्यांमध्ये कटूता निर्माण व्हायला सुरुवात होते.

कुटुंबाच्या भविष्यासाठी दोघेही अधिक जबाबदारीने वागतात. साहजिकच या गोष्टींमुळे दोघेही रमून जात असतात. दोघांनाही कधी-कधी वाटत असतं, आपला पार्टनर आपल्यावर आता प्रेम करत नाही. आपल्या पार्टनरचे आपल्याकडे लक्ष नाही. आणि मग आपला पार्टनर दुसरीकडे प्रेमाच्या शोधात देखील गेल्याचे पाहायला मिळते. अशा वेळी फसवणूक देखील होताना पाहायला मिळते. तुमच्या बाबतीत देखील अशा गोष्टी घडत असतील आणि तुम्हाला पूर्वीसारखं तुमच्या नात्यांमध्ये प्रेम आणि आनंद मिळवायचा असेल, तर तुम्ही खालील गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.

तुमच्या कंटाळवाण्या वैवाहिक जीवनात..

लग्नानंतर सुरुवातीचा एक दोन वर्षाचा काळ गेल्यानंतर एकमेकांविषयी असणारा प्रेम कमी झाल्याचा भास तुम्हाला होत असतो. यात विशेष असं काही नाही. मात्र याचा अर्थ तुमचा पार्टनर तुमच्यावर प्रेम करत नाही, असं अजिबात नसतं. हरवलेलं प्रेम पूर्वीसारखं फुलवण्यासाठी तुम्हाला सुरुवातीचे दिवस आठवणे गरजेचं आहे. सुरुवातीचे दिवस आठवल्यानंतर, तुमची झालेली पहिली भेट, रोमँटिक क्षण आठवतील. हे सुंदर क्षण, आठवल्यानंतर अर्थातच तुम्हाला तुमच्या पार्टनर विषयी प्रेमाची भावना निर्माण होईल.

पार्टनरशी लाजू नका

वैवाहिक जीवन जगत असताना अनेक समस्या येत असतात. मात्र घरातील कोणत्याही समस्या आपल्या पार्टनरसोबत शेअर करताना तुम्ही अजिबात लाजले नाही पाहिजे. कुटुंबातील कोणतीही गोष्ट असो किंवा रोमान्स असो, तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर शेअर करताना अजिबात लाजने आवश्यक नाही. तुमच्या पार्टनर सोबत ज्यावेळी तुम्ही प्रत्येक गोष्ट शेअर करता त्यावेळेस तुमच्या पार्टनरबाबत तुम्ही ‘लॉयल’ असल्याचा हा एक पुरावा ठरतो. यामुळे तुमचा पार्टनर देखील त्याच्या मनातील अनेक गोष्टींचा उलघडा करतो.

किरकोळ कारणावरून मूड खराब करू नका

वैवाहिक जीवन सुखी ठेवण्यासाठी दोघांनी एकमेकांना त्यांच्या चांगल्या त्याचबरोबर वाईट सवयी स्वीकारने खूप महत्वाचे आहे. प्रत्येक जण सर्व गुणसंपन्न असेलच असं नाही. प्रत्येक जण प्रत्येक गोष्टींत चांगला असेलच असं, नाही. काहीजण एखाद्या गोष्टीत चांगले असतात. तर काहीजण दुसऱ्या गोष्टीत चांगले असतात. याचा अर्थ त्याच्याकडे देखील काहीतरी विशेष गुण आहे. हे तुम्ही मान्य करणं आवश्यक आहे. दोघांपैकी जर एखाद्याने राग व्यक्त केला, तर तुम्ही देखील ओरडणे योग्य नाही. तुम्ही प्रेमाने समोरच्याला समजून घेणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवन यशस्वी जगण्यासाठी दोघांनाही एकमेकांची साथ हवी. हे कायम लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

स्तुती करणे आवश्यक.

जोडीदाराकडून आपलंही कौतुक व्हावं असं अनेकांना वाटत असतं. त्यासाठी अनेक जण प्रयत्न देखील करत असतात. अशात त्यांच्या कामाची तुम्ही प्रशंसा केली नाही तर, त्यांनी केलेली मेहनत वाया जात असते. आणि म्हणून तुमच्या पार्टनरच्या कामाची स्तुती करणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरच्या सौंदर्याची स्तुती करा, कधी त्याने परिधान केलेल्या वेशभूषेची स्तुती करा, कधी प्रेमाने बनवलेले जेवणाची स्तुती करा. प्रेम हे छोट्या छोट्या गोष्टीत दडलेलं असतं. मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आणि मग नात्यात समस्या निर्माण होतात.

फिरायला जाणे आवश्यक

वैवाहिक जीवनात मोठ्या प्रमाणात धावपळ असते. हे जरी मान्य असले, तरी तुम्ही कामाच्या व्यापातून एखादा दिवस सुट्टीचा प्लॅन करणे आवश्यक आहे. आपल्या पार्टनरला एखादा दिवस जर तुम्ही फिरायला घेऊन गेला, तर आयुष्यात असणाऱ्या अनेक समस्यांचे निराकरण होऊ शकतं. किमान पंधरा दिवसातून एकदा बाहेर फिरायला जाणं फार आवश्यक आहे. पार्टनर सोबत बाहेर फिरायला गेल्यामुळे, कामाचा तणाव देखील नाहीसा होतो. तुमच्या पार्टनरच्या मनात असणाऱ्या अनेक गोष्टींचा उघडा देखील होऊ शकतो. अशा काही बेसिक गोष्टींची काळजी केल्यामुळे तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात कायम प्रेम आणि आनंद फुलवता.

हे देखील वाचा Relationship Tips धोकेबाज पार्टनरमध्ये असतात ही लक्षणे; आताच जाणून घ्या अन्यथा आयुष्य होईल उद्ध्वस्त..

Ayushman Card: या योजनेअंतर्गत मिळतो पाच लाखांपर्यंत दवाखान्याचा खर्च; जाणून घ्या केंद्र सरकारच्या या योजनेविषयी..

snake entered the ear: महिलेच्या कानात शिरला साप; पुढे काय घडलं तुम्हीच पाहा..

PAKvsAFG: डिवचल्यानंतर अफगानच्या फॅनने पाकिस्तान चाहत्यांची खुर्चीने केली फिल्मी स्टाईल धूलाई; पाहा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.