PAKvsAFG: डिवचल्यानंतर अफगानच्या फॅनने पाकिस्तान चाहत्यांची खुर्चीने केली फिल्मी स्टाईल धूलाई; पाहा व्हिडिओ..

PAKvsAFG: काल अफगाणिस्तान आणि पाकिस्तान afganistan vs Pakistan) यांच्यामध्ये दुबईच्या Sharjah क्रिकेट मैदानावर आशिया कपमधील (Asia Cup) महत्त्वपूर्ण सामना पार पडला. या सामन्याकडे फक्त पाकिस्तानात आणि अफगाणिस्तान चाहत्यांचेच नाही, तर भारताच्या चाहत्यांचे (Indian fan) देखील लक्ष लागलं होतं. पाकिस्तानच्या पराभवावर भारतीय संघाचे फायनलमध्ये पोहचण्याचे भवितव्य अवलंबून होतं. साहजिकच यामुळे भारतीय चाहत्यांचे लक्ष देखील या सामन्याकडे लागलं होतं. मात्र अखेरच्या षटकांत लगातार दोन षटकार खेचून पाकिस्तानने आशिया कपच्या फायनलमध्ये (Asia Cup final) धडक मारली आणि भारत त्याचबरोबर अफगाणिस्तानचे देखील या स्पर्धेमधील आव्हान संपुष्टात आले.

हा सामना अफगाणिस्तानबरोबर भारतासाठी देखील महत्त्वाचा होता. एकीकडे हे जरी खरं असतं तरी, दुसरीकडे मात्र हा सामना आहे एका भलत्याच कारणामुळे चर्चेत राहिला. या सामन्याला गालबोट लागल्याचे देखील पाहायला मिळाले. सामना सुरू असताना 19 व्या षटकात फरीद अहमद याने पाकिस्तानचा धोकादायक फलंदाज असिफ अलीला बाद केल्यानंतर, जल्लोष साजरा केला. मात्र हा जल्लोष पाकच्या खेळाडूंना पचणी पडला नाही. आणि त्याने थेट गोलंदाजावरच बॅट उगारल्याचे पाहायला मिळाले. वेळीच अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी मध्यस्थी येऊन भांडण मिटवलं. मात्र दुसरीकडे सामना संपल्यानंतर, स्टेडियममध्ये देखील अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या चाहत्यांमध्ये फिल्मी स्टाईल मारामारी झाल्याचे पाहायला मिळाले.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामधील सामना रोमांचक स्थितीत आला असताना, पाकचा चाहता जर्सी घालून जोरदार डान्स करताना सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याच्या भोवती असणारे पाकिस्तानचे चाहते देखील त्याला उत्साहित करत असल्याचे दिसत आहे. हा चाहता मिळालेल्या सपोर्टचा फायदा उठवत वर बसलेल्या अफगाणिस्तानच्या चाहत्यांना आपल्या डान्सच्या माध्यमातून डिवचत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र अफगाणिस्तानचे चाहते शांत खुर्चीवर बसून सामना पाहत असल्याचे दिसत आहे.

कालपासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या चाहत्यांमध्ये स्टेडियममध्ये तुफान राडा झाल्याची चर्चा जोरदार रंगली असतानाच सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याने आता दोन्ही संघाच्या चाहत्यांमध्ये तुफान राडा झाल्याचे सिद्ध झाले आहे. सोशल मीडियावर दोन व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या दोन्हीं व्हिडिओमधील पहिल्या व्हिडिओमध्ये अफगाणिस्तानच्या चाहतत्यांना पाकिस्तानचा एक चाहता डान्सच्या माध्यमातून डिवचत असल्याचं दिसत आहे. मात्र जर्सी घातलेल्या चाहत्याला कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया अफगाणिस्तानचे चाहते देताना दिसत नाहीत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दुसऱ्या व्हिडिओत मात्र अफगाणिस्थानचे चाहते सामना संपल्यानंतर घरी जाताना पाकिस्तानच्या चाहत्यांना खुर्चीने मारहाण करताना दिसत आहेत. अक्षरशः अफगाणिस्तानचे चाहते फिल्मी स्टाईल मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज आणि रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून परिचित असणारा शोएब अख्तर याने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.

अफगाणिस्तान चाहत्यांकडून पाकिस्तानच्या चाहत्यांना झालेल्या मारहाणीवर शोएब अख्तरने हे खूप दुर्दैवी असल्याचे म्हंटले आहे. एवढंच नाही, तर त्याने खेळाडू आणि चाहत्यांना याबाबत दोष दिला आहे. अफगाणिस्तानचे खेळाडू आणि चाहत्यांना समज देणे आवश्यक आहे. प्रत्येक वेळी त्यांच्याकडून असे कृत्य केले जातं. जर त्यांचे क्रिकेट सुधारायचं असेल, तर त्यांच्या क्रिकेट बोर्डाने देखील यावर लक्ष देणे आवश्यक आहे, असंही म्हटले आहे.

हे देखील वाचा snake entered the ear: महिलेच्या कानात शिरला साप; पुढे काय घडलं तुम्हीच पाहा..

एकवेळ मी त्याच्याशिवाय राहीन, पण मी सेक्स शिवाय राहूच शकत नाही; दिशा पटाणीच्या स्फोटक मुलाखतीने खळबळ..

Relationship Tips: दीर्घकाळ सिंगल राहणाऱ्या लोकांच्या शारीरिक आणि मानसिकतेवर होतात हे 5 गंभीर परिणाम..

Relationship Tips धोकेबाज पार्टनरमध्ये असतात ही लक्षणे; आताच जाणून घ्या अन्यथा आयुष्य होईल उद्ध्वस्त..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.