Best Partner Tips: योग्य जिवनसाथी निवडताना या गोष्टींची घ्या विशेष काळजी अन्यथा..

0

Best Partner Tips: आपल्या जिवनात (life) काही लोकांचे स्थान फार महत्वाचे असते. त्यापैकीच एक आपला जिवनसाथीदार (partner) असतो. कारण आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तो आपल्यासोबत असतो. सुख दु:खात समानतेने सहभागी होतो. अनेकदा पाठीवर हात ठेऊन धीर देतो, प्रेरीत करतो. त्यामुळे जिवनसाथी एकप्रकारे आपले पुढील आयुष्यच ठरवतो. हे प्रत्येकजण मान्य करेल. आपल्याला समजावुन घेणारा, वेळप्रसंगी आपली साथ देणारा, चेहर्‍यावरील हावभावांवरुन आपल्या मनातल्या भावना ओळखणारा जिवनसाथी प्रत्येकालाच हवा असतो. कारण जिवनसाथी निवडण्यात झालेली चुक, पुढे पुर्ण आयुष्यभर आपल्यासाठी डोकेदुखी ठरु शकते. त्यामुळे प्रत्येकजण योग्य जिवनसाथीच्या शोधात असतो.

अनेकदा घाईगडबडीत घेतलेले निर्णय धोकादायक ठरु शकतात. जिवनासाथी निवडण्याचा निर्णय म्हणजे जिवनातील फार महत्वाचा निर्णय असतो. त्यामुळे अशावेळी शांतता आणि संयम राखणे फार गरजेचे आहे. काही शक्यता-कुशक्यता पडताळुनच आपण योग्य जिवनसाथीची निवड करायला हवी. आपल्या स्वभावाशी जुळवुन घेणारा, आपल्या अपेक्षेप्रमाणे योग्य जिवनसाथी शोधण्यासाठी काही गोष्टी फायदेशीर ठरु शकतात. याच गोष्टी आम्ही तुम्हाला याठिकाणी सांगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया सविस्तर.

आरशाप्रमाणे असावा जिवनसाथी

मित्र हे आरशाप्रमाणे असावेत, असं आपण बर्‍याचदा ऐकतो. चुका लक्षात आणुन देणारे, त्या चुका दुरुस्त करुन वेळप्रसंगी आपल्याला शहाणे करणारे. त्याचप्रमाणे जिवनसाथी स्त्री असो वा पुरुष तो आरशाप्रमाणे पारदर्शी असावा. ईंप्रेस करण्याच्या नादात आपल्या ‘हो’ मध्ये हो मिळवणारे पुष्कळ असतात. परंतू चुका लक्षात आणुन देणारे कमी असतात. चुका कळल्याच नाही, तर त्या टाळणे कठिण होऊन जाते. त्यामुळे चुका लक्षात येणे फार गरजेचे आहे. आणि म्हणूनच आपला जिवनसाथी चुका लक्षात आणुन देणारा, आपल्या स्वभावाचे प्रतिबिंब आरशामध्ये दाखवणारा असावा.

एकमेकांना ऐकुण घेण्याची क्षमता असावी

आयुष्यभर एकमेकांचा साथ निभावण्यासाठी अगोदर एकमेकांना समजुन घेणे फार गरजेचे आहे. एकमेकांचे म्हणने ऐकणे, विश्वासात घेऊन समजावुन सांगणे जरुरीचे असते. मात्र बर्‍याचदा काहीजण एकमेकांचे ऐकुण घेण्याच्या तयारीत नसतात. परिणामी एखादा प्रश्न सुटण्याऐवजी त्याचा गुंता अधिक वाढत जातो. त्यामुळे एकमेकांचे ऐकुण घेणे अत्यंत महत्वाचे असते. आणि म्हणूनच जिवनसाथीची निवड करतांना तो आपले किती ऐकुन घेतो, आपल्याला किती समजुन घेतो, हे बघणे गरजेचे असते.

संशयी स्वभाव नसावा

संशय काहीजणांच्या स्वभावातच असतो. छोट्या-छोट्या गोष्टींकडेसुद्धा अशी लोक संशयाने बघत असतात. परंतू हाच संशयी स्वभाव कालंतराने नात्यात येतो आणि नात्यात दुरावा निर्माण करतो. त्यामुळे संशयी स्वभावाच्या व्यक्तींशी अंतर ठेवलेलेच बरे असते. सतत संशय घेतल्याने ताण-तणाव वाढतो आणि त्याचा थेट परिणाम नात्यावर होऊन शेवटी त्या नात्याचा अंत होतो. त्यामुळे थोडा वेळ घेऊन जिवनसाथीचा स्वभावसुद्धा आपल्याला ओळखता आला पाहिजे.

हक्क सांगणारा नसावा

काही ऊदाहरणं अशीसुद्धा असतात, जसे की आपल्या साथीदारावर कायम आपला हक्क सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे साथीदारावर कायम बंधने लादली जातात. अशाप्रकारे कपडे घाल, अशाचप्रकारचे खात जा, मी म्हणेन तेच करायचं वगैरे अट्टाहास केला जातो. साथीदार मोकळीक देणारा असवा हक्काच्या नावाखाली बंधने लादणारा नसावा. त्यामुळे अशा हक्क सांगणार्‍या साथीदारांपासूनसुद्धा सावधगिरी बाळगलेलीच बरी असते.

हे देखील वाचा Relationship Tips धोकेबाज पार्टनरमध्ये असतात ही लक्षणे; आताच जाणून घ्या अन्यथा आयुष्य होईल उद्ध्वस्त..

flipkart big billion days: स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉप, फ्रीजसह अनेक वस्तूंवर तब्बल 50% हून अधिक डिस्काउंट; जाणून घ्या कधी सुरू होतोय सेल..

Motorola: 200MP कॅमेरा असणारा Motorola चा हा  स्मार्टफोन लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये..

Sport shoes: तब्बल 72 टक्के डिस्काउंटवर खरेदी करा Reebok, Adidas, Redtape कंपनीचे शूज; पाहा कुठे सुरू आहे ऑफर..

Ayushman Card: या योजनेअंतर्गत मिळतो पाच लाखांपर्यंत दवाखान्याचा खर्च; जाणून घ्या केंद्र सरकारच्या या योजनेविषयी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.