Bacchu Kadu: बच्चु कडूंना या कारणामुळे खावी लागणार १४ दिवस जेलची हवा; या कारणांमुळे देवेंद्र फडणवीसांनीच केला करेक्ट कार्यक्रम..

0

Bacchu Kadu: आपल्या फायर अंदाजाने नेहमी चर्चेत राहणारे आमदार बच्चु कडु (Bacchu Kadu) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गिरगाव न्यायालयाने (girgav court) हा आदेश जारी केलाय. बच्चु कडु आता पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांना मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशनला (Bacchu Kadu arrested girgaon police) नेण्यात आले आहे. राजकीय आंदोलन केल्याच्या गु न्ह्या प्रकरणी न्यायालयाने हा आदेश जारी केलाय. २०१८ मध्ये एक राजकीय आंदोलन केल्याच्या पार्श्वभूमिवर कडूंवर गु  न्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी बच्चु कडूंनी जामिनासाठी अर्ज देखील केला होता. मात्र कोर्टाने हा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुऴे बच्चु कडुंना हा मोठा झटका मानला जातो आहे. बच्चू कडू ना राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली असली तरी या पाठीमागे देवेंद्र फडणवीस असल्यास चर्चा जोरदार रंगली आहे. त्या पाठीमागे कारणही तसंच आहे. (Bacchu Kadu and Devendra fadnavis)

महाराष्ट्रात (Maharashtra) सत्तेत असणार्‍या शिंदे गटात (Shinde gat) सामिल असून देखील बच्चु कडुंवर अशाप्रकारे कारवाई होणे अनेकांसाठी आश्चर्यकारक आहे. राजकीय वर्तुळात याचे पडसाद बघायला मिळत असून, विविध चर्चांना ऊधान आले आहे. आपल्या हटके आंदोलनांसाठी बच्चु कडु नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या आंदोलन करण्याच्या पद्धतींमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष खेचण्याची ताकद असते. गुन्ह्यांची पर्वा बच्चु कडु कधीच करत नाहीत. या अगोदर कामात हलगर्जीपणा केल्याच्या आरोपांवरुन सरकारी कर्मचार्‍यांना कर्तव्यावर असतांना त्यांनी बडवले आहे. अशा एक ना अनेक गुन्ह्यांमधून क्लीन चीट मिळालेले बच्चु कडु नेमके आताच कसे काय अडकलेत? असा प्रश्न त्यांच्या समर्थकांसह अनेकांना पडला आहे. दरम्यान बच्चु कडु यांनी पुन्हा जामिनासाठी अर्ज केला असल्याची माहिती सुद्धा सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. मात्र हा जामीन देखील रद्द होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. आणि या पाठीमागे देखील देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) असल्याचं बोललं जात आहे.

चौकशींच्या भितीने शिंदेंना दिला होता पाठिंबा

बच्चु कडुंवर महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये गु न्हे दाखल आहेत. तसेच मध्यंतरी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे काही आरोप सुद्धा करण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये (maha Vikas aghadi) मंत्री असतांना कडु भाजपाचे (bjp) कट्टर विरोधक मानले जायचे. भाजपावर कडाडून टीका करण्यात कडु अग्रेसर असायचे. मग अचानक नेमके असे काय झाले की, भाजपासोबत सत्ता स्थापन करु इच्छिणाऱ्या शिंदे गटाला त्यांनी पाठिंबा दिला. यामागे अनेक कारणे असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात तेव्हा सुद्धा रंगल्या होत्या. शिंदे गटात सामिल होणार्‍या काही आमदारांना ईडीचा (ED) धाक दाखवण्यात आला होता. तर काहींना विशीष्ट चौकशी मागे लावण्याची भिती दाखवण्यात आली होती. तर काहींना खोके देऊन विकत घेतलं असल्याचे देखील चर्चा सर्वसामान्यांमध्ये आहे. बच्चु कडु त्यातीलच एक होते. चौकशीच्या भितीने बच्चु कडूंनी शिंदे गटाला पाठिंबा दिला असल्याच्या चर्चांना सत्तांतरादरम्यान ऊधान आले होते.

चौकशी न करण्याची फडवीसांनी दिली होती खात्री

एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेबरोबर बंडखोरी करताच, या बंडखोरीमागील मुख्य सुत्रधार कोण आहेत? याची खबर संपूर्ण महाराष्ट्राला होती. महाविकासआघाडी सरकारला धक्का देतांना त्याची तीव्रता एवढी असावी, की सरकार पडण्यापासून कुणीच वाचवु शकता कामा नये, यासाठी फार पूर्वीपासून योजना आखल्या जात असल्याच्या चर्चा ऐकायला मिळतात. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील जास्तीत जास्त आमदार शिंदे गटाच्या गळाला कसे लावता येणार? याबाबतची तयारी सुरु झाली होती. ही जवाबदरी फडणवीसांवरच असल्याची सुद्धा चर्चा होती. त्यामुळे राज्यातील या सत्तानाट्यादरम्यान फडणवीसांनी बच्चु कडुंना काही आश्वासने दिली होती. ज्यामध्ये चौकशी न लावण्याची खात्री पटवुन देण्यात आली होती. अशा चर्चा तेव्हा कानावर येत होत्या.

वरचढ ठरत असल्याचे बघुन करेक्ट कार्यक्रम..

बच्चु कडु महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री  होते. तरी सुद्धा एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. पूर्वीच्या सरकारमध्ये मंत्री असल्यामुळे शिंदे गट आणि भाजपाच्या नविन सरकारमध्ये पूर्वीपेक्षा चांगले खाते मिळणार अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र या नव्या सरकारच्या मंत्रीमंडळात बच्चु कडु यांना वगळण्यात आले. बच्चु कडुंना मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने काही काळ नाराजी नाट्य रंगले. बच्चु कडुंनी नाराज असल्याचे जाहीर केले नसले, तरी त्यांच्या हावभावावरुन ते लक्षात येत होते. कारण ते वारंवार एकनाथ शिंदेंच्या भेटी घेत होते. बच्चु कडुंनी अद्यापही मंत्रीपदाचा नाद न सोडता शिंदेंवर दबाव वाढवणे कायम ठेवले. परंतू बच्चु कडु यामध्ये वरचढ ठरत असल्याचे लक्षात येताच, पुन्हा काही योजना आखण्यात आल्यात आणि बरोबर वेळ साधून करेक्ट कार्यक्रम करण्यात आला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. या पाठीमागे मुख्य सूत्रधार देवेंद्र फडणवीस असल्याचं देखील बोललं जात आहे.

बच्चू कडूंनी घेतली माघार.

केंद्रीय यंत्रणांकडून कोणत्याही प्रकारची चौकशी होऊ नये, त्याचबरोबर या प्रकरणांमधून देखील क्लिन चिट मिळावी यासाठी बच्चू कडू देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदत मागत असल्याचं देखील बोललं जात आहे. कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज असणारे बच्चू कडू येणाऱ्या काळात मोठं आंदोलन उभारणार असल्याची चर्चा रंगली होती. भविष्यात बच्चू कडू यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं आंदोलन उभारलं जाऊ नये याची देखील उपाययोजना देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचं बोललं जात आहे. कॅबिनेट मंत्री पदाचा आग्रह धरणाऱ्या बच्चू कडूंनी आता आपल्याला भविष्यात कोणतेही मंत्री पद नको, मात्र या प्रकरणातून क्लिनचीट मिळावी अशी देखील मागणी फडणवीस यांच्याकडे केली असल्याचं बोललं जात आहे.

हे देखील वाचाAmazon Great Indian Festival: आतापर्यंतचा सगळ्यात मोठा सेल! Samsung रेडमीसह अनेक स्मार्टफोन मिळतायत निम्म्या किंमतीत.. 

Yoga Asanas For Married Couple: वैवाहिक जिवनातला आनंद द्विगुणित करतात ही योगासने..

women notice about men: पुरुषांच्या या गोष्टींकडे महिलांचं असतं बारीक लक्ष; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

Heart attack symptoms: हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी जाणवतात ही लक्षणे; त्वरित सावध व्हा अन्यथा..

Tea side effect: चहासोबत ब्रेड खात असाल तर त्वरित थांबवा; चहा सोबत ब्रेड खाण्याचे हे आहेत जीव घेणे दुष्परिणाम..

PM kisan: शेतकऱ्यांनो फक्त ya नंबरवर कॉल करा, आणि 12 वा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार याची माहिती मिळवा..

sexual partner: या कारणांमुळे तीन-तीन पुरुषांसोबत महिला ठेवतात संबंध; NFHS च्या अहवालात धक्कादायक माहिती आली समोर..

NABARD Recruitment 2022: नाबार्डमध्ये निघालीय बंपर भरती; पदवीधरांसाठी आहे सुवर्णसंधी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.