Yoga Asanas For Married Couple: वैवाहिक जिवनातला आनंद द्विगुणित करतात ही योगासने..

Yoga Asanas For Married Couple: खाण्यापिण्याच्या सवयी आणि एकंदरीतच लाईफस्टाईल (lifestyle) बदलल्यामुळे मानवी शरीर विविध व्याधींनी जखडलेले असते. पूर्वी वृद्धांना वाढत्या वयामुळे होणारे आजार आता तरुणांमध्ये सुद्धा बघायला मिळत आहे. त्यामुळे आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज तज्ज्ञ वर्तवतात. आज आपण बघतो की पैसा, संपत्ती पुष्कळ असून देखील लोक आंनदी (happy) नाहीत. त्याचे कारण कमी वयात होणारे विविध आजार health) आहे. त्यामुळे रोज नियमित व्यायाम करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. व्यायामात योगासनांना विशीष्ट महत्व प्रदान करण्यात आले आहे. आरोग्या प्रती सजग असणार्‍यांनी आता योगासनाकडे आपला कल वाढवला आहे. (Yoga Asanas For Married Couple)

योगासने शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी प्रचंड फायदेशीर आहेत. भारतीयांसोबतच आता ईतर देशांतील नागरिकांनी सुद्धा योगासनांचे महत्व जाणले आहे. त्यामुळे योगासनांना आता आंतरराष्ट्रीय दर्जावर मान्यता मिळालीय. आरोग्याकडे गांभीर्याने बघणार्‍यांनी योगासनांना आपल्या रोजच्या जिवनातील एक भागच बनविले आहे. योगासने शारीरीक सुदृढते सह मनशांती सुद्धा करतात. अध्यात्मात सुद्धा योगांचे महत्व आहे. परंतू आज आम्ही योगासने करण्याचा विशीष्ट फायदा तुम्हाला सांगणार आहोत. अनेकदा शारीरीक कमजोरी आल्यामुळे वैवाहिक जिवनातला रस नाहीसा होतो. त्यामुळे नात्यात दुरावा येऊन नेैराश्य आल्यासारखे जाणवते. मात्र काही योगासने तुमच्या वैवाहिक जिवनात पुन्हा आंनद भरु शकतात. त्या योगासनांबद्दलच आम्ही तुम्हाला याठिकाणी सांगणार आहोत.

पद्मासन

पद्मासन विविध आजारांवर प्रभावी आहे. स्नायुंमधील कमजोरी, पोटाचे विकार, गुडघ्यांचा त्रास, मुत्राशय या संबंधीत आजारांची तीव्रता पद्मासनाच्या सहाय्याने कमी करता येते. यामध्ये पाठीचा कणा सरळ ठेऊन पाय पुढे पसरवावा लागतो. यानंतर दोन्ही हात विरुद्ध मांडीवर ठेवून पायाची टाच पोटाच्या दिशेने आणायची असते. दोन्ही हात गुडघ्यावर ठेऊन, मुद्रेच्या स्थितीत बसावे. दीर्घ श्वास घ्यावा. या आसनामुळे शरीराच्या विविध भागावर ताण जाणवतो. या आसनामुळे लैंगिक शक्ती वाढण्यात सुद्धा मदत होते.

चक्रासन

चक्रासनामध्ये शरीराला काहीप्रमाणात चक्रासारखे स्वरुप येते. त्यामुळे यांस चक्रासन म्हटले जाते. चक्रासनाचे पुष्कळ फायदे आहेत. नैराश्य आणि नकारात्मकता चक्रासनामुळे दुर होते. शरीर आणि मन दोघांनाही कायम ऊत्साही आणि प्रफुल्लीत ठेवण्याचे काम चक्रासन करते. चक्रासनामुळे सकारात्मकता वाढते आणि शरीराला ऊर्जा प्रदान होते. चक्रासनाचा नियमीत सराव केल्यास मणका व शरीर लवचिक बनते. पाठीच्या दुखण्यावर सुद्धा चक्रासन प्रभावी आहे. कायम सकारात्मक आणि आनंदी वाटत असल्याने वैवाहिक जिवनातील निराशा सुद्धा दुर होते.

*सर्वांगासन*

सर्वांगासनाचा नियमीत सराव वजन वाढण्यावर प्रतिबंध घालतात. थॉयरॉईडची समस्या असणार्‍यांसाठी सर्वांगासान फारच प्रभावी आहे. हे आसन थायरॉईच्या ग्रंथींना निरोगी ठेवण्यात मदत करते. सर्वांगासन प्रजनन क्षमतेवर सुद्धा सकारात्मक परिणाम करते. या आसनाद्वारे एड्रिनल, शुक्रानुजन्य कॉर्ड आणि बीजांड ग्रंथी मजबुत होतात. परिणामी प्रजनन क्षमता वाढते. या आसनामध्ये कंबरेमध्ये हात ठेवावा, यानंतर पाठीचा कणा, खांदे आणि नितंब एकाच ओळीत आणावे. पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखीवर सुद्धा हे आसन प्रभावी आहे.

भद्रासन

भद्रासन करतांना प्रथम वज्रासनात बसावे. यानंतर गुडघे दुर ठेऊन, पंजे असे असावेत की ते जमिनीला स्पर्श करतील. यादरम्यान हिप्सदेखील जमिनीला स्पर्श करत राहतील. त्यानंतर गुडघ्यांवर हात ठेऊन श्वासोश्वास सुरु ठेवायचा आहे. भद्रासनामुळे संयम आणि एकाग्रता वाढते. ज्याचा फायदा भविष्यात कुठल्याही क्षेत्रात होऊ शकतो. याशिवाय संयम हा नात्यात फार महत्वाचा असतो. नात्यात बर्‍याचदा टोकाची भूमिका घेण्याऐवजी संयमाने भूमिका घ्यावी लागते. जेणेकरुन नाते दीर्घकाळ टिकते. त्यामुळे वैवाहिक जिवनात संयमाला सुद्धा महत्व आहे.

अनुलोम विलोम प्राणायम

अनुलोम विलोम प्राणायम करण्यास अगदी सोपे आहे. अनुलोम विलोम प्राणायम जरी वरुन सहज दिसत असले तरि याचा आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर प्रचंड सकारात्मक परिणाम होतो. हृदयासंबंधीत आजाराची तीव्रता कमी करण्यासाठी तसेच हृदयाला सशक्त करण्यासाठी हे आसन फार ऊपयुक्त आहे.

यामध्ये पद्मासन करत असतांना सुखासनात बसून, नाकपुड्यातून श्वास घ्यावा लागतो. डाव्या नाकपुडीतून श्वास भरावा आणि ऊजव्या नाकपुडीतून सोडावा, असे दोन्ही नाकपुडीतून करावे लागते. एकावेळी या प्राणायमाचा किमान १० ते १५ वेळा सराव करावा. या योगासनामुळे ऊत्तेजना वाढते, ज्यामुळे लैगिक क्षमतेत वाढ होते. तणाव नाहीसा होतो, यामुळे तुम्ही लैंगिक जिवनाचा मनमुराद आनंद घेऊ शकता.

हे देखील वाचाwomen notice about men: पुरुषांच्या या गोष्टींकडे महिलांचं असतं बारीक लक्ष; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

Tea side effect: चहासोबत ब्रेड खात असाल तर त्वरित थांबवा; चहा सोबत ब्रेड खाण्याचे हे आहेत जीव घेणे दुष्परिणाम..

Heart attack symptoms: हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी जाणवतात ही लक्षणे; त्वरित सावध व्हा अन्यथा..

PM kisan: शेतकऱ्यांनो फक्त या नंबरवर कॉल करा, आणि 12 वा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार याची माहिती मिळवा..

sexual partner: या कारणांमुळे तीन-तीन पुरुषांसोबत महिला ठेवतात संबंध; NFHS च्या अहवालात धक्कादायक माहिती आली समोर..

Eggs Benefits: अंडी खात असाल तर सावधान! रोज किती अंडी खावीत? अंडी खाण्याचे परिणाम जाणून जाल चक्रावून..

NABARD Recruitment 2022: नाबार्डमध्ये निघालीय बंपर भरती; पदवीधरांसाठी आहे सुवर्णसंधी..

Marriage Tips: लग्नानंतर महिलांना या गोष्टीची असते सर्वात जास्त भिती; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

Marriage Tips: या ६ पदार्थांचा आहारात करा समाविष्ट; लैंगिक क्षमता वाढून मिळेल भरपूर आनंद..

ITBP Recruitment 2022: ITBP मध्ये निघाली बंपर भरती; 12 वी उत्तीर्ण उमेदवारांनो लवकर करा अर्ज..

Lampi Virus: लम्पी रोगाचा महाराष्ट्रातही कहर; आपल्या जनावरांना वाचवण्यासाठी आत्ताच करा हे काम अन्यथा..

Pitru Paksha 2022: कावळ्या व्यतिरिक्त पितृपंधरवड्यात आपले पूर्वज या तीन रूपात देतात आशीर्वाद; त्यांना उपाशी पाठवणं असतं अशुभ..

Indian Army NCC Recruitment 2022: या उमेदवारांना भारतीय सैन्यात नोकरीची सुवर्णसंधी; पगार 50 हजार ते 2 लाखांपर्यंत..

Google pay loan: आता Google pay देणार एक लाखापर्यंतचे लोन; जाणुन घ्या कसा करायचा अर्ज..

PMMVY: या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना मिळतात पाच हजार रुपये; जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ..

Extramarital affairs: या 6 कारणांमुळे ठेवले जातात विवाहबाह्य संबंध; विवाहबाह्य संबंधापासून दूर राहायचं असेल तर करा या गोष्टी..

Jobs in Maharashtra: बारावी आणि ग्रॅज्युएशन विद्यार्थ्यांनासाठी नोकरीची सुवर्णसंधी! परीक्षा विना केली जाणार निवड; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.