Peanuts With Alcohol: दारू सोबत शेंगदाणे खाण्याचे काही फायदे आहेत, पण दुष्परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन ..

0

Peanuts With Alcohol: दारु आणि चखना यांचं अनोखं समीकरण आहे. दारु म्हणलं की चखणा आलाच. दारु पितांना चखण्याचे महत्व काय? हे दारु पिणाराच जाणतो आणि तोच सांगू शकतो. विशेषत: या चखन्यामध्ये शेंगदाण्यांना (Peanuts With Alcohol) फार महत्व दिले जाते. फ्राईड शेंगदाने किंवा थोडेसे उकळून त्यावर मीठ टाकलेल्या शेंगदाण्याचा दारुसोबत चखना म्हणून सर्वाधिक ऊपयोग केला जातो. चखना म्हणून बर्‍याचदा फ्राईड काजू किंवा चणे सुद्धा वापरतात. मात्र शेंगदान्यांना जास्त महत्व देण्यात येते. दारु पिण्यार्‍यासोबत गेलेले दारु न पिणारे सुद्धा या शेंगदान्याच्या (Peanuts With Alcohol) चखन्यावरच विशेष ताव मारतात. महत्वाची बाब म्हणजे दारूचे व्यसन हे खूप भयानक आहे, शक्यतो दारुपासून चार हात लांब राहिलेलं कधीही चांगले.

मोठ्यातल्या बारपासून ते देशी दारुच्या ठेल्यापर्यंत या शेंगदाण्याला (Peanuts With Alcohol) फारच महत्व दिले जाते. उन्हाळ्यात चखणा म्हणून कच्च्या कैरीचा देखील काही लोक वापर करतात. शेंगदाण्यामध्ये असे काय असते, जे मद्यपींचे एवढे मन जिंकून घेते. काही मद्यपी तर असेदेखील आहेत, ज्यांना चखन्यात शेंगदाणे नसल्यास दारु गोडच लागत नाही. त्यामुळे अनेकांना हा प्रश्न पडलेला असतो की, शेंगदाण्याला एवढे महत्व का? शेंगदाण्यामध्ये नेमके असे काय असते? तर या प्रश्नांचीच ऊत्तरे जाणुन घेण्याचा प्रयत्न आज आपण या लेखातून करणार आहोत. परंतू पुन्हा एकदा आम्ही आपणास सांगत आहोत, दारूचे व्यसन हानिकारक आहे.

तुम्हाला हे माहितीच असेल, बर्‍याचदा कोण किती दारु पितो हा इगोचा विषय होऊन जातो. तर अनेकदा एखाद्याच्या मनातले काही काढून घेण्यासाठी त्याला बळजबरीने त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त दारु पाजली जाते. चखना म्हणून शेंगदान्याचा (Peanuts With Alcohol) वापर होण्यामागे हे एक कारण आहे. शेंगदाण्यामुळे तहान जास्त लागते. मीठ पाणी शोषून घेण्याचे काम करते. त्यामुळे खारवलेले शेंगदाने खाल्ल्यास तुमचे तोंड कोरडे होते आणि त्यामुळे तुम्ही लगेच शेंगदान्यासोबत दारुचा घोट घेता. ही प्रक्रिया सातत्याने सुरु राहते. ज्यामुळे तुम्हाला लक्षात येण्याअगोदरच तुमचे क्षमतेपेक्षा जास्त मद्यपान होते. त्यामुळे खारवलेल्या शेंगदान्यांचा चखना म्हणूण वापर करण्यात हे एक महत्वाचे कारण सांगितले जाते. हेही वाचा: Marriage Tips: लग्नानंतर महिलांना या गोष्टीची असते सर्वात जास्त भिती; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

दारुचा कडवटपणा:
दारु ही कधीच थेट घेतली जात नाही. एकतर दारुला सोडा किंवा सॉफ्ट ड्रिंकमध्ये मिसळून घेण्यात येते किंवा दारु पाण्यामध्ये मिसळून सुद्धा घेतली जाते. कारण दारुमधील अल्कोहोल हे काहीसे कडवट असते. त्यामुळे तोंडाची चव खराब होते. शेंगदाणे (Peanuts With Alcohol) यावर उत्तम उपाय म्हणून काम करते. दारुचा कडवटपणा कमी करण्यात किंवा तोंडाची चव बिघडू न देण्याच काम, दारु पितांना चखना असणारे शेंगदाणे करतात. खारट शेंगदाणे स्वाद ग्रंथींवर थेट परिणाम करतात. परिणामी दारुमुळे बिघडलेली तोंडाची चव पुन्हा व्यवस्थित करता येते. एकंदरीत चखना म्हणून शेंगदाने वापरल्यास दारु पिण्यास सोपे जाते.

बिअर सोबत शेंगदाणे (Peanuts with Beer): दारु शरीरासाठी हानिकारक असते. दारुमध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असल्यामुळे थेट मेंदु आणि हृदयावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे डॉक्टर सुद्धा सहसा दारुपासून दुर राहण्याचेच सांगतात. बीअरचे मात्र तसे नसते. बीअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण फार कमी असते. यासोबतच बीअरमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि काही जिवनसत्वांचा समावेश असतो. बीअर आणि शेंगदाने यांचे मिश्रण शरीरासाठी फायदेशीर असल्याचे काही शास्त्रज्ञांचे सुद्धा मत आहे. शेंगदाने आणि बीअर यांचे मिश्रण झाल्यास शरीरातील खनिजांची कमी भरुन निघत असल्याचेदेखील काहींचे मत आहे. त्यामुळे आपण असेही बघतो की दारुऐवजी बरेच लोक बीअरला प्राधान्य देतात. (तरीही आम्ही तुम्हाला बियर प्या असा सल्ला देत नाही. कारण इथूनच दारूच्या व्यसनाला सुरुवात होत असते.) हेही वाचा: सेक्समुळे महिलांचे वजन वाढते? जाणून घ्या लग्नानंतर वजन वाढण्याची कारणे

शेंगदाणे शरीरासाठी हानीकारक:
चखना म्हणून दारुसोबत शेंगदाण्याला पहिली पसंती मिळत असली, तरीदेखील शेंगदाने हे शरीरासाठी अपायकारक आहेत. याशिवाय शेंगदाणा आणि अल्कोहोलचे एकाचवेळेस सेवन केल्यास त्यांचे मिश्रण सुद्धा शरीरावर परिणाम करतात. शेंगदान्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक असते. अल्कोहोल सुद्धा शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढवते. त्यामुळे मद्यपींना हृदयासंबंधित विकार जडण्याची शक्यता सर्वाधिक असते. शेंगदान्यात फॅटची मात्रा सुद्धा पुष्कळ असते. त्यामुळे शेंगदान्याचे अतिरीक्त सेवन तुमचे वजन झपाट्याने वाढवते. शेंगदाणे आणि दारु पचनक्रियेवर देखील परिणाम करतात. शेंगदाणे पचायला जड असतात. त्यामुळे पोटाचे विकार होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. तसेच अल्कोहोल आणि शेंगदान्याचे मिश्रण झाल्याने शरीरातील पोषक तत्वाचे शोषण मंदावते.

परंतू एवढं सगळं जरी असले तरी दारु पिणाऱ्या लोकांना हे समजेल का? हा देखील प्रश्न आहे. कारण बरेच लोक एवढ्या प्रमाणात दारु पित असतात, की सतत त्यांना नशेत राहण्याची सवय असते. दारूमुळे बरीच कुटुंबे उद्ध्वस्त झालेली आहेत. कुटुंबातील इतर लोक दारुड्या व्यक्तीमुळे कायमस्वरूपी चिंतेत असतात. काही लोक तर अक्षरशः रात्रभर रस्त्याच्या कडेला पडलेली असतात. अशात बऱ्याच लोकांना जीव गमवावा लागला आहे. त्यांच्या कुटुंबाची काय अवस्था असते? हे आपण सर्वांनी पाहिले असेलच. आपल्याला आलेला तणाव दूर करण्यासाठी लोक दारु पित असतात. बरीच लोकं कधीतरी दारु पित असतात, परंतु थोड्याशा प्रमाणात घेत असतात. परंतू कुठल्याही गोष्टीचे व्यसन खूप वाईट असते.

हेही वाचा: बच्चु कडूंना या कारणामुळे खावी लागणार १४ दिवस जेलची हवा; या कारणांमुळे देवेंद्र फडणवीसांनीच केला करेक्ट कार्यक्रम..

आतापर्यंतचा सगळ्यात मोठा सेल! Samsung रेडमीसह अनेक स्मार्टफोन मिळतायत निम्म्या किंमतीत.. 

वैवाहिक जिवनातला आनंद द्विगुणित करतात ही योगासने..पुरुषांच्या या गोष्टींकडे महिलांचं असतं बारीक लक्ष; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

चहासोबत ब्रेड खात असाल तर त्वरित थांबवा; चहा सोबत ब्रेड खाण्याचे हे आहेत जीव घेणे दुष्परिणाम..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.