tractor anudan yojana: शेतकऱ्यांनो फक्त ही अट पूर्ण करा; ट्रॅक्टर खरेदीवर केंद्र सरकार देईल 50 टक्के अनुदान..

0

tractor anudan yojana: पूर्वी शेती पारंपारिक पद्धतीने केली जायची. मात्र आता शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाने व्यापून टाकले आहे. शेतीच्या प्रत्येक कामात आज यंत्रांचा समावेश झाला आहे. पूर्वी यंत्रांच्या जागी माणसं काम करायची. त्यामुळे वेळही पुष्कळ लागायचा आणि कामही कमी व्हायचे. परंतू यंत्रांमुळे आता या परिस्थितीत मोठा बदल बघायला मिळतो आहे. यंत्रांमुळे कामाचा वेग वाढलाय. त्यामुळे पेरणी असो किंवा कापनी हे काम काही मिनीटांत पूर्ण होऊ लागले आहे. फवारनी करण्यासाठी हात पंपांचा वापर केला जातो. मात्र लवकरच याची जागा आता ड्रोन घेऊ शकतात. पूर्वी पेरनीसाठी बैलाच्या साहाय्याने शेतीची कामे केली जायची. मात्र आता बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. (PM kisan tractor Yojana)

निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे शेती करणे सुद्धा आज अवघड होऊन गेले आहे. ऊन, वारा आणि पाऊस बेभरवशाचे झाल्याने अनेकदा तोंडचा घास हिरावुन घेतल्याचा प्रकार शेतकर्‍यांसोबत नेहमीच घडतो. परिणामी हळूहळू शेती करण्याकडे कल कमी होतो आहे. मात्र भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेती भारताचा आधार आहे. त्यामुळे भारतातील शेती जगवणे हे धोरणकर्त्यांसमोरील मोठे आव्हान झाले आहे. त्यामुळे वेळोवेळी शेतकर्‍यांसाठी लाभदायी ठरणार्‍या योजना शासनाकडून राबवण्यात येत असतात. जेणेकरुन शेतकरी या योजनांचा लाभ घेऊन आपल्या ऊत्पादनात भर घालु शकेल. याशिवाय कुठल्याही नुकसानास तोंड देण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. शेतीतील वाढते आधुनिकीकरण बघता, केंद्र सरकारच्या वतीने अशीच एक योजना शेतकर्‍यांसाठी लॉन्च करण्यात आली आहे. ज्या शेतकर्‍यांना आपल्या शेतीतील कामांसाठी ट्रॅक्टर घेण्याची ईच्छा आहे. अशा शेतकर्‍यांसाठी ही योजना लाभदायी आहे.

पीएम किसान ट्रॅक्टर योजना (PM kisan tractor Yojana) असे या योजनेचे नाव आहे. शेतीच्या कामांमध्ये यंत्रसामग्रीचा वाढता ऊपयोग लक्षात घेता, ट्रॅक्टर (tractor) घेऊ ईच्छिणार्‍या शेतकर्‍यांसाठी शासनाने ही योजना आणली आहे. भारत हा जरी कृषीप्रधान देश असला, तरि सध्या भारतात सर्वात बिकट अवस्था शेतकर्‍यांची आहे. अस्मानी संकटामुळे शेतकर्‍यांना कायम नुकसान सोसावे लागते. त्यामुळे शेतकरी वर्ग कायमच चिंतेत आणि व्यथेत असतो. आर्थिक अडचणींमुळे त्यांना स्वत:च्या ईच्छा आकाक्षांवर पाणी सोडावेच लागते. मात्र त्यासोबतच शेतीसाठी महत्वाची असणारी कामे करण्यात सुद्धा त्यांना अडचणी येतात. आर्थिक अडचणींमुळेच अनेक शेतकर्‍यांना ट्रॅक्ट घेण्याची ईच्छा असून देखील, पैशा अभावी ती ईच्छा पूर्ण करु शकत नाही. परंतू पीएम किसान ट्रॅक्टर योजना तुमची ही ईच्छा पूर्ण करु शकते.

काय आहेत लाभ

पीएम किसान ट्रॅक्टर योजनेचा लाभ तुम्हाला ट्रॅक्टर घेण्यात होणार आहे. नविन ट्रॅक्टर घेताना तुम्ही योजनेचे लाभार्थी असल्यास थेट ५० टक्क्यांपर्यंतची सब्सीडी (subsidy) तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळणार आहे. त्यामुळे आता तुमचे ट्रॅक्टर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. या योजनेअंतर्गत थेट कंपनीतून अर्ध्या किंमतीत ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल. तुम्हाला त्याठिकाणी केवळ ट्रॅक्टरची अर्धीच किंमत द्यावी लागेल. ऊर्वरीत अर्धी किंमत सरकारकडून भरण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलेले आहे.

का घ्यावा योजनेचा फायदा?

शेतीला दिवसेंदिवस आधुनिक स्वरुप प्राप्त होते आहे. कमी वेळात जास्त कामे व्हावीत यासाठी शेतीत यंत्रांचा वापर प्रचंड वाढलाय. सरकारकडून सुद्धा अधिकाधिक यंत्रांचा वापर होऊन तंत्रज्ञानाभिमुख शेती व्हावी असा प्रयत्न करण्यात येत असतो. त्यामुळे शासनस्तरावर यासाठी कायम प्रयत्न सुरु असतात. ट्रॅक्टरचे शेतीत अनन्यसाधारण महत्व निर्माण झाले आहे. पेरणीपासून ते पिक काढनीपर्यंत शेतीत ट्रॅक्टरचा ऊपयोग होतो. याशिवाय काढलेला माल बाजपरपेठांपर्यंत पोहचवण्यासाठी सुद्धा ट्रॅक्टर ऊपयोगी पडते. त्यामुळे ट्रॅक्टर घेण्याकडे शेतकर्‍यांचा विशेष कल असतो. नुकतेच सरकारने जाहीर केलेली ही योजना शेतकर्‍यांना स्वत:चे हक्काचे ट्रॅक्टर घेऊन देण्यात मदत करते. विशेष म्हणजे शेतकर्‍यां संबंधीत ईतर योजनांपेक्षा या योजनेची प्रक्रिया सरळ व सुलभ आहे. त्यामुळे शेतीतील ट्रॅक्टरचा ऊपयोग लक्षात घेता तुम्ही या योजनेचा फायदा घेतला पाहिजे

कसा घ्याल योजनेचा फायदा

पीएम किसान ट्रॅक्टर योजनेबाबत माहिती सांगितल्यानंतर तुम्ही म्हणाल की योजनेचा लाभ कसा मिळवायचा? तर तुमच्या या प्रश्नाचे ऊत्तर सुद्धा आम्ही देणार आहोत. या योजनेचा लाभ मिळवण्याकरिता सर्वप्रथम जमिनीचे कागदपत्रे फार महत्वाची आहेत. शेतकऱ्यांचे आधारकार्ड, बॅंक डिटेल, ज्यामध्ये राष्ट्रीयकृत बॅंकेत खाते त्याचबरोबर दोन पासपोर्ट फोटो यांची गरज पडणार आहे. या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो. यासाठी कुठल्याही जवळच्या कॉमन सर्विस सेंटर (CSC) जाऊन तुम्ही अर्ज करु शकता. व पात्रतेचे सर्व निकष पार करुन या योजनेचा लाभ मिळवू शकता.

हे देखील वाचा wheat chapati side effects: गव्हाची चपाती खात असाल तर त्वरीत करा बंद; चपाती खाण्याचे हे आहेत दुष्परिणाम..

First love also remember: या कारणांमुळे पहिलं प्रेम राहतं कायम लक्षात; ब्रेकअप झाल्यानंतर होतो भयंकर त्रास..

Monthly Income Scheme: इंडिया पोस्ट बॅंकेची जबरदस्त योजना लॉन्च; दरमहा मिळणार 5 हजार रुपये, करा फक्त हे काम..

Peanuts With Alcohol: दारू सोबत शेंगदाणे खाण्याचे काही फायदे आहेत, पण दुष्परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन ..

Husband wife relation: या पाच गोष्टी पासून महिला आपल्या पतीला ठेवतात दूर; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Amazon Great Indian Festival: आतापर्यंतचा सगळ्यात मोठा सेल! Samsung रेडमीसह अनेक स्मार्टफोन मिळतायत निम्म्या किंमतीत..

Bacchu Kadu: बच्चु कडूंना या कारणामुळे खावी लागणार १४ दिवस जेलची हवा; या कारणांमुळे देवेंद्र फडणवीसांनीच केला करेक्ट कार्यक्रम..

Yoga Asanas For Married Couple: वैवाहिक जिवनातला आनंद द्विगुणित करतात ही योगासने. 

kisan: शेतकऱ्यांनो फक्त या नंबरवर कॉल करा, आणि 12 वा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार याची माहिती मिळवा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.