Pashu Adhar Card: आता जनावरांचे आधार कार्ड बनवणे अनिवार्य, केंद्र नोंदणीकृत जनावरांसाठी देणार ‘हे’ लाभ

Pashu Adhar Card: सुट्यांसाठी सहज मौजमजा म्हणून आपण बाहेर कुठेही फिरायला गेलो अथवा एखाद्या महत्वाच्या कामासाठी शासकीय कार्यालयात गेलो तर आधार कार्ड आपल्यासोबत असणे अनिवार्यच झाले असल्यासारखे आहे. आधार कार्ड हे भारतीयांचे ओळखपत्र झाले असल्यासारखे आहे. अनेक ठिकाणी ओळखपत्र दाखवतांना आपण आधार कार्डचा वापर करतो. पूर्वी ड्रायव्हींग लायसन्स किंवा मतदान कार्डचा वापर केला जायचा. मात्र आधार कार्डने आता त्याची जागा घेतली आहे. आधार कार्डवर असणारा १२ अंकी क्रमांक ज्याद्वारे जवळपास आपली सगळीच माहिती मिळवता येते.

 

आधार कार्डला विशेष महत्व प्रदान झालेले आहे. कुठेही नोंदणी करायची असो, शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असो किंवा तुमची ओळख पटवून द्यायची असो या सर्वांसाठी आधार कार्डचा वापर केला जातो. आधार कार्ड बँक खात्यास जोडलेले नसल्यास अनेक शासकीय योजना तथा शिष्यवृत्तींपासून वंचित राहण्याची वेळ तुमच्यावर येते. एखाद्याच्या संपत्तीचे विवरण सुद्धा आधारद्वारे मिळवणे शक्य झाले आहे. त्यामुळे लहाणग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांकडेच आधार कार्ड असतेच. कोरोनामध्ये सुद्धा आधार कार्डने फार महत्वाची भूमिका बजावली आहे. परंतू सरकारने नुकत्याच घेतलेल्या एका निर्णयाने तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

 

माणसांप्रमाणेच आता पशुंना सुद्धा आधार कार्ड (Pashu Adhar Card) जारी करण्यात येणार आहे. पशुंना बायोमेट्रीक ओळख देण्यासाठी पशु आधार कार्ड काढलं जाणार आहे. सरकारने नुकतीच याची घोषणा केली आहे. अलिकडे पशुंसबंधित होणारे आजार बघता त्यांच्या आरोग्याची व स्थितीची एकत्रित माहिती असण्याची गरज भासु लागली होती. याकरिताच पशुंसाठी आधार जारी करुन त्यांच्यासंबंधीत सर्व माहिती एकत्रित केली जाणार आहे. डेअरी ऊद्योगाशी संबंधीत पशुंची सर्वाधिक माहिती या माध्यमाने संकलीत केली जाणार आहे. परिणामी पशुपालन व डेअरी ऊद्योगाला नव्याने चालना देण्यासाठी या माहितीचा उपयोग होऊ शकतो. हेही वाचा: शेतकऱ्यांनो फक्त ही अट पूर्ण करा; ट्रॅक्टर खरेदीवर केंद्र सरकार देईल 50 टक्के अनुदान..

 

लम्पी या आजाराने महाराष्ट्रासह देशभरात कहर करण्यास सुरुवात केलीय. लम्पीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून घेण्यात आलेला हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह मानला जाऊ शकतो. जनावरांना सुद्धा अनेकदा विविध आजारांचा सामना करावा लागतो. बर्‍याचदा रोगीट जनावरांच्या सहवासात आल्यास अथवा त्यांचे दुध वगैरे पदार्थ ग्रहन केल्यास माणसाला सुद्धा त्याची लागन होण्याची शक्यता असते. त्यामुळे जनावरांच्या आजारांबाबत जागृत राहणे गरजेचे आहे. पशु आधार मुळे सर्व जनावरांच्या विविध आजारासंबंधीत माहिती एकत्रित केली जाईल व त्यावर संशोधन सुद्धा केले जाऊ शकते.

 

लम्पीवर हा निर्णय ठरु शकतो प्रभावी: सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात जवळपास लम्पीने कहर करण्यास सुरुवात केली आहे. पशुंच्या त्वचेसंबंधित हा रोग आहे. यादरम्यान जनावरांना प्रचंड ताप येतो आणि त्यांच्या त्वचेवर गाठी येतात. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे झपाट्याने याचा प्रसार होत आहे. लम्पीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय फायदेशीर ठरणार असल्याच्या शक्यता अनेकांकडून वर्तवण्यात आल्या आहेत. ज्याप्रमाणे कोरोनामध्ये आधार क्रमांक आणि काही ऍप्सचा उपयोग करुन रुग्णांना ट्रेस केले जात होते तसे या बाबतीत सुद्धा करता येते. हेही वाचा: दारू सोबत शेंगदाणे खाण्याचे काही फायदे आहेत, पण दुष्परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन ..

 

पशुंच्या आरोग्यासंबंधीत माहिती एकाचठिकाणी उपलब्ध झाल्यास असे करणे शक्य आहे. मात्र काहीजणांकडून हा दावा पोकळ असल्याचे म्हटले जाते आहे. पशु आधारची आत्ता फक्त घोषणाच झालीय. यावर प्रक्रियेसाठी अजून बराच वेळ जाणार आहे. लम्पीची लस सद्यस्थितीत उपलब्ध आहे व त्यावर विविध संशोधने सुद्धा सुरु आहेत. त्यामुळे पशु आधार येईपर्यंत लम्पी नाहीसा झालेला असेल असा अनेकांचा अंदाज आहे. परंतू येणाऱ्या काळात जनावरांना शासकीय लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य केले जाऊ शकते. तसेच केंद्र सरकार नोंदणीकृत जनावरांना लाभ देखील देईल, असे बोलले जात आहे. हेही वाचा:पुरुषांच्या या सवयींकडे स्त्रिया होतात आकर्षित; फक्त आकर्षितच नाही, आपलं सर्वस्व देण्यासही असतात तयार..

 

नेमके काय आहे पशु आधार (Pashu Adhar Card) : आधार क्रमांकाप्रमाणेच एक आयडेंटिफिकेशन क्रमांक पशुंना देण्यात येणार आहे. ज्यामध्ये पशुधनाच्या संख्येसह त्यांच्या आरोग्याबाबतची माहिती असणार आहे. सर्व पशुंना इअर टॅग लावण्यात येईल, ज्यावर १२ अंकी युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक असेल. या क्रमांकावरुन पशुसंबंधीत सर्व माहिती एकाच ठिकाणी क्षणार्धात उपलब्ध होईल. पशुंचे आरोग्य व उत्पादकता यांच्या माहितीचे नेटवर्क उभे राहण्यात यामुळे मदत होईल. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाला याचा लाभ होणार आहे. प्राण्यांच्या प्रजाती, त्यांच्यामधील आजार आणि त्यासबंधित माहिती याअंतर्गत सरकारकडे उपलब्ध असणार आहे.

महत्वाच्या बातम्या:  आतापर्यंतचा सगळ्यात मोठा सेल! Samsung रेडमीसह अनेक स्मार्टफोन मिळतायत निम्म्या किंमतीत.. 

 गव्हाची चपाती खात असाल तर त्वरीत करा बंद; चपाती खाण्याचे हे आहेत दुष्परिणाम.. 

या पाच गोष्टी पासून महिला आपल्या पतीला ठेवतात दूर; जाणून तुम्हालाही बसेल धक्का.. 

या कारणांमुळे पहिलं प्रेम राहतं कायम लक्षात; ब्रेकअप झाल्यानंतर होतो भयंकर त्रास.. 

शेतकऱ्यांनो फक्त ही अट पूर्ण करा; ट्रॅक्टर खरेदीवर केंद्र सरकार देईल 50 टक्के अनुदान..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.