Using Phone in Toilet: शौचालयामध्ये स्मार्टफोन वापरण्याचे दुष्परिणाम जाणून तुम्ही देखील बंद कराल ही जीवघेणी सवय..

0

Using Phone in Toilet: अनेकांना कायम स्वत:ला व्यस्थ ठेवण्याची सवय असते. मोाबईलने (mobile) तर यात भरच घातली आहे. रोजच्या धावपळीच्या जिवनात (lifestyle) थोडा जरी वेळ शांतता घेण्यासाठी मिळत असला, तरी त्यावेळी शांतता घेण्याऐवजी तो वेळ सुद्धा मोबाईलमध्ये घालवणारे पुष्कळ आहेत. यामुळेच आत्मचिंतनाचे प्रमाण कमी झाले आहे. याचा थेट परिणाम विचार (thought) प्रक्रियेवर होतो. मोबाईलने माणसाचे जिवन आता पुरते व्यापून टाकले आहे. एखाद्या वेळी व्यवस्थित जेवायला नसले तर चालेल, पण मोबाईल जवळ असणे फार गरजेचे झाले असल्याचे चित्र आहे. एखाद्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी चार चौघं एकत्र आली तरी सुद्धा थोड्याच वेळात ते आपापल्या मोबाईलमध्ये व्यस्थ होतात. सगळ्यांच्या माना मोबाईलमध्ये खुपसलेल्या दिसतात. (Using Phone in Toilet injuries to health)

अनेकांना मोबाईलने एवढे वेड लावलेय, की शौचालयात (toilet) जातांना सुद्धा ते मोबाईल सोबत घेऊन जातात. आणि मोबाईल स्क्रोल करत बसतात. मोठ्यांपासून ते तरुणांपर्यंत जवळपास सगळ्यांनाच ही सवय असल्याचे जाणवते. परंतू ही सवय तुम्हाला हानीकारक ठरु शकते. शौचालयात मोबाईल वापरण्याचे प्रचंड दुष्परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा ही सवय असेल, तर आत्ताच तुम्ही या सवयीमध्ये बदल करा. कारण शौचालयात मोबाईल वापरल्याने तुम्हाला काही आजारांचा सुद्धा सामना करावा लागू शकतो. मात्र नेमके असे काय होते? की शौचालयात मोबाईल वापरणे थेट आरोग्यावर परिणाम करते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर या लेखात आम्ही तुम्हाला तेच सांगणार आहोत.

“द सन” नावाच्या ब्रिटीश वेबसाईटने काही सर्व्हेक्षणांची दखल घेत काही रिपोर्ट प्रकाशित केले आहेत. टॉप्स टाईल्स या संस्थेने केलेले हे सर्व्हेक्षण आहे. ज्यामध्ये तेथील लोक ५ मिनीटांपेक्षा अधिकचा काळ शौचालयात घालवतात. तसेच दिवसातून पाच ते सातवेळा ते शौचालयात जातात. भारतात सुद्धा जवळपास अशीच स्थिती आहे. मात्र शौचालयात जास्त वेळ घालवण्याचे अनेक दुष्परिणाम या सर्व्हेक्षणाच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. शौचालयात जास्त वेळ बसणे हे मुळव्याध या आजाराचे कारण ठरु शकते. मुळव्याध हा मलाशयाशी संबंधीत प्रचंड वेदनादायक आजार आहे.

पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये अनेकांना शौचालयात वर्तमानपत्र वाचण्याची सवय आहे. आपल्याकडे मात्र शौचालयात मोबाईल वापरण्याचे प्रमाण जास्त आहे. तरुणांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. शौचालयात जास्त वेळ बसल्यास थेट मलाशयावर त्याचा परिणाम होतो. टॉयलेट शीटवर बसलेले असतांना मलाशय एका वेगळ्या स्थितीत असते. त्यामुळे मलाशयाच्या खालच्या नसांवर प्रचंड ताण येतो. परिणामी यामुळे मुळव्याध होण्याचे हे कारण ठरु शकते. मुळव्याधमध्ये मलाशयातून रक्तस्त्राव होतो. बर्‍याचवेळा प्राथमिक घरगुती ऊपायांनी सुद्धा मुळव्याध बरा होतो. मात्र अनेकदा मुळव्याध गंभीर स्वरुप धारण करतो. अशावेळी रुग्णालयात जाण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. ऐवढेच नाही, तर शस्त्रक्रियेची सुद्धा वेळ तुमच्यावर ओढवु शकते.

बॅक्टेरियाचा होतो ह ल्ला

टॉयलेटला जाताना तुम्ही मोबाईल घेऊन जात असाल तर अर्थातच त्याचा वापर केला जातो. टॉयलेटमध्ये शौचालय करत असताना आपलं लक्ष मोबाईलकडे असतं. टॉयलेटमध्ये मोबाईलचा वापर केल्यामुळे बॅक्टेरिया हाताच्या माध्यमातून आपल्या मोबाईलवर प्रवेश करतात. शौचालय पूर्ण झाल्यानंतर आपण मोबाईल स्वच्छ न करता तसाच खिशामध्ये टाकतो. साहजिकच पाण्यामुळे मोबाईल खराब होत असल्याने तो स्वच्छ करता येऊ शकत नाही. शौचालय पूर्ण करून बाहेर आल्यानंतर, आपण हात तर स्वच्छ धुतो, मात्र मोबाईल तसाच नंतर बॅक्टेरियायुक्त वापरला जातो. आणि मग हेच बॅक्टेरिया जेवणातून आपल्या पोटात जातात.

पोट साफ होत नाही

शौचालयाला जाताना अनेकांना मोबाईल घेऊन जायची सवय असते. मात्र शौचालयात असताना मोबाईल घेऊन गेल्यामुळे आपलं शौचालयावर कमी आणि मोबाईलकडे जास्त लक्ष असते. अशा परिसथितीमध्ये पूर्णपणे एकाचवेळी आपलं पोट साफ होत नसल्याच्या समस्या निर्माण होतात. यामुळे पोट दुखी, ऍसिडिटी त्याचबरोबर पित्तासारख्या समस्या देखील उद्भवण्याची दाट शक्यता असते. याशिवाय शौचालयामध्ये मोबाईल फोन वापरल्यामुळे आपण अधिक काळ बसून राहतो. आणि याचा परिणाम म्हणून आपल्याला मूळव्याधासारख्या समस्या देखील निर्माण होण्याची शक्यता असते. दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा शौचालयाला येऊ शकतं. ही सामान्य बाब आहे. मात्र जास्त काळ शौचालयालात बसणे नक्कीच सामान्य बाब नाही. जास्त काळ शौचालयालात बसल्याने पोट साफ होते, हा अनेकांचा गैरसमज आहे.

वेळेत शौचविधी आटोपण्याचे फायदे

आयुर्वेदामध्ये शौचविधीबाबत विस्ताराने सांगण्यात आलेले आहे. आयुर्वेदाच्या मते शरीराशी संबंधीत सर्व विकारांचे केंद्रस्थान पोट आहे. त्यामुळे पोट साफ असणे फार महत्वाचे आहे. पोट साफ नसणे हे निरोगी शरीराचे लक्षण नसल्याचे आयुर्वेदामध्ये सांगण्यात आले आहे. एका अभ्यासानुसार शौच आटोपण्याची योग्य वेळ ५ मिनीटे सांगण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ५ मिनीटांपर्यंत शौचविधी आटोपले पाहिजे. वेळेत शौचविधी आटोपल्यास शरीर निरोगी आणि सुदृढ राहते.

मात्र बहुतांश लोक यापेक्षा जास्त वेळ शौचालयात घालवतात. पोट साफ नसल्यामुळे अनेकांना शौचालयात जास्त वेळ घालावावा लागतो. यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या व्याधी होतात. याचा परिणाम थेट पचनक्रियेवर होतो. आणि भुक न लागणे, थकवा जाणवण्यासारख्या समस्या सुद्धा येतात. त्यामुळे पोट साफ असणे महत्वाचे आहे. त्याकरिता आहार घेणे गरजेचे आहे. पोट साफ ठेवल्याने योग्य वेळेत शौच विधी आटोपतो. ज्यामुळे तुमचे शरीर निरोगी राहते. तसेच योग्य वेळेत शौच विधी आटोपल्यास, तुम्हाला वारंवार शौचालयात जाण्याची गरज पडत नाही. दिवसभर तुम्ही ऊत्साही व आनंदी राहता.

हे देखील वाचा Pashu Adhar Card: आता जनावरांचे आधार कार्ड बनवणे अनिवार्य, केंद्र नोंदणीकृत जनावरांसाठी देणार हे लाभ..

tractor anudan yojana: शेतकऱ्यांनो फक्त ही अट पूर्ण करा; ट्रॅक्टर खरेदीवर केंद्र सरकार देईल 50 टक्के अनुदान..

wheat chapati side effects: गव्हाची चपाती खात असाल तर त्वरीत करा बंद; चपाती खाण्याचे हे आहेत दुष्परिणाम..

First love also remember: या कारणांमुळे पहिलं प्रेम राहतं कायम लक्षात; ब्रेकअप झाल्यानंतर होतो भयंकर त्रास..

Monthly Income Scheme: इंडिया पोस्ट बॅंकेची जबरदस्त योजना लॉन्च; दरमहा मिळणार 5 हजार रुपये, करा फक्त हे काम..

Peanuts With Alcohol: दारू सोबत शेंगदाणे खाण्याचे काही फायदे आहेत, पण दुष्परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन ..

Husband wife relation: या पाच गोष्टी पासून महिला आपल्या पतीला ठेवतात दूर; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

women notice about men: पुरुषांच्या या गोष्टींकडे महिलांचं असतं बारीक लक्ष; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

PM kisan: शेतकऱ्यांनो फक्त या नंबरवर कॉल करा, आणि 12 वा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार याची माहिती मिळवा..

Amazon Great Indian Festival: आतापर्यंतचा सगळ्यात मोठा सेल! Samsung रेडमीसह अनेक स्मार्टफोन मिळतायत निम्म्या किंमतीत..

sexual partner: या कारणांमुळे तीन-तीन पुरुषांसोबत महिला ठेवतात संबंध; NFHS च्या अहवालात धक्कादायक माहिती आली समोर..

Yoga Asanas For Married Couple: वैवाहिक जिवनातला आनंद द्विगुणित करतात ही योगासने..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.