Why do couples go for a honeymoon: लग्नानंतर हनीमूनसाठी बाहेरच का जातात? ‘ही’ पाच कारणे जाणून तुम्ही देखील जाल चक्रावून..

Why do couples go for a honeymoon: लग्न हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. आपल्या वैवाहिक जीवनाचा जोडीदार हा आपल्यावर प्रचंड प्रेम करणारा आणि सर्वगुणसंपन्न असावा. असं प्रत्येकालाच वाटत असतं. मात्र प्रत्येकालाच चांगला जोडीदार मिळेल, असे नाही. लहानपणापासून अनेकांनी वेगवेगळी स्वप्न रंगवलेली असतात. मात्र रंगवलेली स्वप्न पूर्ण होतीलच, असं ठामपणे सांगता येत नाही. आयुष्य जगत असताना अनेकदा अनेक तडजोडी कराव्या लागतात. अलीकडच्या काळात तर तडजोड फार आवश्यक बनली आहे. जो तडजोड करतो, तोच एक उत्तम आयुष्य जगू शकतो. या विषयी तुम्हाला अधिक सांगण्याची आवश्यकता नाही. वडे, सामोसे खाल्ल्याने होतायत हे चार गंभीर आजार; एकदा गरम केलेले तेल पुन्हा वापरू नका अन्यथा..

लग्नाअगोदर आपला जोडीदार कसा असावा? याविषयी अनेक स्वप्न रंगवलेले असतात. आपला जोडीदार कसाही असला तरी, आपल्या वैवाहिक जीवनाचा जोडीदार हा आपण विचार केला होता, तसाच आहे. हाच विचार करून तुम्ही पुढे जाणं आवश्यक आहे. तरच तुमचे वैवाहिक जीवन सुखी आणि समाधानी जाईल. लग्न झाल्यानंतर आपल्या जोडीदाराला अधिक ओळखण्यासाठी, त्याचबरोबर या काळात दोघेही फक्त एकमेकांनाचा विचार करण्यासाठी, लग्न झाल्यानंतर एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी हनिमूनसाठी एक दीड महिना चालवणं तुमच्या वैवाहिक जीवनासाठी खूप आवश्यक आहे. आज आपण याच संदर्भात बोलणार आहोत. पाच कारणांमुळे मुलं साडी नेसलेल्या मुलींकडे होतात आकर्षित: कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित..

भारतीय संस्कृतीत अजूनही काही विषयांवर उघडपणे भाष्य केलं जात नाही. मात्र आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काही विषयांवर आवर्जून भाष्य करणे आवश्यक आहे. लग्नानंतर पती-पत्नी दोघेही हनिमून साठी जातात. बऱ्याच ठिकाणी खेडेगावात ही पद्धत पाहायला मिळत नाही. मात्र शहरात बहुतेकजण एक दीड महिन्याचा हनिमून पीरियड एकत्र घालवतात. लग्नानंतर पती-पत्नी बाहेर थंड हवेच्या ठिकाणी हनिमून पिरेड म्हणून, एक दीड महिना एकत्र का घालवतात तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का? जर तुमचं नवीनच लग्न झाले असेल, किंवा लग्न करणार असाल, तर हनिमून साठी कपल बाहेर का जातं? हे जाणून घेणे तुमच्यासाठी फार आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया या संदर्भात सविस्तर. महिलांमधे हे पाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..

एकमेकांच्या आवडी निवडी समजण्यासाठी

जसं प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न हा खूप महत्त्वाचा टप्पा असतो, तसंच लग्नानंतर पती-पत्नी यांच्या आयुष्यामधील हनिमूनचा काळ देखील खूप महत्वाचा मानला जातो. खेडेगावात अनेकजण लग्नानंतर हनिमूनसाठी बाहेर जात नाहीत. पती पत्नी दोघांची इच्छा असूनही, दोघेही हनिमूनसाठी बाहेर जात नाहीत. किंवा जाऊ देले जात नाही तुम्ही असंही म्हणू शकता. मात्र हा काळ दोघांना एकमेकांच्या आवडीनिवडी समजण्यासाठी फार आवश्यक आहे. व्हायग्रा पुरुषांच्या लैंगिकतेवर असं करत काम; अतिसेवन झाल्यास होतात हे गंभीर दुष्परिणाम..

पती-पत्नी लग्नानंतर दोघेही हनिमूनसाठी एक-दोन महिने गेल्यानंतर दोघांना एकांतात वेळ घालवण्यासाठी पुरेशी संधी मिळते. निसर्गरम्य ठिकाणी गेल्यानंतर, दोघांनाही डिस्टर्ब करण्यासाठी कोणीही नसतं. साहजिकच यामुळे त्यांना वर्तमानाशिवाय भूतकाळ आणि भविष्यकाळ देखील आठवण नाही. किंवा चिंता सतावत नाही. या काळात दोघेही एकमेकांची काळजी करताना पाहायला मिळतात. साहजिकच यामुळे दोघांच्याही आवडीनिवडी काय काय आहेत? याविषयी दोघांनाही पुरेशी माहिती मिळते. आणि म्हणून हनिमून पिरेड म्हणून कपल एक दोन महिने थंडगार हवेच्या ठिकाणी राहतात. शारीरिक संबंधांमध्ये अधिक अंतर पडल्यास, तुमच्या आरोग्यावर होतात हे सहा गंभीर परिणाम..

तणावापासून मुक्तत्ता

आपण पाहतो लग्नाअगोदर आणि लग्न झाल्यानंतर देखील पती आणि पत्नी दोघेही मोठ्या तणावात असतात. अनेक दिवसांपासून पुरेशी झोप देखील झालेली नसते. मित्र कंपनी, पाहुणेमंडळी यांनी दिलेला सल्ला आणि त्याची केलेली जोपासना, यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण होतो. या बरोबरच आपले लग्न यशस्वी होइल की नाही? याचा देखील तणाव मोठ्या प्रमाणात आलेला असतो. लग्नात आपल्यामुळे कोणी नाराज झाला तर नाही ना? अशा अनेक गोष्टींमुळे पती पत्नी दोघेही तणावात आलेली असतात. साहजिकच या सगळ्या मधून तणाव मुक्त होण्यासाठी तुम्हाला या सगळ्या लोकांपासून एकांत हवा असतो. आणि म्हणून पती पत्नी दोघेही घरापासून लांब थंड हवेच्या ठिकाणी जाऊन राहतात. पुरुषांच्या या चार गोष्टींवर महिला टाकतात जीव ओवाळून; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य..

वैवाहिक आनंदात बाधा येऊ नये.

लग्नानंतर पती-पत्नी दोघेही घरापासून लांब थंड हवेच्या ठिकाणी एकत्र राहण्याचे महत्वाचे कारण म्हणजे, वैवाहिक आनंदामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये. वैवाहिक सुखाचा आनंद घेत असताना कोणत्याही प्रकारचा विचार मनामध्ये येऊ नये. लहानपणापासून आपल्या जोडीदारासोबत रंगवलेली स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी एकांत हवा असतो. हा एकांत घरापासून खूप दूर एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी व्यथित केला, तरच मिळू शकतो. या काळात एकमेकांसोबत घालवलेले ऐतिहासिक आणि अविस्मरणीय क्षण कायम लक्षात राहावेत, म्हणून देखील हनिमूनसाठी कपल बाहेर जातात.

ऐतिहासिक आणि अविस्मरणीय क्षणाची होते नोंद

लग्नानंतर पती-पत्नी हनिमून साठी थंड हवेच्या ठिकाणी एक दोन महिन्यासाठी गेल्यानंतर, या दोघांना डिस्टर्ब करण्यासाठी कोणीही नसतं. याबरोबरच या काळात भूतकाळ आणि भविष्याची देखील दोघांनाही अजिबात चिंता नसते. हे दोघेही फक्त वर्तमानात जगत असतात. दोघेही अधिकाधिक आनंद कशात मिळेल? याचाच नेहमी विचार करत असतात. नातं अधिक घट्ट होण्यासाठी शारीरिक संबंधाबरोबरच मनोमिलन देखील होणं फार आवश्यक असतं. साहजिकच या काळात दोघांना डिस्टर्ब करण्यासाठी कोणीही नसल्याने, या दोघांनी एकमेकांसोबत घालवलेले क्षण, ऐतिहासिक आणि अविस्मरणीय ठरतात.

एकमेकांसोबत गप्पा मारण्यासाठी पुरेसा

लग्न झाल्यानंतर घरातील अनेक मंडळींमुळे तुम्हाला एकांत मिळत नाही, अनेकदा लग्नासाठी आलेले पाहुणेमंडळी देखील काही दिवस घरीच थांबतात. भारतीय संस्कृतीत लाजणं हा स्त्रियांचा अलंकार असतो. असं म्हटलं जातं. साहजिकच यामुळे मुली देखील घरातील अनेक सदस्यांच्या उपस्थितीत आपल्या पतीसोबत मनमोकळ्या गप्पा मारू शकत नाहीत. साहजिकच या सगळ्यांमुळे पती-पत्नी दोघांचीही मोठ्या प्रमाणात घुसमट होते. एकमेकांना समजून घेण्यासाठी संवाद साधणं फार आवश्यक आहे. संवादामुळे एकमेकांच्या आवडीनिवडी समजतात. आणि म्हणून हनिमून पिरियड म्हणून दोन अडीच महिने घरापासून लांब थंड हवेच्या ठिकाणी पती-पत्नी एकत्र वेळ घालवतात.

हे देखील वाचा Rechargeable LED Bulbs: आता इन्व्हर्टरची गरज नाही; शंभर रूपयांचे हे LED Bulbs खरेदी करा आणि लाईट गेल्यावरही आठ तास प्रकाश मिळवा..

Second hand car: ४८ हजार पळालेली Maruti Suzuki Alto केवळ ७८ हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Hero Splendor Plus: या ठिकाणी केवळ 13 हजारांत मिळतेय हिरो स्प्लेंडर; विश्वास नाही बसत? पाहा डिटेल्स..

Viral video: सिंहाच्या कळपावर मगर पडली भारी, अचानक हल्ला करूनही मगरीनेच अखेर तिघांचाही काढला काटा..

Video Viral: म्हशीची शिकार करण्यासाठी सात सिंह एकवटले; शेवटी झाला चमत्कार आणि घडलं भलतंच..

Weather Update: हे तीन दिवस सूर्य देणार दर्शन, तर या तारखेपासून राज्यभरात पावसाची पुन्हा जोरदार बॅटिंग राहणार सुरूच..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.