Viral video: सिंहाच्या कळपावर मगर पडली भारी, अचानक हल्ला करूनही मगरीनेच अखेर तिघांचाही काढला काटा..

Viral video: सोशल मीडिया (social media) हे व्हायरल व्हिडिओचे व्यासपीठ आहे. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. खास करून सोशल मीडियावर प्राण्यासंदर्भातले नवनवीन व्हिडिओ दररोज तुफान वायरल होताना पाहायला मिळतात. प्राण्यांच्या जीवनशैली विषयी देखील जाणून घ्यायला प्रत्येकाला आवडत असल्याने प्राण्यांचे व्हिडिओ अनेक जण मोठ्या प्रमाणात शेअर देखील करत आहेत. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. एक सिंह (lion) भल्या मोठ्या मगरीची (crocodile) शिकार करायला गेल्यानंतर, सिंहा सोबत पुढे जे घडलं ते पाहून तुम्हाला धक्का तर बसवलेच, मात्र काळजाच पाणी-पाणी देखील होईल.

सिंह किती हिंस्र प्राणी आहे, हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. सिंहाच्या नादी फारसं कोणी लागत नाही. सिंहाला घाबरून अनेक जण आपली वाट देखील बदलताना पाहायला मिळतात. सिंहाच्या कोणी नादी लागत नसलं, तरी मगर देखील सिंहासारखीच हिंस्र प्राणी म्हणून ओळखली जाते. सिंह हा जसा जंगलाचा राजा आहे, तशीच मगर देखील पाण्यातील राणी आहे. मगर पाण्यात राहून अनेक मोठमोठ्या प्राण्यांची शिकार सहजरीत्या करताना तुम्ही अनेकदा पाहिलंही असेल.

तुम्ही विचार करा, सिंह आणि मगर हे दोन्हीं हिंस्त्र प्राणी समोरासमोर एकमेकांना भेटले, तर या दोघांची लढाई पाहणाऱ्यांची काय अवस्था होईल? याचा विचार केला तरी आपल्या काळजाचं पाणी पाणी होतंय. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एका भल्या मोठ्या मगरीची शिकार करण्यासाठी सिहींनी पुढे सरसावते, आणि पुढे जे घडतं ते पाहून अनेकांची झोप उडाली आहे. कुठे ना कुठे शेराला सव्वाशेर भेटतो, असं म्हटलं जातं. याचप्रमाणे एका मगरीने तब्बल तीन सिंहांना पराभूत केले आहे.

काय घडलं नेमकं

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एक मगर तलावाच्या कडेला पाहायला मिळत आहे. तेवढ्यात सिंहिणी मगरीची शिकार करण्यासाठी पुढे सरसावते. सिंह मगरीवर हल्ला करणार एवढ्यात मगर स्वतःहून सिंहावर हल्ला करते, मात्र सिंहाला स्वतःला बचावण्यात यश येते. मगरीने केलेला हल्ला पाहून सिंहाचा चेहरा केविलवाणा होतो. हे दृश्य पाहायला मिळत असतानाच पुढच्याच क्षणात कुठूनतरी दोन सिंह येतात, आणि मगरीवर तुटून पडतात. मात्र या दोन्हीं सिंहाला न घाबरता मगर देखील प्रतिहल्ला करते.

वास्तविक पाहता तीन सिंहाच्या पुढे मगरीचा काहीही इलाज चालला नसता, मात्र मगरीने शेवटपर्यंत हार मानली नाही. मोठ्या साहसाने आणि धैर्यपणाने मगरीने तिन्ही सिंहांचा सामना केला. मगर आता हार मानायला तयार नाही, हे लक्षात आल्यानंतर या तिन्हीं सिंहांनी काढता पाय घेतला. एक वेळ सिंहांनी अचानक हल्ला केल्यामुळे, मगरीचं आता काही खरं नाही असं वाटत असताना मगरीने केलेला पलटवार अनेकांना आवडला. अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर देखील केला आहे.

काय म्हणाले नेटकरी

Lionsdaily या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास दोन लाख व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ प्रचंड प्रेरणादायी असून अखेरपर्यंत हार मानली नाही, तर विजय तुमचाच होतो. अशा प्रकारच्या कमेंट केल्या आहेत. एका युजर्सने कमेंट करताना म्हटले आहे, कितीही मोठं संकट आलं तरी देखील साहस आणि धैर्य सोडलं नाही, तर समोरच्याची ताकद आपण संपवू शकतो.

हे देखील वाचा Video Viral: म्हशीची शिकार करण्यासाठी सात सिंह एकवटले; शेवटी झाला चमत्कार आणि घडलं भलतंच..

Viral video: वाघाच्या तीन बछड्यांना माकडाने दूध पाजून सांभाळलं, पण बछड्यांनी..

Rechargeable LED Bulbs: आता इन्व्हर्टरची गरज नाही; शंभर रूपयांचे हे LED Bulbs खरेदी करा आणि लाईट गेल्यावरही आठ तास प्रकाश मिळवा..

Second hand car: ४८ हजार पळालेली Maruti Suzuki Alto केवळ ७८ हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Hero Splendor Plus: या ठिकाणी केवळ 13 हजारांत मिळतेय हिरो स्प्लेंडर; विश्वास नाही बसत? पाहा डिटेल्स..

Relationship Tips: मुलांच्या या सहा गोष्टींवर मुली टाकतात जीव ओवाळून; मुलींच्या हृदयात राहायचं असेल तर करा हे काम..

Weather Update: he तीन दिवस सूर्य देणार दर्शन, तर ya तारखेपासून राज्यभरात पावसाची पुन्हा जोरदार बॅटिंग राहणार सुरूच..

Optical Illusion: मुलगी की पक्षी? सर्वप्रथम तुम्हाला काय दिसले, जाणून घ्या तुमचे विचार आणि व्यक्तिमत्त्वाविषयी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.