Weather Update: ‘हे’ तीन दिवस सूर्य देणार दर्शन, तर ‘या’ तारखेपासून राज्यभरात पावसाची पुन्हा जोरदार बॅटिंग राहणार सुरूच..

Weather Update:: राज्यात मान्सून (Monsoon News) उशिरा दाखल झाल्यानंतर, गेल्या काही दिवसांपासून, पावसाने (rain) आपली तुफानी बॅटिंग सुरूच ठेवली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सध्या पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीला पाऊस पडत नसल्याने, शेतकरी प्रचंड चिंतेत होते. मात्र अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर राज्यात पावसाने उशिरा हजेरी लावली. आणि आता पाऊस थांबायचं नाव घेत नसल्याने, शेतकरी पुन्हा एकदा प्रचंड चिंतेत आहेत. हे संकट कमी की काय म्हणून, स्वतःला हवामानाचे अभ्यासक समजले जाणारे, पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजामुळे (Panjabrao Dakh Weather Report) शेतकऱ्यांसमोर आता पुन्हा एकदा चांगलाच अंधार पडला आहे.

पंजाबराव डख हे स्वतःला हवामान अभ्यासक समजत असले तरी, या क्षेत्रात त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची डिग्री, नसल्याने त्यांच्या हवामान अंदाजाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केल्याचे देखील पाहायला मिळाले होते. बीबीसी मराठीने केलेल्या एका रिपोर्टमध्ये पंजाबराव यांना अनेक प्रश्नांची उत्तर देखील देता आली नव्हती. मात्र पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजाविषयी शेतकऱ्यांना मात्र चांगलाच विश्वास असल्याचे पाहायला मिळते.पंजाबराव डख शेतकऱ्यांमध्ये प्रचंड पॉप्युलर आहेत. अनेक शेतकरी त्यांच्या हवामान अंदाजानुसारच, शेती करत असल्याचेही पाहायला मिळते.

आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. त्यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या डोक्यावर ढग तयार झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सूर्याने आपले दर्शन देखील दिले नाही. पश्चिम, मध्य, आणि उत्तर महाराष्ट्र, तसेच विदर्भ आणि कोकण किनारपट्टीसह अनेक भागात चांगलाच मुसळधार पाऊस बरसत आहे. सुरुवातीला पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची पेरणी लांबणीवर गेली, आणि आता पेरणी झाल्यानंतर, पावसाने अजूनही आपली बॅटिंग सुरूच ठेवली आहे. यामुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रातील अनेक भागात आज पावसाने उघडीक दिली असली तरी, पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजामुळे आता पुन्हा एकदा अनेक जण चिंतेत असल्याचे चित्र आहे. पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रातील अनेक भागात आज मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर पंधरा तारखेपासून राज्यात सूर्यदर्शन होणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. सोबतच पुढच्या तीन दिवसांत म्हणजेच पंधरा-सोळा आणि 17 तारखेला पाऊस विश्रांती घेणार आहे. परंतु 18 तारखेपासून पुन्हा एकदा पाऊस आपली धुवाधार बॅटिंग करताना पाहायला मिळेल, असाही अंदाज पंजाबराव यांनी वर्तवला आहे.

पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यात पुढचे तीन दिवस पाऊस पडणार नाही. आणि सूर्यदर्शन देखील पाहायला मिळेल. मात्र त्यांनी 18 तारखेपासून 20 जुलै पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा देखील अंदाज वर्तवला आहे. अलीकडच्या काळात पंजाबराव डख यांनी वर्तवलेले हवामान हवामान अंदाज बहुतेकदा चुकीचे ठरले असल्याने, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली होती. हवामान खात्याचा कोणताही अभ्यास नसताना डिग्री नसताना पंजाबराव कोणत्या अभ्यासावर हवामान अंदाज वर्तवतात, असे अनेक प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले होते. मात्र शेतकऱ्यांमध्ये त्यांची मोठी क्रेझ असल्याने, अजूनही त्यांच्या हवामान अंदाजाची चर्चा होते. आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हवामान अंदाजावर विश्वास असल्याचे पाहायला मिळते.

हे देखील वाचा Optical Illusion: मुलगी की पक्षी? सर्वप्रथम तुम्हाला काय दिसले, जाणून घ्या तुमचे विचार आणि व्यक्तिमत्त्वाविषयी..

Rechargeable LED Bulbs: आता इन्व्हर्टरची गरज नाही; शंभर रूपयांचे हे LED Bulbs खरेदी करा आणि लाईट गेल्यावरही आठ तास प्रकाश मिळवा..

Video Viral: म्हशीची शिकार करण्यासाठी सात सिंह एकवटले; शेवटी झाला चमत्कार आणि घडलं भलतंच..

Second hand car: ४८ हजार पळालेली Maruti Suzuki Alto केवळ ७८ हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Relationship Tips: मुलांच्या या सहा गोष्टींवर मुली टाकतात जीव ओवाळून; मुलींच्या हृदयात राहायचं असेल तर करा हे काम..

 चार गोष्टींचा विचार करून मुली बांधतात लग्न गाठ; वाचून तुम्हीही जाल चक्रावून..

Money tips: घरात हे पाच उपाय नियमित करा, पैशाची समस्या कधीही जाणवणार नाही..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.