Video Viral: म्हशीची शिकार करण्यासाठी सात सिंह एकवटले; शेवटी झाला चमत्कार आणि घडलं भलतंच..

0

Video Viral: सिंहाला जंगलाचा राजा का म्हटलं जातं हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. सिंहाने जर मनात आणलं, तर तो कोणत्याही प्राण्याची शिकार यशस्वीरित्या करू शकतो. सिंहाच्या शिकारीतून एखादा प्राणी वाचला, तर हे मोठं आश्चर्य ठरेल. जंगलातले सर्व प्राणी सिंहाला घाबरून असतात. सिंहाच्या कोणी नादी लागत नाही. सिंह त्याला जेव्हा हवी तेव्हा तो कोणाचीही शिकार सहजरित्या करतो. कदाचित यामुळेच त्याला जगलाचा राजा म्हंटले जाते. मात्र जंगलाच्या राजाला देखील कधीकधी आपला जीव वाचवून धूम ठोकून पळून जावं लागू शकतं. या संदर्भातलाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल झाला आहे.

मनात आणलं तर जगात कोणतीही गोष्ट शक्य नाही. याविषयी अधिक सांगण्याची गरज नाही. आयुष्य जगत असताना, तुम्ही अशा अनेक गोष्टी पाहत असता, ज्या अशक्य वाटतात, मात्र प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रचंड मेहनतीनंतर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील तुम्ही सहज मिळवू शकता. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ हेच दर्शवताना पाहायला मिळत आहे. शांत जंगलात एका ठिकाणी चरत असणाऱ्या बिचाऱ्या म्हशीची शिकार करण्यासाठी तब्बल सात सिंह म्हशीच्या अंगावर तुटून पडले. मात्र म्हशीने शेवटपर्यंत हार मानली नाही.

अनेकांना हे वाचून आश्चर्य वाटेल, मात्र सात सिंहाला म्हशीने पराभूत केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झाला आहे. शेवटपर्यंत हार मानली नाही, तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील तुम्ही सहज मिळवू शकता. हेच दर्शवणारा हा व्हिडिओ आहे. सात सिंहापुढे एक म्हैस जेव्हा उभी राहील, तेव्हा ही लढाई काय होईल, हे अगदी लहान मुलं देखील सांगू शकतील. मात्र सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडिओत भलतच घडलं असून, सात सिंह आपला जीव वाचवून धूम ठोकून पळून गेले.

काय घडलं नेमकं

जंगलात एका ठिकाणी एक म्हैस शांत चरत असताना अचानक तब्बल सात सिंह त्याठिकाणी आले. आणि आणि म्हशीला काही कळायच्या आत सिंहांनी म्हशीवर हल्ला केला. या हल्ल्यात म्हैस आता धारातीर्थी पडणार असं वाटत असतानाच, म्हशीने शेवटपर्यंत या सिंहाचा सामना केला. मशीने जर हार म्हणाली असती, तर कदाचित म्हशीला सिंहांना खाली पाडून तिच्या गळ्यावर हल्ला केला असता. आणि तिला मृत्यूमुखी पाडलं असतं. मात्र म्हैस सात सिंह आपल्यावर हल्ला करत आहेत, हे पाहून अजिबात डगमगली नाही. सात सिंहापैकी दोन-तीन सिंह म्हशीच्या अंगावर देखील चढून म्हशीचा जोरदार चावा घेताना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

एकीकडे या सिंहाचा सामना करत दुसरीकडे आपल्या सवंगड्यांना हंबरडा फोडून म्हैस हाक देखील मारत असल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. काही वेळानंतर, या म्हशीच्या मदतीला दोन म्हशी धावत आल्या. धावत आलेल्या दोन्ही म्हशींनी सिंहांना आपल्या शिंगावर घेऊन हवेत फेकून दिले. आपले काही सहकारी हवेत उडत आहेत‌. हे पाहून बाकीचे सिंह देखील प्रचंड घाबरले. या म्हशींनी आता रौद्ररूप धारण केलं आहे, हे पाहून सिंहांनी हार मानली, आणि स्वतःचा जीव वाचवून पळून गेले.

काय म्हणाले नेटकरी? 

सोशल मीडियावर वायरस झालेला हा व्हिडिओ तुफान वायरल झाला असून, अनेकांनी यावर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एका युजर्सने कमेंट करताना म्हंटले आहे, धैर्य आणि इच्छाशक्तीपेक्षा ताकतवर या जगात काहीही नाही. या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील, तर तुम्ही जगातील कोणतीही अशक्य गोष्ट देखील मिळवू शकता. त्याचबरोबर दुसऱ्या एका युजरने कमेंट करताना म्हटले आहे, शेवटपर्यंत हार मानायची नाही, हेच या व्हिडिओने सांगितलं आहे. आज पुन्हा एकदा प्रेरणादायी व्हिडिओ पाहिला मिळाला. africanwildlife1 या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

हे देखील वाचा Viral video: वाघाच्या तीन बछड्यांना माकडाने दूध पाजून सांभाळलं, पण बछड्यांनी..

 चार गोष्टींचा विचार करून मुली बांधतात लग्न गाठ; वाचून तुम्हीही जाल चक्रावून..

Second hand car: ४८ हजार पळालेली Maruti Suzuki Alto केवळ ७८ हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Rechargeable LED Bulbs: आता इन्व्हर्टरची गरज नाही; शंभर रूपयांचे हे LED Bulbs खरेदी करा आणि लाईट गेल्यावरही आठ तास प्रकाश मिळवा..

Palmistry: तीन प्रकारे जाणून घेता येते, आपण किती वर्ष जगणार आहोत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.