Money tips: घरात हे पाच उपाय नियमित करा, पैशाची समस्या कधीही जाणवणार नाही..

0

Money tips: पैसा हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. माणसाकडे पैसा असेल तर माणूस जगातली कोणतीही गोष्ट खरेदी करू शकतो. एवढेच नाही, तर माणसाचं सुख आणि आनंदही पैशातच दडलेला आहे. हे कोणालाही वेगळे सांगण्याची गरज नाही. पैसा हा माणसाच्या फक्त गरजाच भागवत नाही, तर माणसाची लाईफ स्टाईल देखील चेंज करतो. मात्र अनेकांना कष्ट करून देखील हवी तेवढी पैशाची साथ मिळत नाही. तुमच्याही आयुष्यात अशी समस्या असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. महिलांच्या या भागांवर केस असतील तर मानले जाते शुभ नवराही समजला जातो भाग्यवान..

हिंदू धर्मात आणि ज्योतिशास्त्रामध्ये लक्ष्मीची पूजा केल्यानंतर संपत्ती प्राप्त होते असं म्हटलं जातं. सहाजिकच त्यामुळे अनेक जण लक्ष्मीची पूजा देखील करतात. लक्ष्मीला प्रसन्न ठेवण्यात तुम्हाला यश आले, तर तुमच्याकडे पैशाची कधीही कमतरता भासत नाही. असं नेहमी बोललं जातं. तुम्ही देखील हे ऐकलं असेल. म्हणूनच काय की, खेडेगावात तसेच शहरात देखील प्रत्येकाच्या घरासमोर तुळशी वृंदावन असतेच असते. लक्ष्मीची कायम तुमच्यावर कृपा राहण्यासाठी आणि घरात पैशाच्या समस्या कधीही निर्माण न होण्यासाठी तुम्ही हे पाच उपाय करणे आवश्यक आहे. शारीरिक संबंधांमध्ये अधिक अंतर पडल्यास, तुमच्या आरोग्यावर होतात हे सहा गंभीर परिणाम..

कापूर जाळणं आवश्यक

कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्यामधील नकारात्मकता असलेली दूर करणे आवश्यक असतं. नकारात्मकता दूर झाली तरच तुम्ही कोणतेही ध्येय गाठू शकता, अन्यथा नाही. याप्रमाणेच तुमच्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्हाला नियमित घरामध्ये कापूर जाळणं आवश्यक आहे. संध्याकाळी घरातील पूजा झाल्यानंतर, तुम्ही नियमित कापूर जाळणे गरजेचे आहे. जर तुम्ही या नियमांचे पालन केले, तर नकारात्मकता दूर होते, आणि लक्ष्मीची कृपा देखील राहते. नकारात्मकता ही प्रत्येक समस्येवर प्रभावी उपाय आहे.  नदीत नाणं का फेकतात? घरात लिंबू मिरची का बांधतात? अंत्यसंस्कार केल्यानंतर आंघोळ का करतात? जाणून घ्या शास्त्रीय कारणे..

मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे आवश्यक

जर तुम्ही हिंदू धर्माचे पालन करत असाल, तर नियमित संध्याकाळी आणि सकाळी देवाची पूजा करत असाल. ज्योतिषशास्त्रानुसार, रोज देवाची पूजा करणे फार आवश्यक आहे. यामुळे तुम्ही नेहमी सकारात्मक राहता. देवाची पूजा केल्याने, अनेक वाईट विचारांना आपल्या आयुष्यात स्थान राहत नाही. अनेक जण देवघरामध्ये तेलाचा दिवा पेटवत ठेवत असतील. तुम्ही देखील तेलाचा दिवा देवघरामध्ये पेटवत ठेवत असाल, तर तुम्हाला यात छोटासा बदल करणे गरजेचे आहे. साध्या तेलाऐवजी तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा पेटवत ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही लावलेल्या मोहरीच्या तेलामध्ये लवंग देखील ठेवावी लागणार आहे. यामुळे पैसा तुम्हाला त्याच्याकडे आकर्षित करायला लावत असल्याचं जोतीशास्त्रात सांगितले आहे. महिलांमध्ये हेपाच गुण असतील, तर पती समजले जातात भाग्यवान; संसाराचा गाडाही सुटतो सुसाट..

पक्ष्यांना खायला घालणे आवश्यक

मुक्या प्राण्यांवर दया, माया, दाखवली त्याचबरोबर त्यांचे पोट भरण्याचे काम केले तर, हे पुण्य खूप मोठं मानलं जातं. पशु पक्षी प्राणी हे निष्पाप असतात, यांना फक्त स्वतःचं पोट भरायचं एवढंच माहिती असतं. तुम्ही जर त्यांचे पोट भरण्याचे काम केले, तर हे प्रचंड मोठ्या प्रमाणात आनंदी होतात. त्याचबरोबर तुमच्यावर प्रसन्न देखील होतात. जर तुम्ही आनंदी आणि सकारात्मक असाल, तर तुम्ही आयुष्यात काही मिळवू शकता. आनंद, समृद्धी त्याचबरोबर करियरविषयी प्रगती करण्याकरीता या गोष्टी खूप आवश्यक असतात. पक्षाला तुम्ही दाणे टाकले, तर तुम्हाला या गोष्टी मिळतात.

पक्ष्यांना जर तुम्ही खायला दिले, तर पक्षी ज्या पद्धतीने आनंदी आणि खूश होतात, हे दृश्य पाहताना तुम्ही देखील अनेकदा भारावून जात असता. तुम्ही टाकलेले दाणे, अन्न पक्षी खाल्यानंतर ज्या पद्धतीने उडतात, हे पाहून तुमच्यामध्ये देखील सकारात्मक ऊर्जा उत्पन्न होत असते. पक्षाप्रमाणे तुम्हाला देखील आयुष्य खूप सुंदर असल्यासारखं वाटू लागतं. आणि तुम्ही देखील तुमचे ध्येय यशस्वी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करता. सहाजिकच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचाल, तर लक्ष्मीचा वर्षाव तुमच्यावर होईलच होईल.

दर गुरुवारी तुळशीला दुधाचा नैवेद्य दाखवा. 

भगवान विष्णूला तुळस खूप प्रिय आहे. हे तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल. तुळस लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते, हे देखील तुम्हाला माहिती असेल. सहाजिकच विष्णूची आणि लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहण्यासाठी तुम्हाला तिची नियमित पूजा करणे, आवश्यक आहे. लक्ष्मीला दुधाचा नैवेद्य खूप आवडतो. असे देखील बोललं जातं, आणि म्हणून तुळशीला जर तुम्ही दुधाचा नैवेद्य नियमित दाखवला, तर लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होते. आणि तुमच्या घरामध्ये कधीही पैशाची समस्या उद्भवत नाही.

स्वयंपाक करण्यापूर्वी तव्यावर दूध शिंपडावे

लक्ष्मीला प्रसन्न करणारी माणसं नेहमी श्रीमंत असतात असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण अनेक उपाययोजना करत असतात. हिंदू धर्माचा अभ्यास असणाऱ्या अनेकांना माहिती असेल, लक्ष्मीला हा पदार्थ प्रचंड आवडतो. आणि म्हणून स्वयंपाक करण्यापूर्वी तुम्ही सर्वप्रथम लक्ष्मीला तव्यावर दूध शिंपडून प्रसन्न करून घेणे आवश्यक आहे.

चपाती किंवा भाकरी करण्यापुर्वी तव्यावरती दूध शिंपडलं, तर लक्ष्मी प्रसन्न राहते. आणि लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहते. सहाजिकच त्यामुळे तुमच्या घरात पैशाची कधीही कमतरता भासत नाही. टिप: ही माहिती ज्योतिषशास्त्राच्या गृहितकावर आधारित आहे, याच्याशी महाराष्ट्र लोकशाही खात्री देत नाही.

हे देखील वाचाJobs in Maharashtra: बारावी आणि ग्रॅज्युएशन विद्यार्थ्यांनासाठी नोकरीची सुवर्णसंधी! परीक्षा विना केली जाणार निवड; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

NEGvsENG: बटलर आणि लिविंगस्टनची वादळी खेळी; दोघांनी मिळून 33 चेंडूत कुटल्या 172 दावा! पहा हायलाईट्स

Health Care: जेवणानंतर करा हे काम अन्यथा द्याल या मोठ्या आजाराला निमंत्रण..

मूल होत नसेल तर महिलांना दोष देणं चूकीचे; पुरुषांमध्येच असतात ‘हे’ प्रॉब्लेम; जाणून घ्या समस्या, लक्षणे, उपाय.. 

शुक्राणूंची संख्या इतकी असेल तर लग्नानंतर जाणवत नाहीत समस्या; या गोष्टींचे सेवन केल्यास स्पर्म वाढण्यास होते मदत..

यामुळे किडनीच्या समस्या उद्भवतात; या चार पदार्थाचे सेवन केलयास किडनीच्या समस्या होतात दूर..

मृत्यू होण्यापूर्वी मनुष्याला मिळतात he आठ संकेत..

12500 रुपये जमा केल्यास केंद्र सरकारची ही योजना तुम्हाला बनवेल लखपती; जाणून घ्या या योजनेविषयी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.