Uttar Pradesh: हंबरडा फोडणाऱ्या आजोबांचं एकाने नाही ऐकलं; बुलडोजरने तोडून टाकला उसाचा क्रेशर; डोळ्यातून पाणी आणणारा व्हिडिओ व्हायरल..

0

Uttar pradesh: देशात सगळ्यात जास्त हातावर पोट असणाऱ्यांची संख्या आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी अनेकांना कुठेतरी काबाड कष्ट करून जगाव लागतं. मात्र फार वय झालं नसेल, आणि शरीर तंदुरुस्त असेल तरच हे शक्य आहे. अजूनही अनेकांना म्हातारपणात देखील काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो. त्यासाठी कुठेतरी कामच करावं लागतं, मात्र शरीर साथ देत नसल्याने अशी अनेक मंडळी छोटा-मोठा उद्योग करताना पाहायला मिळतात. यासंदर्भातलाच उत्तर प्रदेशमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यातून पाणी येताना पाहायला मिळतंय.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh CM Yogi Adityanath) यांचा शपथ विधी होण्यापूर्वी एक दिवस अगोदर, आपल्याच राज्यातील एका गरीब आजोबांच्या पोटावर उत्तर प्रदेश सरकारने बुलडोजर फिरवल्याचे घटना घडली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजप कडून वारंवार उत्तर प्रदेश सरकार हे बुलडोजर (bulldozer) सरकार असल्याचं बोललं जातं. हे सरकार गुंडांवर बुलडोजर फिरवतं, माफियांवर बुलडोजर फिरवतं असं अनेकवेळा बोलताना पाहायला मिळते. मात्र दोन दिवसांपूर्वी या सरकारने हातावर पोट असणाऱ्या एका आजोबांच्या उसाच्या क्रेशरवर बुलडोझर फिरवल्याची घटना घडली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीररित्या भूखंडावर कब्जा केलेल्यांची मालमत्ता बुलडोझरने पाडण्याचे काम सुरू आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी, नोएडा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केले. नोएडामध्येच एका ठिकाणी रस्त्याच्या कडेला, एका गरीब आजोबांनी आपली उसाच्या रसाच्या गाडी लावली होती. त्याचं गाडीचा या प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या बुलडोजरने पार खिळखिळा करून टाकला.

विशेष म्हणजे उसाचा गाडा चालवणारे आजोबा आपला बीचाणा भरून गाडी चालू करून जात असताना, प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याने एकच संतापाची लाट उसळली आहे. मी गाडी घेऊन चाललो आहे, तुमच्या बोल्डोझरमुळे माझी गाडी मोडेल, असा जोर जोरात हंबरडा देखील आजोबा फोडताना पाहायला मिळत आहेत. मात्र याचा कसलाही परिणाम या निर्दयी अधिकार्‍यांवर होताना दिसत नाही. हे वयोवृद्ध आजोबा यातनेने विव्हळत, आपले दोन्हीं हात या प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमोर जोडताना देखील व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

कसा घडला प्रकार

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ही घटना नोएडामधील सेक्टर ४२ या ठीकाणची आहे. सतीश गुर्जर नावाचे आजोबा रस्त्याच्या एका कडेला उसाच्या क्रेशरमधून रस काढून आपला उदरनिर्वाह करत होते. तबला 80, हजार खर्च करून गाडीतून उसाचा क्रेशर चालू केला होता. या व्यवसायातून मला दिवसाला चारशे पाचशे रुपये मिळत असल्याचं, आजोबा सांगत असल्याचे देखील हा व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

नियमित प्रमाणे, आज देखील त्यांनी या ठिकाणी उसाचा क्रेशर लावला होता. दिवसाचं काम आटपून आजोबा आपला उसाचा गाडा घेऊन जाणार होते, इतक्यात अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गाडी घेऊन आलेल्या प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्यांची आजोबांच्या गाड्यावर नजर पडली. लगेच अधिकाऱ्याने आपला बुलडोजर उसाच्या गाड्यावर लावला, आणि उसाच्या क्रेशरचे अक्षरशः तुकडे तुकडे करून टाकले. अधिकारी ही कारवाई करत असताना उसाचा गाडा चालवणारे, आजोबा अक्षरशः भरलेल्या डोळ्यांनी हात जोडत होते. मात्र या अधिकाऱ्यांना आजोबांची झालेली अवस्था पाहून कसलाही पाझर फुटला नाही.

अधिकारी ही कारवाई करताना हा प्रकार शेकडो लोक थांबून पाहत असल्याचे, देखील या व्हिडिओत पाहायला मिळत असून यातले अनेक लोक अधिकाऱ्यांना कारवाई करू नका, असं सांगत असल्याचं देखील या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. मात्र हे अधिकारी कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं, पाहायला मिळत आहे. या अधिकाऱ्यांनी आजोबांची उसाच्या रसाची गाडी अतिक्रमणच्या गाडीत जोरदार आपटल्यानंतर आजोबांच्या डोळ्यातून टप टप थेंब पडल्याचं, देखील या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

आजोबांच्या उसाच्या रसाच्या गाडीवर करण्यात आलेल्या या कारवाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, हा व्हिडीओ समाजवादी पार्टीच्या ट्वीटर हँडल भरून देखील शेअर करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टीवर जोरदार निशाणा साधताना समाजवादी पार्टीने म्हटलं आहे, उसाचा रस विकून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या या आजोबांच्या गाडीवर कारवाई करून भाजपने या आजोबांचे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आणलं आहे. या आजोबांपासून सरकारला काय धोका होता? असा सवाल देखील समाजवादीने उपस्थित केला आहे.

या घटनेचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. समाजवादी पक्षानेही या घटनेचा व्हिडीओ शेअर करत योगी सरकारवर निशाणा साधला आहे. सपाच्या ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, “नोएडामध्ये उसाचा रस विकून आपलं पोट भरणाऱ्यावर बुलडोझर चालवून भाजप सरकारच्या सरदारांनी संपूर्ण कुटुंबाला रस्त्यावर आणलंय. मला माहित नाही की सरकारला काय धोका असेल? भाजप पुन्हा एकदा सत्तेत येताच गरिबांना उद्ध्वस्त करत आहे.”

हे देखील वाचा योगींच्या पोलिसांकडून दलित महिलांवर अत्याचार; ‘त्या’ ठिकाणी केली गुरां-ढोरासारखी मारहाण, व्हिडिओ व्हायरल..

  सेल्फी काढायला गेलेल्या सुंदर तरुणीचा चेहरामोहरा ऊंटाने टाकला बदलून; नक्की काय घडलंय? पहा व्हायरल व्हिडिओ…

घरकुलासाठी अर्ज केलाय? घरबसल्या तुमच्या मोबाईलवर ‘अशी’ पहा घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची नावे

Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत.

रेशनची पावती मिळत नाही? चिंता करू नका; ‘असा’ चेक करा दर महिन्याला मिळालेला माल अन् उठवा रेशन दुकानदारचा बाजार…

इतर पुरुषासोबत ‘से ‘क्स’ करताना पतीने पत्नीला रंगेहात पकडलं; गड्याने माफही केलं, पण ठेवली ‘ही’ धक्कादायक अट.

Xiaomi चा पुन्हा धमाका! 6GB रॅम 128GB स्टोरेज, 50MP कॅमेरा असणारा फोन केवळ दहा हजारांत; पहा कुठे सुरू आहे सेल…

या कारणामुळे जीम करत असताना मित्राच्याच डोक्यात टाकली 20 किलो प्लेट; तोल गेल्याचं नाटक करून वाचण्याचा प्रयत्न करत होता पण..,” पहा व्हिडिओ..

‘या’ दहा 5G स्मार्टफोनने गाजवलंय मार्केट! ‘यापैकी’ तुम्ही कोणताही फोन खरेदी करू शकता; दमदार कॅमेऱ्यासह भन्नाट फिचर्स, किंमत केवळ…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.