इतर पुरुषासोबत ‘से ‘क्स’ करताना पतीने पत्नीला रंगेहात पकडलं; गड्याने माफही केलं, पण ठेवली ‘ही’ धक्कादायक अट..

0

लग्न (marriage) म्हणजे माणसाच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा टप्पा असतो. दोन अनोळखी व्यक्ती आयुष्यभरासाठी एकत्र राहण्याचा हा निर्णय असतो. आणि म्हणून लग्नाला खूप महत्त्व आहे. कुठल्याही नात्यात प्रेमाला फार महत्त्व असतं, प्रेमाशिवाय कुठलंही नातं जोपासले जाऊ शकत नाही.  हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. खास करून नवरा-बायकोचं (husband wife) नातं तर निव्वळ प्रेमावर टिकून राहिलेले असतं. नवरा-बायकोचं नातं टिकवायचं असेल, तर  एकमेकांच्या प्रेमाबरोबर एकमेकांना माफ करणं देखील तितकंच महत्वाचं असतं. मात्र कुठपर्यंत, आणि काय माफ करायचं? याला देखील मर्यादा असतात. मात्र एका बहाद्दराने आपल्या बायकोचं लफडे रंगेहाथ पकडून देखील तिला माफ केल्याची घटना घडली आहे.

एका पोर्टलवर विवाहित महिलेने तिच्या आयुष्यात घडलेला एक वाईट अनुभव शेअर करताना, या संदर्भातला धक्कादायक खुलासा केला आहे. विशेष म्हणजे, ही विवाहित महिला दोन मुलांची आई असून देखील तिच्याकडून चुकीचं पाऊल पडलं. यासंदर्भात बोलताना विवाहित महिला म्हणाली, दोन वर्षांपूर्वी मी एका ऑफिसमध्ये कामाला असताना, ऑफिसमधल्या एका सहकाऱ्यासोबत माझे सूत जुळू लागले. मी त्या व्यक्तीसोबत असताना माझं लग्न झाला आहे ही गोष्ट विसरून जायचे.

मी नवीन नवीन ऑफिस जॉईन केलं असल्यामुळे, सुरुवातीला मला याठिकाणी अस्वस्थ वाटत होतं. मात्र एका सहकाऱ्यासोबत चांगले रिलेशन जुळले. आणि नकळत माझ्याकडून मोठी चूक घडली. घरचं वातावरण ठिकठाक होतं, मात्र माझा पती तिसर्‍या मुलासाठी आग्रह करत होता. अगोदरच दोन मुलांची जबाबदारी सांभाळता सांभाळता माझ्या नाकी नऊ आले होते. आणि त्यामुळे आमच्या दोघांमध्ये थोडाफार तणाव निर्माण होत होता.

कदाचित यामुळेच ऑफिसमधल्या सहकार्‍यांसोबत माझी फार जवळीक वाढत गेली. घरी थोडं तणावाचं वातावरण असल्यामुळे, ऑफिसमध्ये वेळ कसा जातो हे कळत नव्हतं. हळूहळू या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झालं, आणि आमचे शा री रि क सं बं ध देखील झाले. मी आता त्याच्यावर प्रचंड प्रेम करू लागले होते. एक वेळ माझ्या मनात हॅरीला सोडून माझ्या बॉयफ्रेंड सोबत संसार थाटावा, असाही विचार आला होता. मात्र तो माझ्या व्यतिरिक्त एका महिलेशी देखील सं बं धा त असल्याचं, मला नंतर समजलं. आणि मी संपूर्ण तुटून गेले.  आता मी माझ्याच नजरेतून उतरले होते, माझे आयुष्य उध्वस्त होण्यास स्वतः मीच जबाबदार होते.

माझ्या सोबत घडलेल्या सगळ्या प्रकारची माहिती माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या, माझ्या पतीलाही झाली होती. मी त्याची केलेली फसवणूक त्याला माहीत झाल्यामुळे, तो देखील पूर्णपणे तुटला होता. मात्र तरीदेखील माणसाच्या हातून चुका घडत असतात, असं बोलून त्याने मला माफ केलं. हे मी आजही विसरले नाही. आम्ही दोघांनीही एकमेकांना समजून घेतलं.  तसं पाहायला गेलं तर, त्यानेच मला समजून घेतलं, आणि सावरलं देखील. सगळं घडून देखील आमचं लग्न तुटलं नाही, हे केवळ हॅरिमुळेच. मात्र त्याने मला माफ करताना एक अट देखील घातली. ती अट म्हणजे, त्याला तिसरे मूल हवे होते आणि तो यावर ठाम होता.

या सगळ्या प्रकरणामुळे मी देखील त्याला याविषयी काहीच बोलू शकले नाही, आणि आम्ही दोघेही तिसऱ्या मुलासाठी तयार झालो.  माझ्या आयुष्यात घडलेल्या प्रकाराविषयी मी माझ्या पतीशी अनेक वेळा बोलले. माझ्या हातून खूप मोठी चूक घडली, आणि त्याचा मला आता खूप पश्चाताप होतोय, असं मी त्याला अनेक वेळा सांगितलं. मात्र यावर तो नेहमी म्हणायचा जे झालं ते झालं, त्यावर आता अधिक चर्चा करून काही उपयोग नाही. आता आपण दोघांनीही पुढे गेलं पाहिजे. मी यापुढे कधीही अफेअर करणार नाही, मी असं जेव्हा त्याला म्हणाले, तेव्हा तो मला हसत म्हणाला, हे तु मला सांगण्याची काहीही गरज नाही. मला देखील खात्री आहे, तू आता इथून पुढे कधीही अफेयर करणार नाहीस.

असंच एकदा आम्ही बसलो असताना, अचानक माझ्या तब्येतीची विचारपूस करणारा मेसेज माझ्या बॉयफ्रेंडचा आला. मात्र मी तो नंबर ब्लॉक करून टाकला. त्याचा मेल पाहून मला जुने दिवस आठवले. मात्र मी यातून सावरले आहे. मात्र एक गोष्ट मला अजूनही सलते, ती म्हणजे माझ्या एका चुकीमूळे हॅरीला असुरक्षित वाटत असेल, ही गोष्ट माझ्या मनाला अजूनही सलते आहे. कधी कधी मला वाटतं हॅरीच्या विश्वासाला मी पात्र नाही. असाही खुलासा तिने एका वेबसाईटला दिलेल्या माहितीत केला आहे.

हे देखील वाचा सेक्स विषयी मॅच्युअर्ड असणाऱ्या पुरुषांकडेच मुली जास्त आकर्षित होतात, आणि संबंधही ठेवतात; पण का? वाचा सविस्तर…

हे’ आसन केल्याने पुरुषांच्या जोषाबरोबर शुक्राणूंचीही संख्या वाढते; जाणून घ्या सविस्तर…

मंडपातूनच प्रियकरासोबत पळून गेली प्रेयसी; होणाऱ्या नवऱ्याने प्रेमात रंग भरणाऱ्या भवानीला शिकवला चांगलाच धडा…

योगींच्या पोलिसांकडून दलित महिलांवर अत्याचार; ‘त्या’ ठिकाणी केली गुरां-ढोरासारखी मारहाण, व्हिडिओ व्हायरल..

Xiaomi चा पुन्हा धमाका! 6GB रॅम 128GB स्टोरेज, 50MP कॅमेरा असणारा फोन केवळ दहा हजारांत; पहा कुठे सुरू आहे सेल…

E-gram swaraj: ‘असा’ चेक करा ग्रामपंचायतीला आलेला निधी,आणि उठवा सरपंचाचा बाजार..

PM Yojna: ‘या’ योजनेअंतर्गत मिळतेय मोफत शिलाई मशीन; कसा करायचा अॉनलाईन अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत...

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.