Viral video: सेल्फी काढायला गेलेल्या सुंदर तरुणीचा चेहरामोहरा ऊंटाने टाकला बदलून; नक्की काय घडलंय? पहा व्हायरल व्हिडिओ..

0

अलीकडच्या काळात सेल्फी (selfie)  घेण्याची क्रेझ तरुण-तरुणींमध्ये प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळतं. जाईल त्या ठिकाणी आपण मोबाईल काढून लगेच सेल्फ घेऊ लागतो. कधी आपण एखादा विशेष व्यक्ती दिसत असेल, तरीदेखील सेल्फी घेतो. तसंच प्राण्यांसोबत देखील आपण सेल्फी काढत सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. सेल्फी घेऊन सोशल मीडियावरती पोस्ट करणं अलीकडच्या काळातली फॅशनच झालीय. मात्र कधी कधी हा सेल्फी तुमच्या जीवावर देखील बेतू शकतो,. असाच एक ऊंटासोबत सेल्फी घेताना तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला (Viral video) आहे.

सेल्फी घेताना अनेक दुर्घटना घडल्याच्या बातम्या आपण सोशल मीडियावर वाचल्या असतील. सेल्फी काढत असताना रेल्वे अपघात, समुद्राच्या कडेला उभं राहून सेल्फी काढत असताना घडलेल्या दुर्घटना आपण अनेक वेळा वाचल्या असतील. मात्र एक तरूणी एक उंटासोबत सेल्फी काढत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. या व्हिडिओत मोठी अशी दुर्घटना घडली नाही, मात्र सेल्फी काढणाऱ्या तरुणीला एक चांगलाच धडा उंटाने शिकवल्याचं या व्हिडिओत पहिला मिळतंय.

नेमकं काय घडलं

उन्हाळ्याची सुट्टी काढून आपण अनेक व्हेकेशनवर फिरायला जात असतो. फिरायला गेल्यानंतर प्रत्येक जण काही नवीन पाहिला मिळाले की, त्यांची आठवण राहावी म्हणून, फोटो काढत असतात. व्हायरल झालेल्या व्हिडीओत देखील ही महिला अशाच एका मैदानावर ज्या ठिकाणी गवत आहे, तिथे एका ऊंटासोबत सेल्फी काढण्यासाठी गेली. ऊंटाला पाहून महिला आनंदित होत असल्याचे, व्हायरल झालेल्या या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. ऊंटासोबत सेल्फी काढू, असं तिच्या मनात आल्याने, ती मोबाईल काढून ऊंटासोबत सेल्फी घेऊ लागली. मात्र तेवढ्या ऊंटाने तिच्या डोक्याचा जोरदार चावा घेतला.

सेल्फी काढत असताना, अचानक उंटाने तिच्या डोक्यावर हल्ला केल्याने, ती एकदम खाली कोसळल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. ऊंटाने हल्ला केल्यानंतर सेल्फी घेणारी तरुणी अचानक खाली पडली. आणि तेवढ्यात हा व्हिडीओ देखील बंद झाल्याचं पाहायला मिळत आहे. ऊंटाने चावा घेतल्यानंतर या महिलेला काही इजा झाली आहे की नाही, हे अद्याप समजले नाही, मात्र ऊंटाने केलेले हे कृत्य तिच्यावर हल्ला म्हणता येणार नाही, कारण तिच्या डोक्याला जास्त मार लागल्याचं दिसत नाही. कदाचित ऊंटाने तीचा डोक्याचा किस घेतला असेल, अशी देखील सोशल मीडियावर चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ afvofficial’ नावाच्या अधिकृत अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून, अनेकांनी यावर भन्नाट कमेंट केल्या आहेत. काही जणांनी हा व्हिडिओ पाहताना चक्क या तरुणीच्या सौंदर्याचं आणि तिच्या गोड स्माईल कौतूक केलं आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखात व्हूज मिळाले असून, अनेकानी खूपच मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.

काय म्हणाले नेटकरी

afvofficial’ नावाच्या अधिकृत अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला अनेकांनी लाईक आणि कमेंट केल्या आहेत. एका युजर्सने या व्हिडिओवर कमेंट करताना म्हटले आहे, नेहमी वाळवंटात राहणाऱ्या उंटाला पहिल्यांदाच हरियाली पहिला मिळाली असेल, आणि म्हणून उंटाने ती खावी या भावनेतून तरुणीचा चावा घेतला असेल. तर दुसर्‍या एका युजर्सनी म्हटलं आहे, उंटाने या तरुणीवर हल्ला केला नाही, तर सुंदर तरुणी दिसल्यावर त्याला देखील किस करण्याचा मोह आवरला नसेल.

या व्हिडिओवर एका यूजर्सने कमेंट करताना म्हटले, सुरुवातीला मला उंट दिसलाच नाही. या तरुणीचे सौंदर्य आणि स्माईल पाहून सुरूवातीला मला या व्हिडिओत नक्की काय आहे? हेच कळाले नाही, मात्र ती तरुणी खाली पडल्यानंतर मी पुन्हा व्हिडिओ रिपीट करून पाहिला, नक्की काय प्रकार घडला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर भन्नाट कॉमेंट्स केल्या असून, या व्हिडिओला अनेकांनी लाईक देखील केलं आहे.

हे देखील वाचा घरकुलासाठी अर्ज केलाय? घरबसल्या तुमच्या मोबाईलवर ‘अशी’ पहा घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची नावे..

Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत.

रेशनची पावती मिळत नाही? चिंता करू नका; ‘असा’ चेक करा दर महिन्याला मिळालेला माल अन् उठवा रेशन दुकानदारचा बाजार..

योगींच्या पोलिसांकडून दलित महिलांवर अत्याचार; ‘त्या’ ठिकाणी केली गुरां-ढोरासारखी मारहाण, व्हिडिओ व्हायरल….

Xiaomi चा पुन्हा धमाका! 6GB रॅम 128GB स्टोरेज, 50MP कॅमेरा असणारा फोन केवळ दहा हजारांत; पहा कुठे सुरू आहे सेल..

यावर क्लिक करून पहा व्हिडिओ..

या कारणामुळे जीम करत असताना मित्राच्याच डोक्यात टाकली 20 किलो प्लेट; तोल गेल्याचं नाटक करून वाचण्याचा प्रयत्न करत होता पण..,” पहा व्हिडिओ..

Viral Video: चार वाघांना एकटं माकड पुरून उरलं; व्हायरल व्हिडिओ पाहून..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.