प्रधानमंत्री आवास योजना: घरबसल्या तुमच्या मोबाईलवर ‘अशी’ पहा घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी..

0

पंतप्रधान आवास योजना: आपलंही एक घर असावं, अशी प्रत्येक नागरिकांची इच्छा असते. मात्र प्रत्येक नागरिकाला घर बांधणं शक्य नसल्याने, सरकार घर बांधण्यासाठी त्याला मदत करत असतं. आणि म्हणून 2016ला केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना सुरू केली. या योजनेचा उद्देश 2022 पर्यंत देशातल्या नागरिकांना तब्बल 2 कोटी 95 लाख पक्की घरं देण्याचा मानस आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही देखील घरकुल  मिळवण्यासाठी अर्ज केला असेल, चला तर मग, पाहूया घरकुल मंजूर झालेल्या ऑनलाइन यादीत आपले नाव आहे की नाही. तसेच कोणत्या साली कोणाला किती घरकुले मिळाली, याची देखील सविस्तर माहिती घेऊया.

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत घरकुलासाठी तुम्ही देखील अर्ज केला असेल, मात्र तुमचं नाव घरकुल यादीत आले आहे की नाही, हे तुम्हाला पहायचं आहे? काळजी करू नका, आम्ही तुमच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गतअर्ज मंजूर झालेल्या घरकुलाचे माहिती घेऊन आलो आहोत. सुरवातीला आपण ही योजना काय आहे याची माहिती घेऊयात.

          प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण

या योजनेअंतर्गत देशातला प्रत्येक नागरिकांकडे पक्की घरं असली पाहिजेत, या हेतूने 2016 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण सुरू केली. या योजनेअंतर्गत 2022 पर्यंत देशभरात तब्बल 2 कोटी 95 लाख घरं बांधण्याचा मानस केंद्र सरकारचा आहे. या योजनेचे स्वरूप पाहिले तर, या योजेअंतर्गत 25 स्क्वेअर मीटरचं घर बांधायचं आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मैदानी राज्यात एक लाख वीस हजार रुपये मिळतात. तर पर्वतीय राज्यांमध्ये ही रक्कम 1 लाख 30 हजार रुपये देण्यात येते. विशेष म्हणजे ही रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात टाकली जाते.

ज्या नागरिकांनी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज केला आहे, आणि ज्यांची घरकुलासाठी निवड करण्यात आली आहे ,अशा लाभार्थ्यांची यादी केंद्र सरकार जाहीर करत असतं. यादी तुम्हाला ऑनलाईन देखील पाहता येते. त्यासाठी केंद्र सरकारने एक वेबसाईट देखील उपलब्ध केली आहे. घरकुलासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन कशी पाहायची याची सविस्तर माहिती सोप्या भाषेत आपण घेऊया.

           अशी पहा लाभार्थ्यांची अॉनलाईन यादी

केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांची यादी पाण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये क्रोमवर जाऊन pmay.nic.in असं सर्च आवश्यक आहे. हे सर्च केल्यानंतर तुमच्या समोर Pradhan Mantri Awaas Yojana – Gramin ya नावाचं एक पेज ओपन झालेलं दिसेल. यानंतर तुम्हाला Pradhan Mantri awaas Yojana- Gramin, Guidelines  असेच Cirulars अशा प्रकारचे तीन पर्याय दिसणार आहेत.

इथर्यंतच सगळी प्रोसेस झाल्यानंतर ,तुम्हाला पाहिल्या पर्यायावर क्लिक करायचे आहे. पहिला पर्याय Pradhan Mantri awaas Yojana- Gramin असा असणार आहे. जर हा पर्याय आला नसेल, तर तुम्ही काहीतरी चूक केली आहे. त्यासाठी तुम्हाला वर जाऊन पुन्हा एकदा वाचावं लागणार आहे . ही प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणची वेबसाईट ओपन झालेली दिसणार आहे.

ही वेबसाइट ओपन झाल्यानंतर तुम्हाला यामध्ये केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने किती घरकुलांचे  उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच त्यासाठी आतपर्यंत किती जणांनी नोंदणी केली आहे, नोंदणी केलेल्या पैकी किती जणांची घरे  मंजूर झाली आहेत, अशी सगळी माहिती मिळणार आहे विशेष म्हणजे, मंजूर झालेल्या घरकुलांपैकी किती घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे, यांची देखील माहीती मिळणार आहे. त्याच बरोबर केंद्र सरकारने आत्तापर्यंत किती लाभार्थ्यांच्या खात्यात किती कोटी रुपये निधी टाकला, या संदर्भात देखील संपूर्ण तपशील देण्यात आलेला दिसेल.

आता आपण मंजूर झालेल्या घरकुलांची यादी कशी चेक करायची हे पाहूयात…

वर दिलेली माहिती जर तुम्ही व्यवस्थित वाचली असेल, तर तुमच्या लक्षात येईल, तर तुम्हाला वरच्या ठिकाणी असलेल्या ‘Awaassoft’ या पर्यायावर क्लिक करणं आवश्यक आहे. Awaassoft या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर report पर्याय ओपन झालेला दिसेल.  तुम्हाला बरोबर याच पर्यायावर क्लिक करायचं आहे. report या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील, मात्र तुम्हाला Social Audit Reports याच पर्यायावर क्लिक करायचं आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर Beneficiary details for verification हा पर्याय ओपन झालेला दिसेल, तुम्हाला या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

आतापर्यंत तुम्ही व्यवस्थित प्रोसेस केली असेल, तर तुमच्यासमोर  MIS Report असं एक पेज ओपन झालेलं असेल. हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला  selection filters हा पर्याय दिसेल, या पर्यायाखाली तुम्हाला Filters हा पर्याय निवडायचा आहे. इथपर्यंत प्रोसेस झाल्यानंतर, सुरुवातीला तुम्हाला राज्य, नंतर जिल्हा, आणि तालुका तसेच सगळ्यात शेवटी गाव देखील निवडावं लागणार आहे. ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर, तुम्हाला ज्या वर्षाची यादी पाहायची आहे ते साल निवडायचं आहे.

ही प्रोसेस झाल्यानंतर, तुम्हाला कोणत्या योजनेमधील घरकुल लाभार्थ्यांची यादी बघायची आहे, ती योजना निवडावी लागणार आहे. याठिकाणी तुम्हाला All central schemes, All states schemes, मुख्यमंत्री आवास योजना, राजीव गांधी आवास योजना असे पर्याय दिसतील, त्यातला तुम्ही, तुम्हाला हव्या असणाऱ्या माहितीनुसार पर्याय निवडायचा आहे.

आता तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण या योजनेअंतर्गत मंजूर झालेली यादी हवी असल्याने माझ्याप्रमाणेच तुम्ही देखील प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण हाच पर्याय निवडला असेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, कॅप्चाच्या रकाना दिसेल, त्यात तुम्ही समोर पाहायला मिळत असणारी बेरीज किंवा वजाबाकीच्या प्रश्नाचे उत्तर या रकान्यात टाकणं आवश्यक आहे. ही प्रोसेस झाल्यानंतर, तुम्हाला सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील मंजूर आलेल्या घरकुलाचे यादी पाहता येणार आहे.

(जर तुम्हाला यात काही अडचण येत असेल, तर तुम्ही कमेंट करून सांगा, आम्ही पुन्हा पडताळणी करून माहिती देण्याचा प्रयत्न करू. पण सहसा या प्रोसेस नुसार तुम्ही गेला असेल, तर काही अडचण येणार नाही)

हे देखील वाचा रेशनची पावती मिळत नाही? चिंता करू नका; ‘असा’ चेक करा दर महिन्याला मिळालेला माल अन् उठवा रेशन दुकानदारचा बाजार..

Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

E-gram swaraj: ‘असा’ चेक करा ग्रामपंचायतीला आलेला निधी,आणि उठवा सरपंचाचा बाजार..

या’ दहा 5G स्मार्टफोनने गाजवलंय मार्केट! ‘यापैकी’ तुम्ही कोणताही फोन खरेदी करू शकता; दमदार कॅमेऱ्यासह भन्नाट फिचर्स, किंमत केवळ…

या कारणामुळे जीम करत असताना मित्राच्याच डोक्यात टाकली 20 किलो प्लेट; तोल गेल्याचं नाटक करून वाचण्याचा प्रयत्न करत होता पण..,” पहा व्हिडिओ..

योगींच्या पोलिसांकडून दलित महिलांवर अत्याचार; ‘त्या’ ठिकाणी केली गुरां-ढोरासारखी मारहाण, व्हिडिओ व्हायरल…

इतर पुरुषासोबत ‘से ‘क्स’ करताना पतीने पत्नीला रंगेहात पकडलं; गड्याने माफही केलं, पण ठेवली ‘ही’ धक्कादायक अट..

या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीसोबत शरद पवारांच्या नातूचा कारनामा कैमेऱ्यात कैद; पहा व्हायरल फोटोत..

Xiaomi चा पुन्हा धमाका! 6GB रॅम 128GB स्टोरेज, 50MP कॅमेरा असणारा फोन केवळ दहा हजारांत; पहा कुठे सुरू आहे सेल…

‘या’ दोन वेबसाइट्सनी Amazon आणि Flipkart चा उठवलाय बाजार; निम्म्यापेक्षा कमी किमतीत विकतायत वस्तू…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.