Pradhan Mantri Awas Yojana: घरकुल लाभार्थ्यांना आता जागा खरेदीसाठी मिळणार अधिकचे पन्नास हजार; वाचा सविस्तर..
Pradhan Mantri Awas Yojana: देशातल्या प्रत्येक नागरिकाकडे आपलं स्वतःचं हक्काचं पक्क घर असावं, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेची (Pradhan Mantri Awas Yojana) सुरुवात केली. या योजनेअंतर्गत देशातील गरीब जनतेकडे आपलं स्वतःच घर असावं, हा या मागचा उद्देश आहे. केंद्र सरकारकडून (central government) ही योजना (Yojana) 2015 आली सुरू करण्यात आली. घरकुल (gharkul Yojana) मंजूर झालेल्या अनेक लाभार्थ्यांकडे घर बांधण्यासाठी हक्काची जमीन नसणारांसाठी देखील सरकार अतिरिक्त पन्नास हजार रुपयाची मदत करते. जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
देशातील गरीब जनतेला आपल्या हक्काचे घर असावे, यासाठी केंद्र सरकारने 2015 सली प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात केली. केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकार देखील घरकुल योजना राबवत असते. रमाई आवास योजना, पारधी आवास योजना, आदीम आवास योजना, शबरी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, त्याचबरोबर अटल बांधकाम कामगार आवास योजना अशा योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रमध्ये देखील स्वतःचं पक्कं घर नसणाऱ्यांसाठी घरकुल देण्यात येते.
बांधकामाचा नियम आणि निधी
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या या योजनांमधून ज्या नागरिकांकडे स्वतःचं पक्कं घर नाही, अशा नागरिकांना घरकुल देण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आणि पात्रता देखील ठेवण्यात आली आहे. लाभार्थी हा अल्पभूधारक असणे आवश्यक आहे. सोबतच त्यांच्याकडे कोणतेही वाहन नसावं, घर असलं तरी कच्च असणे आवश्यक आहे. यासह आणखी काही अटी आहेत, तुम्ही ग्रामसेवकाशी संपर्क करून याविषयी सविस्तर माहिती घेऊ शकता.
या योजनेअंतर्गत जर तुम्हाला घरकुल मंजूर झालेला असेल, तर ते नियमातच बांधणे आवश्यक आहे. २६९ चौरस कार्पेट एरिया असलेल्या जागेमध्ये तुम्हाला घर बांधणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजार पर्यंतचं अनुदान दिलं जातं. अनेक लाभार्थ्यांकडे 269 चौरस कार्पेट इतकी जागा नसल्याचे देखील पाहायला मिळते. अशा लाभार्थ्यांना सरकार जागा खरेदीसाठी 50 हजार रुपयाची मदत देखील करतं. आज आपण याचविषयी सविस्तर जाणून घेऊ.
काय आहे पन्नास हजार मदतीची योजना?
“पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थ सहाय्य योजना” (Pandit Dindayal Land Purchase yojana) (PDU) असे या योजनेचे नाव आहे. या योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना (Gharkul Beneficiary) घर बांधण्यासाठी 500 चौरस फूट कार्पेट एरिया इतकी जागा खरेदी करण्या करिता सरकार 50 हजार रुपयांपर्यंत मदत करते. ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाला आहे, आणि त्यांच्याकडे घर बांधण्यासाठी कुठेही मालकी हक्काची जागा नसेल, अशाच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. जर तुमच्याकडे जागा नाही, मात्र यापूर्वी तुम्हाला घरकुलाचा लाभ मिळाला आहे. तर मात्र तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
घर बांधण्यासाठी जागा नसणारे किती लाभार्थी आहेत?
राज्य सरकार घरकुल लाभार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी (PDU) या योजनेच्या माध्यमातून घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देते. याशिवाय अतिक्रमण नियमानुकूल, विनामूल्य शासकीय जमिनीमध्ये लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याचे काम देखील सरकार करते.
महाराष्ट्रमध्ये आतापर्यंत एक लाख 11 हजार 856 भूमीही घरकुल लाभार्थी आहेत. यापैकी 58321 एवढ्या लाभार्थ्यांना सरकारने घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. म्हणजेच, जवळपास 53,535 लाभार्थ्यांना अजूनही घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध झालेली नाही. अधिक माहितीसाठी तुम्ही ग्रामसेवक किंवा गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क करू शकता.
हे देखील वाचाRation Card: गोड बातमी! जानेवारीत सरकार रेशन कार्ड धारकांना देणार अडीच हजार; जाणून घ्या अधिक..
Urea Subsidy: युरिया खरेदीची चिंता मिटली; सरकार देतय 2,700 रुपये अनुदान, असा घ्या लाभ..
Chanakya Niti: चुकूनही करू नका हे काम, नाहीतर तुमचे जवळचे लोकदेखील घेतील फायदा.
Pregnancy Tips: या दिवसांत संबंध ठेवल्यास लगेच राहाल गरोदर..
Golden Guys Bigg Boss: कुठून आलं एवढं सोनं, सोन्याच्या गाड्या मोबाईल; जाणून जाल कोमात..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम