Navratri vrat: नवरात्रीत उपवासाला भगर खात असाल तर पहिल्यांदा ही बातमी वाचा; भगरी विषयी जाणून घ्या या गोष्टी अन्यथा.. 

0

Navratri vrat: हिंदू धर्मामध्ये नवरात्री हा उत्सव (Navratri utsav) मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. अनेक जण नवरात्रीचे उपवास देखील मोठ्या श्रद्धेने ठरतात. अनेकजण या काळात पायामध्ये चप्पल देखील घालत नाहीत. प्रत्येक जण आपापल्या श्रद्धेनुसार या काळात देवीची पूजा करत असतात. नवरात्रीच्या उपवासाबद्दल तुम्हाला अधिक सांगण्याची गरज नाही. मात्र अनेकजण या उपवासामध्ये भगर (Bhagar) खातात. इतर फराळापेक्षा भगर ही पचायला अधिक सोपी असते. असा अनेकांचा समज असतो आणि म्हणून दोन किंवा तीन वेळा देखील अनेक जण भगर शिजवून खात असतात. मात्र भगर खाण्यासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) महत्त्वाची माहिती प्रसारित केली आहे. जाणून घेऊया सविस्तर.

महिन्यातला किंवा आठवड्यातला एखादा दिवस आपण साबुदाण्याची खिचडी हा पदार्थ मोठ्या आवडीने खातो. मात्र साबुदाण्याची खिचडी ही पचायला खूप जड असते. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे. त्यामुळे अनेकजण उपवासामध्ये साबुदाण्याची खिचडी पासून दोन हात लांब राहण्याचा प्रयत्न करतात. सलग नऊ दिवस उपवास धरायचे असतील, तर साबुदाण्याच्या खिचडीचा दूरपर्यंत अनेकांशी संबंध येत नाही. साहजिकच नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या उपवासामध्ये (Navratri upvas) अनेक जण खजूर त्याचबरोबर विविध प्रकारची फळे इत्यादींचा वापर करतात. मात्र अनेकांना फक्त फळं खाणं परवडत देखील नाही. फक्त फळाने भूक देखील वारंवार लागते.

सर्व गोष्टींचा विचार करून, अनेक जण नवरात्रीच्या उपवासामध्ये भगर हा पदार्थ सर्वत्र मोठ्या आवडीने खातात. अनेक ठिकाणी या पदार्थाला वरीचे तांदूळ असे देखील संबोधतात. खेडेगावात भगर हा शब्द अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळतो. भगर पचायला खूप हलकी असते, त्याचबरोबर या भगरीची चव देखील उत्तम लागते. साहजिकच यामुळे अनेकांना उपवासामध्ये भगरीचे सेवन करणे अधिक सोयीस्कर आणि सोप्पं वाटतं. भगर पचायला खूप हलकी असली, तरी देखील अन्न आणि औषध प्रशासनाने या संदर्भात माहिती प्रसारित केली असून, सकाळी शिजवलेली मगर संध्याकाळी बिलकुलही न खाण्याच्या सूचना दिल्या आहेत. एवढंच नाही, तर याबाबत आणखीनही काही नियम प्रसारित करण्यात आले आहेत. जाणून घेऊया सविस्तर.

काय म्हणाले अन्न आणि औषध प्रशासन

नवरात्रीच्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भगरीची विक्री होते. या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात बदलला मागणी असल्यामुळे, बाजारामध्ये भेसळयुक्त भगर देखील विकली जाण्याची शक्यता अधिक असते. आणि ही बाब लक्षात घेऊन, अन्न आणि औषध प्रशासनाने या संदर्भात काही नियम आणि अटी देखील लागू केल्या असून, सतर्क राहून काही सूचना केल्या आहेत. जर तुम्ही दुकानातून भगर खरेदी करत असाल, तर तुम्ही सुट्टी भगर कधीही खरेदी करू नये, असं अन्न आणि औषध प्रशासनाने म्हटलं आहे. भगर ही नेहमी पॅकिंगमधीलच खरेदी करावी.

याबरोबरच भगर खरेदी करताना पॅकेट वरची एक्सपायरी डेट आणि मॅन्युफॅक्चरिंग तारीख देखील तपासून घेणे आवश्यक आहे. खूप महिन्यापूर्वीची जर मॅन्युफॅक्चरिंग तारीख असेल, तर तुम्ही भगर खरेदी न केलेली बरी. असं देखील अन्न आणि औषध प्रशासनाने म्हटलं आहे. नवरात्रीच्या उपवासामध्ये भगरीला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते, साहजिकच यामुळे अनेक रिटेलर नवरात्री पूर्वीच खूप मोठ्या प्रमाणात भगरीचा साठा करून ठेवतात. अशावेळी भगर खराब देखील होण्याची शक्यता असते‌. आणि म्हणून भगर खरेदी करताना एक्सपायरी डेट ऐवजी मॅन्युफॅक्चरिंग डेट किती जुनी आहे, हे तपासून घेणे आवश्यक असल्याचं म्हटले आहे. आता आपण भगर खरंच पचायला हलकी असते का? याविषयी असणारे गैरसमज देखील दूर करू.

भगर पचायला हलकी असते?

भगर ही पचायला खूप हलकी असते, असा अनेकांचा समज आहे. मात्र हा निव्वळ गैरसमज असून, भगर पचायला अजिबात हलकी नसते. जर तुम्ही बारकाईने विचार केला, तर भगर शिजवताना खूप मोठ्या प्रमाणात पाणी लागते, हे तुमच्या लक्षात येईल. अनेक जण भगरीचे पीठ तयार करून भाकरी देखील बनवतात. मात्र यामुळे पित्त होण्याची देखील शक्यता असते. भगर ही नेहमी सर्वप्रथम भाजून घेणे आवश्यक आहे. भगर भाजून घेतल्यानंतरच, भगरीचा भात करणे आवश्यक आहे, ही योग्य पद्धत आहे. न भाजता आपण भगर शिजायला घालतो, आणि मग अपचनाची समस्या देखील उद्भवते. आता आपण भगर खाण्याची योग्य पद्धत काय आहे? हे देखील जाणून घेऊ.

भगर शिजवण्याची ही आहे योग्य पद्धत.

भगरीचा गुणधर्म हा कोरडा असतो. तुम्ही पाहिलं असेल भगर ही नेहमी कोरडी असते. त्यामूळे सर्वप्रथम भगर तुपात किंवा तेलामध्ये भाजून घेणे आवश्यक आहे. एवढं करून देखील भगरीमध्ये स्निग्धता कमीच राहते. सर्वप्रथम भगर व्यवस्थितरीत्या भाजल्यानंतर तुम्ही कमी आचेवर भगर शिजवणे आवश्यक आहे. याबरोबरच खूप प्रमाणात पाणी देखील वापरणं आवश्यक आहे. भगर व्यवस्थितरित्या काळजी घेऊन, या पद्धतीने खाल्ली तरी देखील पित्त होण्याची शक्यता असते. साहजिकच यामुळे भगर नेहमी कमी प्रमाणात खावी. त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे, भगर कधीच सकाळी शिजवल्यानंतर दुपारी किंवा संध्याकाळी खाऊ नये.

हे देखील वाचाLifestyle: विसाव्या वर्षात चुकूनही करू नका हे काम; अन्यथा आयुष्याची राख रांगोळी होण्यापासून कोणीच नाही वाचवू शकणार..

SBI Recruitment 2022: या पदवीधरांसाठी SBI मध्ये निघाली मेगाभरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज..

Women Psychology: सेक्स करताना महिलांच्या डोक्यात सुरू असतो हा अजब विचार; जाणून उडतील होश..

Ways To Impress A Girl: या पुरुषांना मिळवण्यासाठी महिला कोणाचीही पर्वा न करता वाट्टेल ते करतात; जाणून तुम्हालाही येईल चक्कर..

Flipkart Jobs: फ्लिपकार्टमध्ये निघाली मेगा भरती! या पद्धतीने करता येणार वर्क फ्रॉम होम; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Government E-Commerce Site: फ्लिपकार्ट अमेझॉन वेबसाईटचा या सरकारी वेबसाईटने उठवला बाजार; लोक दाबून करतायत ऑर्डर..

Amazon flipkart Sale: flipkart आणि Amozon वर सुरू आहे offers चा धुमाकुळ; स्मार्टफोनसह या वस्तू मिळतायत निम्म्या किमतीत..

Extramarital affairs: या 6 कारणांमुळे ठेवले जातात विवाहबाह्य संबंध; विवाहबाह्य संबंधापासून दूर राहायचं असेल तर करा या गोष्टी..

Extra Marital Affair: पती किंवा पत्नी दुसऱ्यासोबत रंगेहाथ पकडली तर कायदा काय सांगतो? जाणून सरकेल पायाखालची जमीन..

Maruti Suzuki Jimny: महिंद्रा थारचा Maruti Suzuki Jimmy ने उठवला बाजार; जाणून घ्या या कारची वैशिष्ट्य फीचर आणि किंमत..

Electric Scooter: अमेझॉनवर मिळतेय जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर फक्त इतक्या हजारात..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.