Maruti Suzuki Jimny: महिंद्रा थारचा Maruti Suzuki Jimmy ने उठवला बाजार; जाणून घ्या या कारची वैशिष्ट्य फीचर आणि किंमत..

0

Maruti Suzuki Jimny: मार्केटमध्ये येणाऱ्या नवनवीन कारकडे अनेक जण आकर्षित होत असतात. करून अलीकडच्या काळात भारतामध्ये एसयूव्ही कारची खूप मोठ्या प्रमाणात क्रेझ असल्याचा पाहायला मिळतं. त्यामधील ग्राहकांचं एसयू कार विषयी आकर्षण वाढत आहे हे लक्षात घेऊन महिंद्रा यांनी धार या गाडीची निर्मिती केली. आणि ही गाडी पाहता पाहता प्रचंड लोकप्रिय देखील झाली. अनेक स्टार मंडळी देखील या गाडीचे चाहते झाल्याचे पाहायला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देखील Mahindra Thar गाडीवर आपली रॅली काढलेली तुम्ही तुम्ही पहिली देखील असेल. मात्र आता या गाडीचा Maruti Suzuki Jimny या एसयूव्ही कारने बाजार उठवला आहे. (Maruti Suzuki Jimny SUV car launch)

भारतामध्ये महेंद्रा आणि मारुती Mahindra and Maruti Suzuki) या दोन्हीही कंपन्यांच्या फोर व्हीलर (four wheeler) गाड्या खूप मोठ्या प्रमाणात पसंत केल्या जातात. या दोन्ही कंपन्या सर्वसामान्यांना परवडेल अशा कारची देखील निर्मिती करत असल्याने अनेकांमध्ये या दोन्ही कंपनी विषयी एक आकर्षण असल्याच देखील पाहायला मिळतं. ग्राहक नेहमी दर्जेदार त्याबरोबरच किंमत देखील आपल्याला परवडणारी असावी असा विचार करत असतात. साहजिकच या गोष्टीचे भान ठेवून, या दोन्ही कंपनी आपल्या गाड्यांची निर्मिती करत असतात. दोन्हीं कंपनीमध्ये प्रचंड कॉम्पिटिशन असल्याचे देखील पाहायला मिळतं. आता पुन्हा एकदा महेंद्रा थारला (Mahindra Thar) टक्कर देण्यासाठी Maruti Suzuki Jimny या एसयूव्हीची निर्मिती केली आहे.

ग्राहक मारुती सुझुकी (Maruti Suzuki) या कंपनीच्या गाड्या खूप मोठ्या प्रमाणात पसंत करतात. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन ही कंपनी नेहमी आपल्या गाडीची निर्मिती करीत असते. आता पुन्हा एकदा ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन, या कंपनीने नवीन कारची निर्मिती केली असून, जानेवारी 2023 मध्ये ही गाडी लॉन्च करण्यात येणार असल्याचं बोललं जातं आहे. मात्र लॉन्च होण्यापूर्वीच गाडीची सध्या जोरदार चर्चा रंगली असल्याने, लॉन्च झाल्यानंतर, ही गाडी मार्केटमध्ये कहर करणार असल्याचे देखील तज्ञांचे मत आहे. अनेक जण या गाडी विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं जाणवल्यानंतर आम्ही देखील या गाडी विषयी संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया गाडीचे वैशिष्ट्य फिचर्स आणि किंमत.

गाडीचा लूक आणि फीचर्स 

मारुती सुझुकी कंपनीची Maruti Suzuki Jimny ही suv कार जानेवारी 2023 मध्ये लॉच करण्यात येणार आहे. मारुती सुझुकीने महिंद्रा थार या गाडीला टक्कर देण्यासाठी ही गाडी मार्केटमध्ये उतरवली असल्याचे देखील बोलले जात आहे. विशेष म्हणजे, या गाडीला तब्बल पाच दरवाजे असणार आहेत. ग्राहकांसाठी 5 डोअर जिमी देशामध्ये ‘जिप्सी’ नेमप्लेट आणणार असल्याचं देखील बोललं जात आहे. या गाडीच्या ट्रायल दरम्यान फोटो लीक झाले आहेत. ज्यात आपण गाडीची लांबी त्याचबरोबर पाठीमागचा दरवाजा देखील पाहिला जाऊ शकतो. (5-Door Jimny)

या गाडीच्या लीक झालेल्या फोटोमध्ये आपण पाहू शकतो, या गाडीला ५ दरवाजे आहेत. मात्र ही गाडी प्रोटोटाइपसह टेलगेट माउंटेड स्पेअर व्हीलमध्ये नसणार आहे. हे वाचून तुम्ही दुःखी होण्याचे कारण नाही. त्याचे कारण म्हणजे, हे एक त्यापेक्षा उत्तम व्हर्जन असल्याचं बोललं जात आहे. काही माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, या गाडीचा व्हीलबेस हा तब्बल २,५५० किलोमीर एवढा असणार आहे. या गाडीच्या लांबी विषयी जाणून घ्यायचे झाल्यास, लांबी तब्बल ३,८५० मिमी असणार आहे. त्याचबरोबर या गाडीची रुंदी ३ डोर गाडी एवढीच असणार आहे. याशिवाय या गाडीमध्ये मोठी बूट स्पेस देखील ग्राहकांना मिळणार आहे.

मारुती सुझुकी जिमी या गाडीचे लिक झालेल्या फोटोमध्ये पोपटी रंगाचा कलर पाहायला मिळत आहे. एकूणच या गाडीचे रंग अशाच प्रकारचे विविध कलर असल्याचे देखील बोलले जात आहे. टेलगेट-माउंट करण्यात आलेले स्पेअर व्हील त्याचबरोबर चंकी अलॉय व्हील देखील असणार आहे. समोरच्या विंडोलाइट जवळ एक किंक तसेच बंपर-माउंट करण्यात आलेली एलईडी लाइट्स देखील ग्राहकांना मिळणार आहे. लीक झालेल्या फोटोमध्ये हे सर्व पाहायला मिळत असले, तरी अधिकृत असा तपशील मात्र याविषयी समोर आलेला नाही. विशेष म्हणजे राईट हँड ड्राईव्ह मॉडेल फक्त भारतातील ग्राहकांसाठी बनवण्यात आले आहे.

इंजिन आणि किंमत

ही suv जानेवारी 2023 मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. या एसयूव्ही कारची किंमत देखील समोर आली आहे. मारुती सुझुकी सुरुवातीची किंमत ही दहा लाखापासून सुरू होणार असल्याचं बोलले जात आहे. या गाडीमध्ये नऊ-इंचाचा टचस्क्रीन देखील पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर 360-डिग्री कॅमेरा देखील असणार आहे. याशिवाय ग्राहकांच्या सेफ्टीसाठी तब्बल सहा एअरबॅक्स देखील असणार आहेत. विशेष म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्थिरतेवर नियंत्रित करण्यात आलेल्या आहेत. महिंद्रा थार पेक्षा ही एसयूव्ही कार खूप दर्जेदार बनवण्यात आली असून, या कारची अनेकांमध्ये उत्सुकता असल्याचे देखील पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा Ration Card new updateआता रेशन कार्ड चालू ठेवायचं असेल, तर त्वरीत करा ही अपडेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Government E-Commerce Site: फ्लिपकार्ट अमेझॉन वेबसाईटचा या सरकारी वेबसाईटने उठवला बाजार; लोक दाबून करतायत ऑर्डर..

sleeping direction: अविवाहितांनी कधीच या दिशेला पाय करून झोपू नये; जाणून घ्या या मागचं शास्त्र आणि झोपण्याची योग्य पद्धत..

LGBTQ: होय तृतीयपंथीयांचा आशिर्वाद असतो शुभ; जाणून घ्या तृतीयपंथी आणि देवाचे कनेक्शन..

Electric Scooter: अमेझॉनवर मिळतेय जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर फक्त इतक्या हजारात..

Kareena Kapoor: शालेय जिवनातच या व्यक्तीकडून करीना कपूर झाली होती प्रेग्नंट; प्रकरण वाचून बसेल धक्का..

SBI Recruitment 2022: या पदवीधरांसाठी SBI मध्ये निघाली मेगाभरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज..

Amazon flipkart Sale: flipkart आणि Amozon वर सुरू आहे offers’ s चा धुमाकुळ; स्मार्टफोनसह या वस्तू मिळतायत निम्म्या किमतीत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.