Amazon – flipkart Sale: flipkart आणि Amozon वर सुरू आहे offers’s चा धुमाकुळ; स्मार्टफोनसह या वस्तू मिळतायत निम्म्या किमतीत..

0

Amazon – flipkart Sale: ऑनलाईन खरेदीच्या (online shopping) प्रमाणात आपल्याकडे प्रचंड वाढ होते आहे. ऑनलाईन खरेदीत घरबसल्या पाहिजे त्या वस्तू अगदी किफायतशीर किंमतीत मागवता येतात. त्यामुळे आजकाल घरातल्या साध्यातल्या-साध्या वस्तूंपासून ते फर्निचर वगैरेपर्यंतच्या वस्तू ऑनलाईन खरेदी केल्या जात आहे. मोबाईल आणि ईंटरनेटचा (mobile and internet) वाढता वापर हे सुद्धा यामागील कारण असू शकते. त्यामुळे भारतीय बाजारात ऑनलाईन खरेदी-विक्री करणार्‍या वेबसाईट्सचा सुद्धा चांगला जम बसतो आहे. या वेबसाईट्सने (e-commerce website) भारतीय ग्राहकांची नस ओळखली आहे. तसेच भारतीयांच्या अपेक्षा जाणुण घेत या वेबसाईट्सवर ऑफरची उधळण केली जाते. (Great Indian festival and Flipkart big billion days sale out now)

सध्या आपल्याकडे सण-उत्सवाचा काळ आहे. सण-उत्सवादरम्यान आपल्याकडे सर्वाधिक खरेदी केली जाते. सण-उत्सवांना शुभ मुहुर्त मानले जाते, त्यामुळे यादरम्यान नविन गोष्टी खरेदी करण्यावर लोकांचा भर असतो. त्यामुळे वेबसाईट्सवर सुद्धा या काळात अक्षरश: ऑफरची उधळण केली जाते. मोबाईलचा आणि या ऑनलाईन वेबसाईटचा सर्वाधिक वापर तरुणांकडून केला जातो. त्यामुळे तरुणांना या वेबसाईटवर विशेष आकर्षित केले जाते. तरुणमंडळी सुद्धा या वेबसाईटवर लक्षच ठेउन असतात. ऑफर दिसताच त्यांची खरेदी सुरु होते. तर अशाच काही भन्नाट ऑफरची माहिती आम्ही तुम्हाला येथे देणार आहोत.

दिवाळी-दसरा आता अवघ्या काही दिवसांवर आले आहे. त्यामुळे बाजारात खरेदीला उधान आले आहे. ऑनलाईन वेबसाईटवर सुद्धा खरेदीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वेबसाईटवर विविध ऑफर सुद्धा देण्यात येत आहे. फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉनवर तर सध्या ऑफरची दिवाळीच सुरु असल्याचे चित्र आहे. फ्लिपकार्ट बिग बिलीयन डेज (Flipkart big billion days sale) आणि ऍमेझॉन ग्रेट ईंडियन फेस्टीव्हल (Amazon great Indian festival) या दोन ऑफरनी सध्या अनेकांची मने जिंकलेली आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात खरेदी या ऑफर अंतर्गत केली जाते आहे. त्यामुळे मोबाईल, (mobile) स्मार्टवॉच, (smartwatch) स्मार्टटीव्ही (smart TV) किंवा कोणतेही ईलेक्ट्रॉनिक गॅझेट (electronic gadgets) घेण्याच्या विचारात असाल तर हीच सुवर्णसंधी आहे. आम्ही याठिकाणी काही विशेष मोबाईल आणि ईलेट्रॉनिक गॅझेटची माहिती तुम्हाला देणार आहोत. तर चला जाणून घेऊया सविस्तर.

Nothing Phone

आपल्या विविध विशेषतांना घेउन नथींग फोनने बाजारात उडी घेतली आणि अल्पावधीतच अनेकांची मने जिंकून घेतली. एन्ड्रॉईड सिस्टिममध्ये नथींग फोन सध्या सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन आहे. हे लक्षात घेउनच फ्लिपकार्टने आपल्या बिग बिलीयन डेज सेलअंतर्गत या फोनवर ऑफर दिली आहे. सध्या बाजारात या फोनची किंमत 33,999 आहे. मात्र बिग बिलीयन डेज सेलमध्ये या फोनवर 5000 रुपयापर्यंतची सुट देण्यात आलेली आहे. त्यामुळे फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये हा फोन खरेदी केल्यास केवळ 28,999 मध्ये मिळणार आहे. याशिवाय ईतरही स्मार्टफोन्स या सेलअंतर्गत तुम्ही अतिशय किफायतशीर किंमतीत खरेदी करु शकता. यामध्ये रियलमी 9 प्रो+ केवळ 17,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. मोटो G62 14,499 रुपयांना मिळतो आहे. तसेच पोको F4 हा 5G फोन 21,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

आयफोन 13 आणि आयफोन 12 (iPhone 13)

अनेकांना आयफोन वापरण्याची प्रचंड आवड असते. आता ई-कॉमर्स वेबसाईटवर आयफोन सुद्धा किफायतशीर किंमतीत उपलब्ध आहे. नुकताच आयफोन 14 लॉन्च झाला आहे. त्यामुळे आयफोन 13 आणि 12 च्या किंमतीत घट झाली आहे. जर तुमची आयफोन 13 किंवा 12 घेण्याची ईच्छा असेल तर ही वेळ तुम्हाला पुष्कळ फायदा मिळवून देउ शकते. बिल बिलीयन डेज सेलमध्ये आयफोन 13 वर 20,000 रुपय‍ापर्यंतची ऑफर आहे. त्यामुळे 69,990 रुपयांना मिळणारा आयफोन 13 सध्या 49,990 रुपयातच फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे ऍमेझॉन ग्रेट ईंडियन फेस्टीव्हलवर आयफोन 12 अतिशय किफायतशीर किंमतीत उपलब्ध आहे. केवळ 39,999 रुपयात ऍमेझॉनवर ( Amazon) आयफोन 12 मिळतो आहे, यात अधिक कपात होणार असल्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे.

गुगल पिक्सल (Google pixel 6A)

सध्या एन्ड्रॉईड सिस्टीममध्ये गुगल पिक्सल (6A Google pixel 6A) सुद्धा अनेकांची पसंद ठरतो आहे. त्यामुळे फ्लिपकार्टच्या बिग बिलीन डेज सेलमध्ये या फोनवर सुद्धा काही ऑफर देण्यात आलेल्या आहेत. या स्मार्टफोनची मुळ किंमत 43,999 आहे. मात्र सध्या हा फोन फ्लिपकार्टवर केवळ 27,999 रुपयात उपलब्ध आहे. एन्ड्रॉईड स्टॉक आणि सॉफ्टवेअर अपडेट या गुगल पिक्सल स्मार्टफोनच्या विशेषता आहेत. बॅंक ऑफर, प्रीपेड ऑर्डर आणि एक्चेंज बोनस या विशेष सवलती सुद्धा यावर उपलब्ध आहेत.

स्मार्टटीव्ही (smart TV)

ऍमेझॉन वर सध्या स्मार्टटीव्हीची सुद्धा प्रचंड खरेदी केली जाते आहे. ऍमेझॉन ग्रेट ईंडियन फेस्टिव्हलमध्ये स्मार्टटीव्हीवर पुष्कळ ऑफर आहेत. त्यामुळे स्मार्टटीव्हीच्या मुळ किंमतीपेक्षा या ऑफरमध्ये स्मार्टटीव्हीच्या किंमतीत कमालीची घट आहे. 5,499 रुपयांपासून स्मार्ट टीव्हीची सुरुवात या ऑफरवर आहे.

Noise Pulse 2 स्मार्टवॉच 

सध्या तरुणांमध्ये स्मार्टवॉचचे ट्रेन्ड आहे. बहुतांश तरुण स्मार्टवॉच खरेदी करतात. कारण स्मार्टवॉचमध्ये अनेक फिचर आहेत, जे तरुणांना आकर्षित करतात. याशिवाय कोरोनानंतर तर स्मार्टवॉच आणि फिटनेस बॅंडला जास्तच महत्व प्राप्त झाले आहे. तुम्ही जर सध्या स्मार्टवॉच खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही वेळ तुमच्यासाठीच आहे. कारण अतिशय किफायतशीर किंमतीत महागड्या स्मार्टवॉच सध्या फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉनवर उपलब्ध आहे. Noise Pulse 2 Max Advanced या स्मार्टवॉचवर सध्या ऍमेझॉनवर 67% डिस्काउंट मिळते आहे. ज्यामध्ये 5,999 ची वॉच केवळ 1,999 मध्ये मिळत आहे.

हे वाचलं का? Marriage Tips: बायकोच्या सतत चिडचिडेपणामुळे त्रस्त आहात? फक्त हे काम करा बायकोचा चिडचिडेपणा होईल कायमचा बंद..

Post Recruitment 2022: आठवी पास उमेदवारांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

India vs Australia: बुमराहच्या यॉर्करवर स्वतःची दांडी गुल होऊनही अरॉन फिंचने उभा राहून वाजवल्या टाळ्या; पाहा व्हिडिओ..

Menstrual cycle: मासिक पाळी येणं नेमकं केव्हा थांबतं? मासिक पाळीत होणारे बदल जाणून बसेल धक्का..

Sexual ability: या चार पदार्थांचा आहारात करा समावेश; शुक्राणूंची संख्या वाढून लैंगिक क्षमता होईल द्विगुणित..

Aadhar card update: आता आधार कार्डवरचा फोटो बदलणे झाले अधिक सोपे; जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया सोप्या भाषेत..

Second hand two wheeler: ४० हजार किमी पळालेली FZ केवळ 25 हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.