Menstrual cycle: मासिक पाळी येणं नेमकं केव्हा थांबतं? मासिक पाळीत होणारे बदल जाणून बसेल धक्का..

0

Menstrual cycle: मासिक पाळी (monthly period) हा स्त्री जिवनाचा एक भाग आहे. आपल्याकडे मासिक पाळीला घेऊन अनेक गैरसमज आहेत. आजही मासिक पाळीबाबत बोलतांना अनेकजण आखडती भूमिका घेतात. लैंगिकता या विषयावर खुलेपणाने बोलले जात नाही. त्यामुळे कदाचित असं असू शकतं. आजही आपल्या समाजामध्ये मासिक पाळीला अपवित्र समजले जाते. मासिक पाळी दरम्यान स्त्रियांना वेगळे बसवले जाते. घरातल्या सगळ्या कामांतील त्यांचा हस्तक्षेप काढून घेतला जातो. खरंतर मासिक पाळी येणं हे नैसर्गिक असून, मासिक पाळी येणे हे निरोगी स्त्रीचे लक्षण आहे. मग असं असताना मासिक पाळी दरम्यान स्त्रियांना घरातील कोणत्याही कामांना हात का लावू दिला जात नाही. स्त्रियांमध्ये मासिक पाळी येण्याची वैज्ञानिक कारणे काय आहेत? यादरम्यान स्त्रियांच्या शरीरात काय बदल होतात? हे आपल्याला माहिती आहे का? जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

मुलींमध्ये १२ ते १३ वर्षाच्या वया दरम्यान मासिक पाळी येण्यास सुरुवात होते. मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांच्या अवयवातून रक्तस्त्राव होतो. मुलगी योग्य वयात आली की, तिच्या गर्भाशयात स्त्री बीज तयार होत असते. पुरुषाचे शुक्राणू आणि हे स्त्री बीज एकत्र होऊन त्यांचा योग्य संयोग झाल्यास गर्भधारणा होते. मात्र ज्यावेळी स्त्री बीज फलित होत नाही. त्यावेळी रक्तस्त्रावाद्वारे ते शरीराबाहेर पडते. दर महिन्यात एकदा मासिक पाळी येते. आणि मासिक पाळीचा कालावधी हा ३ ते ५ दिवसांचा असतो.

नियमित मासिक पाळी येणे हे स्त्रीच्या निरोगी आरोग्याचे लक्षण आहे. वैज्ञानिक संदर्भानुसार मासिक पाळीस अपवित्र मानण्याचे कुठलेही कारण नाही. मासिक पाळीची सुरुवात होण्याबाबत आपण जाणले. मात्र तरी देखील अजूनही समाजामध्ये या काळात स्त्रियांना घरामध्ये कोणत्याही कामाला हात लावू दिला जात नाही. एवढेच काय तर स्त्रियांना स्वतःच्या हाताने पाणी पिण्याची देखील मुभा न. पाणी पिण्यासाठी इतरांना त्यांना विनवणी करावी लागते  हे खूप दुर्दैवी असून, पुरोगामी म्हणून घेणाऱ्या महाराष्ट्रासाठी ही शरमेची बाब आहे. आता आपण मासिक पाळी येणे नेमके थांबते केव्हा? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या

स्त्रियांमधील मासिक पाळी पूर्णत: बंद होण्यास रजोनिवृत्ती म्हटले जाते. रजोनिवृत्ती प्रत्येक स्त्रीमध्ये वेगवेगळी असू शकते. काही स्त्रीयांमध्ये मासिक पाळी येणे अचानक बंद होते, तर काही स्त्रियांमध्ये हळूहळू बंद होते. सामान्यत: महिलांचे वय ४५ झाल्यानंतर रजोनिवृत्तीस सुरुवात होते. याचाच अर्थ महिलांचे वय ४५ झाल्यास त्यांना मासिक पाळी येणे बंद होते. परंतू काही स्त्रियांमध्ये ऊशिरा देखील मासिक पाळी येणे बंद होऊ शकते.

रजोनिवृत्ती म्हणजे

महिलांमध्ये वयाच्या १३ व्या किंवा १४ व्या वर्षापासून मासिक पाळी येण्यास सुरुवात होते. मासिक पाळीला सुरुवात होणे याचाच अर्थ महिला गर्भधारणेसाठी पात्र आहे. असा समजला जातो. वयाच्या ४५ व्या वर्षानंतर महिलेस गर्भधारणेची शक्यता कमी होऊन जाते. यादरम्यानच मासिक पाळी येणे बंद होते. मासिक पाळी येणे बंद होते, याचा अर्थ आता महिला गर्भधारणेस पात्र नाही. यांस रजोनिवृत्ती म्हटले जाते. रजोनिवृत्ती हा महिलेचा वृद्धत्वाचा एक भाग सुद्धा मानला जातो. यादरम्यान महिलांच्या शरीरामध्ये अनेक शारीरीक आणि मानसिक बदल होत असतात. आता आपण स्त्रियांची मासिक पाळी बंद होताना शरीरामध्ये कोणकोणते बदल होतात हे देखील जाणून घेऊ.

मासिक पाळी बंद होताना होणारे बदल

ज्याप्रमाणे मुलींमध्ये मासिक पाळीस सुरुवात होतांना अनेक बदल जाणवायला लागतात. त्याचप्रमाणे मासिक पाळी बंद होताना महिलांमध्ये बदल होत असतात. अनेक महिलांना मासिक पाळी बंद होत असतांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र काहींना यादरम्यान विशेष त्रास होत नाही. मासिक पाळी बंद होत असतांना महिलांना शारीरीक आणि मानसिक बदलांना सामोरे जावे लागते. शरीरातील विविध अवयव दुखायला लागतात. डोके दुखते, शरीरातील शिथीलता वाढते. व्यवस्थित झोप लागत नाही. निरुत्साह वाढू लागतो. तसेच यादरम्यान वजन वाढण्याची सुद्धा शक्यता असते.

मासिक पाळी बंद होत असतांना महिलांमध्ये हे बदल होत असतात. यासोबतच ऑस्टिओपेरीसीस होण्याचीही भिती असते. महिलांना या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असले तरी याची कसलीही कल्पना पुरुषांना नसते. महिला आपले हे दुःख पुरुषांना सांगू देखील शकत नाहीत. ही देखील खूप शरमेची बाब आहे. वास्तविक पाहता महिलांनी देखील हक्काने आपल्या वैवाहिक जोडीदाराला सांगणे आवश्यक आहे. आणि पुरुषांनी देखील महिलांचे दुःख लक्षात घेऊन त्यांची मानसिकता समजून घेणे आवश्यक आहे.

ऑस्टिओपेरिसिस आणि रजोनिवृत्ती

रजोनिवृत्ती दरम्यान महिलांना ऑस्टिओपेरिसिस होण्याची सुद्धा शक्यता असते. ऑस्टिओपेरिसिसमध्ये शरीरातील हाडे कमकुवत होत जातात. हडांमध्ये प्रचंड वेदना व्हायला लागते. हाडांच्या आतील भागात छिद्रांची संख्या वाढते. त्यामुळे हाडांची अंतर्गत रचना कमकुवत होऊ लागते. रजोनिवृत्ती दरम्यान सुद्धा हाडे दुखू लागतात. बर्‍याचदा सांधेदुखी, कंबरदुखी सारख्या समस्या सुद्धा ऊद्भवतात. महिलांमध्ये अंडाशयाद्वारे ईंस्ट्रोजन हार्मोन बनवले जाते. ईस्ट्रोजन हार्मोन हाडांच्या मजबुतीसाठी फार ऊपयोगाचे ठरते.

त्यामुळे मासिक पाळी बंद झाल्यानंतर, हाडांच्या समस्या ऊद्भवु शकतात. मात्र हे टाळण्यासाठी पोषक घटकांचा समावेश आहारात करणे तुम्हाला फायदेशीर ठरु शकते. अनुवांशिकतेमुळे सुद्धा महिलांमध्ये ऑस्टिओपेरिसिस होऊ शकतो. जर तुमच्या आई-वडिलांना किंवा कुटुंबातील ईतर सदस्यांना हा त्रास असेल, तर तुम्हाला सुद्धा तो होण्याची शक्यता आहे. तसेच काही महिलांना धुम्रपान करण्याची सवय असते. धुम्रपानामुळे हाडे कमकुवत होत जातात. त्यामुळे धुम्रपान करणार्‍या महिलांमध्ये ऑस्टिओपेरिसिस होण्याची शक्यता जास्त असते.

हे देखील वाचा Sexual ability: या चार पदार्थांचा आहारात करा समावेश; शुक्राणूंची संख्या वाढून लैंगिक क्षमता होईल द्विगुणित..

Aadhar card update: आता आधार कार्डवरचा फोटो बदलणे झाले अधिक सोपे; जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया सोप्या भाषेत..

Second hand two wheeler: ४० हजार किमी पळालेली FZ केवळ 25 हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

PM PRANAM Yojana:पीएम प्रणाम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार हे जबरदस्त फायदे; जाणून घ्या या योजने विषयी सविस्तर..

Heart Attack Symptoms: यामुळे हृदयविकाराचा झटका नेहमी सकाळीच येतो; ही लक्षणे जाणवल्यास वेळीच व्हा सावध आणि वाचवा जीव..

Hangover: हा पदार्थ खाल्ल्यास दारूची नशा उतरते एका मिनिटांत; जाणून घ्या सविस्तर..

RBI BRBNMPL Recruitment 2022: या उमेदवारांना रिझर्व बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; अशी केली जाणार निवड..

Railway requirement 2022: या उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये निघाली मेगा भरती; परिक्षेविना अशी केली जाणार निवड..

Marriage Tips: लग्नानंतर महिलांना या गोष्टीची असते सर्वात जास्त भिती; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.