Railway requirement 2022: या उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये निघाली मेगा भरती; परिक्षेविना अशी केली जाणार निवड..

0

Railway requirement 2022: सध्याचा काळ हा सर्वच स्तरातील लोकांसाठी अडचणीचा ठरतो आहे. वाढत्या महागाईने प्रत्येकाच्याच चिंतेत भर पाडली आहे. कोरोनामध्ये अनेकांचे रोजगार गेले. त्यामुळे मोठ्याप्रमाणात युवक रोजगार शोधतायत. कारण या वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी कुटुंबातील कमावत्या हातांची संख्या जास्त असणे गरजेचे आहे. महागाईमुळे रोजच्या नव्या समस्यांचा सामना करता-करता नाकी नऊ येण्याची वेळ आली आहे. एकीकडे बेरोजगारीचा स्तर दिवसेंदिवस वाढत चालला असला तरी दुसरीकडे काही विभागात नोकरीच्या संधी देखील उपलब्ध होत असल्याचं पाहायला मिळतं. आता रेल्वे बोर्डाकडून भरती प्रक्रिया संदर्भात येथे सूचनाचारी करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र असणार उमेदवारांसाठी अर्ज करता येणार आहे.

रेल्वे बोर्डाकडून काढण्यात आलेल्या या भर्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. रोजगाराच्या संधी दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे सरकारी जागांसाठी सुद्धा स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेदरम्यानच्या परिक्षा आणि चाचण्या ऊत्तीर्ण करणे विद्यार्थ्यांसाठी अवघड होत चालले आहे. परंतू रेल्वे बोर्डाने काढलेल्या या भर्तीत कुठल्याही लेखी परिक्षेचे प्रावधान नाही. मात्र रेल्वे बोर्डाने या भर्तीसाठी काही चाचण्यांचा समावेश केला आहे. ज्यामध्ये शारीरक चाचणी सुद्धा बोर्डाकडून घेतली जाणार आहे.

रेल्वे भर्तीसाठी अर्ज करतांना सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेणे, याठिकाणी महत्वाचे आहे. क्रिडा कोट्याद्वारे रेल्वेतील ही पदे भरली जाणार असल्याचे अधिसूचनेत सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे अर्ज करणार्‍या ऊमेदवाराकडे क्रिडा क्षेत्रातील कामगिरीची नोंद असणे आवश्यक आहे. यामध्ये कुस्ती, हॉकी, पॉवर लिफ्टींग, नेमबाजी, जिम्नॅस्टीक, कबड्डी, क्रिकेट, बॅडमिंटन यांसारख्या कुठल्याही क्रिडा प्रकारातील तुम्ही खेळाडू असल्यास हरकत नाही. वरील क्रिडा प्रकारातील खेळाडूंना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. ५ सप्टेंबर २०२२ पासून अर्ज करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झालेली असून ४ ऑक्टोंबर २०२२ अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

पात्रता व निकष

विविध प्रकारच्या २१ पदांसाठी ही भर्ती काढण्यात आलेली. या भर्ती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा ऊमेदवार १२ वी पास व कुठल्याही शाखेचा पदवीधर असावा. अर्ज करणार्‍या ऊमेदवाराचा जन्म १ जानेवारी २०२३ रोजी वय १८ वर्षे २५ वर्षादरम्यान असावे. कुठल्याही क्रिडा प्रकारातील कामगिरीची नोंद ऊमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. SC/ST/माजी सैनिक/ महिला, अल्पसंख्यांक आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील ऊमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क २५० रुपये असणार आहे. तसेच ईतर श्रेणीतील ऊमेदवारांना ५०० रुपये शुल्क यासाठी भरावे लागणार आहे.

अर्ज कसा करावा

रेल्वेच्या या पद भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. सर्वप्रथम जर तुम्ही मोबाईलवरुन अर्ज करत असाल, तर क्रोम हे ऍप ऊघडा, त्यानंतर त्यावरील सर्च ऑप्शन वर जा आणि तिथे https://www.rrcwr.com ही वेबसाईट टाका व सर्च करा. ही रेल्वे बोर्डाची अधिकृत वेबसाईट आहे. यानंतर तुमच्यासमोर फॉर्म येईल, त्या फॉर्ममधील सर्व गोष्टी काळजीपुर्वक भरायच्या आहेत. जर तुम्ही कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर अर्ज करत असाल, तर थेट गुगलवर जाऊन तुम्ही रेल्वेच्या वरील वेबसाईटवर सर्च करु शकता. फॉर्म भरताना नोंदनीकृत आधारकार्ड ऊमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.

रेल्वे बोर्डाने जाहीर केलेली ही भरती क्रिडा कामगिरी, चाचणी आणि शैक्षणिक मुल्यमापन या आधारे घेतली जाते आहे. त्यामुळे खेळाशी संबंधीत सर्व प्रमाणपत्रे व शैक्षणिक कागदपत्रे व्यवस्थित पडताळून बघणे गरजेचे आहे. क्रिडा क्षेत्रात ऊत्तम कामगिरी केलेली असणार्‍या खेळाडूंसाठी नोकरीची ही ऊत्तम संधी आहे. चाचणी मधील निकषांना पूर्ण करणार्‍या ऊमेदवारांना पुढील फेरीत प्रवेश मिळेल. पात्र उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावण्यात येईल. संपूर्ण अधिसुचना तपासण्यासाठी थेट यावर देखील क्लिक करू शकता यावर देखील क्लिक करू शकता

हे देखील वाचा big billion days: फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये स्मार्टफोन खरेदी करा निम्म्या  किंमतीत; जाणून घ्या कोणत्या स्मार्टफोनवर आहे ही ऑफर..

Bollywood News: दोन लग्नं, स्वत:च्याच मुलीसोबतच असे संबंध! दिग्दर्शक महेश भट्ट यांचा थक्क करणारा प्रवास वाचून जाल चक्रावून..

Saffron Milk Side effect: मूल गोरं व्हावं म्हणून गरोदरपणात केशर युक्त दूध पिताय? जाणून घ्या याचे बाळाच्या आरोग्यावर काय गंभीर परिणाम होतात..

Ration Card: रेशन दुकानदार पावती, नियमानुसार धान्य देत नाही? फक्त या नंबरवर कॉल करा लगेच उठेल दुकानदाराचा बाजार..

Urine Colour Chart: लघवीच्या रंगावरुन समजते आजाराचे स्वरूप; जाणून घ्या लघवीच्या विविध रंगांविषयी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.