Bollywood News: दोन लग्नं, स्वत:च्याच मुलीसोबतच असे संबंध! दिग्दर्शक महेश भट्ट यांचा थक्क करणारा प्रवास वाचून जाल चक्रावून..
Bollywood News: महेश भट्ट (Mahesh Bhatt) हे हिंदी सिनेमा सृष्टीतील (Hindi cenema) फार मोठ नाव आहे. अनेक गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केलंय. त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. युवा वर्गास त्यांनी विशेष आकर्षित केलेले आहे. ९० च्या दशकापासून ते आजपर्यंत अनेक गाजलेले चित्रपट महेश भट्ट यांनी प्रेक्षकांच्या भेटीस आणलेत. मात्र हेच महेश भट्ट कायम वादाच्या भोवर्यात अडकलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते कायम चर्चेत असतात. नुकताच महेश भट्ट यांचा ७४ वर्षांचा जिवनप्रवास पूर्ण झालाय. त्यांच्या यशस्वी कारकिर्दीत त्यांनी अनेक चढ-ऊतार बघितले आहेत. त्यामुळे आज आपण त्यांच्या वादळी जिवनप्रवासाबद्दल जाणुन घेणार आहोत.
महेश भट्ट एक यशस्वी दिग्दर्शक असले, तरी ते कायम काही ना काही वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत. अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये करुन ते स्वत: अडचणीत येतात. बॉलीवुडमधील (Bollywood) पूर्वीपासून चालत येणारे अफेयर्स असो कास्टींग काऊच असो किंवा नुकताच चर्चेतला नेपोटीजमचा मुद्दा असो, महेश भट्ट यांच नाव समोर येतच. पण महेश भट्ट सहसा या सगळ्यांवर स्पष्टीकरणं द्यायची टाळतात. मात्र जेव्हा-केव्हा ते कुठली मुलाखत देतात किंवा मिडीयाशी बोलतात, तेव्हासुद्धा एखादा वादळी खुलासा करुन पुन्हा अडचणीत येतात.
महेश भट्ट यांच संपूर्ण जिवनच एकप्रकारे वादळी राहिलेलं आहे. त्यांचे वडिल हिंदू होते, तर त्यांची आई मुस्लिम होती. महेश भट्ट यांनी दोन लग्नं केलीत. याशिवाय बॉलीवुडमधील काही अफेयर्समध्ये सुद्धा त्यांचे नाव समोर येते. असे नेमके काय आहे, या माणसात? की कायम ते चर्चेत असतात. आज आपण तेच जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या लेखातून त्यांच्या संपूर्ण जिवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत.
वडील हिंदू आई मुस्लिम
महेश भट्ट हे एका हिंदू-मुस्लिम जोडप्याच्या पोटी जन्मेलेले मुल आहे. त्यांच्या वडिलांचे नाव नानाभाई भट्ट होते. तर आईचे नाव शिरीन अली मोहम्मद होते. महेश यांचा जन्म २० सप्टेंबर १९४८ रोजी झाला. वडिल हिंदू आणि आई मुस्लिम असल्याने महेश यांच्या आई-वडिलांना त्याकाळी लग्नासाठी सामाजिक मान्यता मिळाली नाही. अनेक अडचणींना सामना त्यांना करावा लागला. त्यामुळे महेशचे लहाणपणापासूनचे पालनपोषण हे त्यांच्या आईनेच केले. महेश यांना कॉलेजमध्ये असतांनाच एका मुलीवर प्रेम झाले होते. लॉरियन ब्राईट असे त्या मुलीचे नाव होते. पुढे दोघांनी लग्न केले व तिचे लॉरियन हे नाव बदलून किरण ठेवण्यात आले. किरणला राहुल (rahul Bhatt) आणि पुजा (pooja Bhatt) असे दोन अपत्य झालीत.
बॉलीवुडमधील अफेयर्स (Bollywood affairs)
बॉलीवुडमध्ये अफेयरच्या (Bollywood affairs) चर्चा ही सामान्य बाब आहे. अनेकदा सोबत काम करत असतांना एकमेकांमध्ये मने गुंततात आणि त्यानंतर त्याचे रुपांतर प्रेमात होते. महेश भट्ट हे त्यांच्या अफेयर्ससाठी (Mahesh Bhatt affairs) चांगलेच चर्चेत राहिलेले आहेत. बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परवीन बाबी सोबत त्यांचे अफेयर असल्याच्या चर्चांना ऊधान आले होते. झी न्युजने दिलेल्या माहितीनुसार महेश भट्ट आणि किरण भट्ट यांच्यातील संबंध दुरावण्याचे कारण परवीन बाबीसोबतचे महेश भट्ट यांचे असलेले संबंध असल्याचे सांगण्यात आले होते. परवीन बाबीला तिच्या शेवटच्या काळात एक मानसिक आजार झाला होता. या आजारामुळे महेश आणि परवीन यांच्यातील संबंध सुद्धा दुरावत गेले.
प्रेमिकेसाठी स्विकारला मुस्लिम धर्म
बॉलीवुडमध्ये काम करत असतांना नवनविन कलाकारांशी महेश यांचा रोजचा संबंध यायचा. यादरम्यानच त्यांची ओळख सोनी राझदान या ब्रिटीश अभिनेत्रीशी झाली. राझदान या हिंदी सिनेसृष्टीत सुद्धा नावलौकिक प्राप्त करत होत्या. यादरम्यानच महेश आणि सोनी राझदान यांना एकमेकांवर प्रेम झाले आणि पुढे दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतू पहिली पत्नी असणार्या किरण यांना घटस्फोट देण्याऐवजीच ते सोनी यांच्याशी लग्न करणार होतेे. ऐवढेच नव्हे तर सोनी यांच्याशी लग्न करण्यासाठी महेश यांनी चक्क मुस्लिम धर्म स्विकारला. महेश यांच्या या कृतीमुळे ते चांगलेच वादात अडकले होते. सोनी राझदान यांचेकडून त्यांना दोन मुली झाल्यात, ज्यापैकी एक प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि दुसरी शाहीन भट्ट आहे.
सर्वात वादग्रस्त प्रकरण
महेश भट्ट यांना त्यांच्या आयुष्यात अनेक वादग्रस्त प्रकरणांना तोंड द्यावे लागेल. त्यांच्या काही कृतींमुळे ते वेळोवेळी चांगलेच अडचणीत आले आहेत. अशांपैकीच एक प्रकरण तर त्यांना चांगलेच भोवले होते. त्यांची मुलगी पुजा भट्ट आणि स्वत: महेश यांनी एका मॅगझीनसाठी फोटोशुट केले होते. या फोटोशुटमध्ये महेश आणि पुजा किस करतांनाचा एक फोटो होता. त्यामुळे महेश यांच्यावर चांगलीच टीका झाली होती. यादरम्यान महेश यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. या प्रकरणातून बाहेर पडण्यास त्यांना पुष्कळ वेळ घ्यावा लागला होता. महेश यांच्या जिवनातील हे सर्वात वादग्रस्त प्रकरण होते.
अ नै ति क मुल
महेश भट्ट यांचे बॉलिवुडमधील अनेक नविन अभिनेत्रींशी सुद्धा नावे जोडली गेली आहेत. जिया खान आणि रिया चक्रवर्ती यांना बॉलीवुडमध्ये प्रसिद्धी मिळवुन देण्यात महेश यांचा वाटा आहे. व त्या दोघींसोबत महेश यांचे संबंध असल्याचे दावे मध्यंतरी करण्यात आले होते. यासोबतच महेश यांनी २०१८ मध्ये हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीमुळे सुद्धा ते चांगलेच चर्चेत आले होते. या मुलाखतीदरम्यान त्यांना त्या फोटोशुटबाबत विचारले असता, त्यांनी फार गंभीर ऊत्तर दिले होते. “मला वडिल काय असतात हे माहिती नाही, त्यामुळे वडिलांच्या भूमिकेबद्दल सुद्धा मला कल्पना नाही. मी एका मुस्लिम स्त्री शिरीन मोहम्मद अली यांच अ नै ति क मुल आहे.” असे महेश यावेळी म्हणाले होते.
मुली सोबतच संबंध
दिग्दर्शक महेश भट यांना अनेक गंभीर आरोपांचा सामना करावा लागला. महेश भट यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी पूजा भट्ट आहे. हे अनेकांना माहिती असेल. मात्र महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्ट सोबत महेश भट्ट यांचे संबंध होते, असे देखील आरोप महेश भट्ट यांच्यावर करण्यात आले. या संदर्भातल्या बातम्या देखील काही माध्यमांनी दिल्याचं पाहायला मिळालं होतं. एवढेंच नाही, तर या दोघांच्या संबंधांमधून आलिया भट्टचा जन्म झाला असल्याचं देखील बोललं जातं. अशा खालच्या पातळीचे आरोप देखील महेश भट्ट यांना सहन करावे लागले आहेत. मात्र या सगळ्यांमधून महेश भट्ट यांनी आपल्या करिअरला एका विशिष्ट शिखरावर पोहोचवलं असल्याचे देखील पाहायला मिळतं.
हे देखील वाचा Parenting Tips: मुलं मोठी झाल्यावर पालकांनी त्यांच्या सोबत झोपणे पडू शकते महागात, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का..
Urine Colour Chart: लघवीच्या रंगावरुन समजते आजाराचे स्वरूप; जाणून घ्या लघवीच्या विविध रंगांविषयी..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.