Urine Colour Chart: लघवीच्या रंगावरुन समजते आजाराचे स्वरूप; जाणून घ्या लघवीच्या विविध रंगांविषयी..

Urine Colour Chart: रोजच्या दैनंदिन जिवनात ताजेतवाने आणि ऊत्साही असणे फार गरजेचे आहे. रोजची सकाळ ऊत्साहाने आणि आनंदाने सुरु झाली तर संपूर्ण दिवस छान जातो. पण ताजेतवाने आणि ऊत्साही असण्यासाठी आपले शरीर तंदरुस्त असणे गरजेचे असते. तसेच आरोग्य निरोगी आणि सुदृढ असल्यास आपला प्रत्येक दिवस चांगला जातो. याऊलट जर शरीर थकल्यासारखे जाणवत असेल,शरीरात काही व्याधी असेल, तर कामाचा कंटाळा यायला लागतो आणि निरुत्साही वाटु लागते. काही केल्या तो निरुत्साह आणि थकवा जात नाही. अशावेळी तुमचे शरीर तुम्हाला काही संकेत देत असते. अशाच एका महत्वाच्या संकेताबद्दल आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही निरोगी आहात की नाही, हे तुम्हाला कळु शकेल. पण नेमकं असं कोणतं संकेतक आहे जे थेट घरच्याघरी अजारांचं करु शकतं, तर त्याबद्दलच आपण जाणुन घेणार आहोत.

लघवीचा रंग ही तशी आपल्यासाठी सामान्य बाब आहे. मात्र लघवीचा रंग तुमच्यासाठी फार मोठं संकेतक ठरु शकते. लघवीच्या रंगावरुन तुमचे शरीर निरोगी आहे की रोगी हे कळु शकते. तसेच विविध आजारांचे निदान करण्यासाठी सुद्धा लघवीचा ऊपयोग होतो. अनेकदा लघवीच्या चाचण्या केल्या जातात आणि त्यावरुन काही निष्कर्ष काढले जातात. आपल्या शरीरातील बहुतांश विषारी पदार्थ लघवीच्या सहाय्याने आपल्या शरीराबाहेर फेकले जातात. त्यामुळे लघवी साफ आणि स्वच्छ होणे गरजचे आहे.

पण लघवी साफ होण्यासोबतच लघवीचा रंग कोणता आहे? हे सुद्धा फार महत्वाचे ठरते. त्यामुळे लघवीच्या रंगाकडे सुद्धा तुमचे लक्ष असायला हवे. कारण लघवीच्या रंगांमध्ये काही बदल जाणवायला लागल्यास तुमच्या शरीरात काही व्याधी असण्याचे ते लक्षण ठरु शकते. बर्‍याचदा काही दुर्धर आजारांअगोदर सुद्धा लघवीच्या रंगात बदल होतो. ज्या आजारांमुळे थेट तुमच्या जिवावर परिणाम होऊ शकतो. लघवीच्या रंगात बदल होणे म्हणजे शरीर तुम्हाला सुचित करत असतं. त्यामुळे आम्ही तुम्हाला याठिकाणी लघवीच्या रंगांबाबत सविस्तर माहिती देणार आहोत. ज्यावरुन तुम्ही तुमच्या शरीराची स्थिती जाणुन घेऊ शकता.

पांढरा शुभ्र

निरोगी माणसाच्या लघवीचा रंग हा ट्रान्सपरंट आणि हलक्या पिवळ्या रंगाचा असतो. परंतू जर तुमच्या लघविचा रंग पांढरा शुभ्र असेल तर मात्र थोडाफार चिंतेचा विषय ठरु शकतो. पांढरा शुभ्र रंग असणे म्हणजे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ पूर्णत: लघवीच्या सहाय्याने शरीराबाहेर निघत नाहीये, असा त्याचा निष्कर्ष निघतो. याशिवाय तुम्ही पाण्याचे अतिसेवन करता. त्यामुळे थोडे पाणी पिण्याचे प्रमाण कमी करावे व बसून शांततेत पाणी प्यावे असे काही प्राथमिक ऊपाय तुम्ही यावर करु शकता.

डार्क पिवळा

बर्‍याचदा आपण आजारी असतांना काही औषधे घेतल्यास आपल्या लघवीचा रंग पिवळा होतो. मात्र अनेकदा असंदेखील होतं की आपल्याला काहीही त्रास जाणवत नसतांनादेखील आपल्या लघवीचा रंग बदलतो आणि डार्क पिवळा होतो. अशावेळी तुम्हाला डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. तुमच्या लघवीचा डार्क पिवळा रंग तुम्हाला डिहायड्रेशन होणार असल्याचे संकेत देत असतो.

गुलाबी/ लाल

एखाद्यावेळेला तुमच्या लघवीचा रंग गुलाबी किंवा लाल असल्याचे तुम्हाला जाणवते. अशावेळी तुम्हाला लघवीचा लाल किंवा गुलाबी रंग बघून धक्का बसु शकतो. परंतू अशावेळी काळजी करण्याऐवजी तुम्ही आहारात काय घेतले होते याचा शांततेत विचार करणे गरजेचे आहे. जर तुम्ही बीट किंवा बीटच्या ज्युसचे वगैरे सेवन केले असेल तर तुमच्या लघवीत हे रंग दिसु शकतात. पण जर कधीच तुमच्या लघवीत थोडेफार फिकट प्रमाणात सुद्धा हे रंग दिसत नसेल तर तुम्ही लघवीत रक्त आहे की नाही तपासुन घेण्याची गरज असते.

ऑरेंज

लघवीचा रंग बर्‍याचदा फिकट ऑरेंज असल्याचे सुद्धा आपल्या लक्षात येते. ऑरेंज रंग सुद्धा तुमच्या शरीरात डिहायड्रेशनची सुरुवात असल्याचे संकेत तुम्हाला देते. तसेच वारंवार लघवीत हलका ऑरेंज रंग जाणवत असल्यास ती तुमच्यासाठी अधिक धोक्याची घंटा ठरु शकते. कारण असे होणे थेट तुमच्या लिव्हरमध्ये समस्या असल्याचे किंवा लिव्हरसंबंधीत आजार होणार असल्याचे संकेत देते. याशिवाय काही विशीष्ट औषधे घेतल्याने सुद्धा लघवीचा रंग ऑरेंज होऊ शकतो.

ढगाळ पांढरा

लघवीचा ढगाळ पांढरा रंग तुमची चिंता वाढवु शकतो. पुरुषांच्या लघवीत असा रंग बघायला मिळत नाही. लघवीचा ढगाळ पांढरा रंग विशेषत: महिलांच्या लघवीतच जाणवतो. महिलांच्या लघवीच्या रंगात हा बदल जाणवत असल्यास महिलांना व्हजायनल ईन्फेक्शन्स असण्याची शक्यता असते. व्हाईट डिस्चार्जमुळे सुद्धा लघवीचा रंग बदलु शकतो. मात्र महिलांमध्ये असे जाणवल्यास डॉक्टरांना जवळ करणे फायदेशीर ठरु शकते.

निळा/ हिरवा 

लघवीचा कधी निळा किवा हिरवा रंग असु शकतो का? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. कारण लघवीत निळा आणि हिरवा रंग याबद्दल आपण कधीही ऐकुण नाही. परंतू लघवीमध्ये निळा आणि हिरवा रंग सुद्धा येऊ शकतो. तुम्ही एखाद्या विशीष्ट औषधीचे सेवन केल्यास लघवीत या रंगाचा बदल तुम्हाला दिसुन येईल. परंतू असा काही बदल जाणवल्यासदेखील डॉक्टरांना त्याबद्दल सुचित करावे.

हे देखील वाचा Steel and Cement Rate: घर बांधण्याचे स्वप्न आता उतरणार सत्यात; स्टील आणि सिमेंटच्या दारात पुन्हा विक्रमी घसरण..

Chanakya niti: नैराश्यात आहात, चिंताग्रस्त आहात? काळजी करू नका; चाणाक्य नितीमधील या 3 गोष्टी बदलून टाकतील तुमचे आयुष्य..

Goat milk benefits: म्हशीचे नाही शेळीचे दूध आहे सर्वोत्तम! शेळीच्या दुधाचे हे 6 जबरदस्त फायदे पाहून तुम्हीही जाल चक्रावून..

Dangers Of Using GB WhatsApp: GB WhatsApp वापरण्याचे फायदे कदाचित तुम्हाला माहितही असतील, पण हे खतरनाक धोके जाणून तुम्हीही कराल त्वरीत बंद..

RBI Rule On Torn Note: जळालेल्या फाटलेल्या नोटा आता कुठल्याही बँकेत मिळणार बदलून; जाणून घ्या RBI चा नवा नियम..

Social media side effects: सोशल मीडियाचा वापरामुळे होतायत हे गंभीर शारीरिक आणि मानसिक आजार..

Helath: हे 5 पदार्थ जे पुन्हा गरम करुन खायचे नाहीत? नाहीतर होतील हे गंभीर परिणाम

Health tips: उभा राहून पाणी पिण्याचे दुष्परिणाम वाचून बसेल धक्का; जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत..

Marriage Tips: लग्नानंतर महिलांना या गोष्टीची असते सर्वात जास्त भिती; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

Marriage Tips: या ६ पदार्थांचा आहारात करा समाविष्ट; लैंगिक क्षमता वाढून मिळेल भरपूर आनंद..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.