Goat milk benefits: म्हशीचे नाही शेळीचे दूध आहे सर्वोत्तम! शेळीच्या दुधाचे हे 6 जबरदस्त फायदे पाहून तुम्हीही जाल चक्रावून..

0

Goat milk benefits: दुध (milk) आरोग्यासाठी (Health) खुप फायदेशीर असते. हाडे (bones) मजबुत करण्यात दुध मोलाचे योगदान देते. त्यामुळे लहाण मुलांना (child) तर त्यांची आई (Child mother) नियमित दुध देते. गाय आणि म्हशीच्या cow and buffalo) दुधाचा वापर आपल्याकडे सगळ्यात जास्त होतो. अगदी लहान मुलांना देण्यापासून ते चहा, (tea) कॉफीसाठी (coffee) सुद्धा आपण गाय आणि म्हशीचेच दुध वापरतो. पण आज आम्ही तुम्हाला एक आगळी वेगळी माहिती याठिकाणी देणार आहोत. गाय आणि म्हशीच्या दुधाऐवजी बकरीचे दुध अधिक लाभकारी आहे. बकरीच्या दुधात अनेक पौष्टिक गुण असतात. जे आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी ऊपयोगाचे आहेत. (Goat milk has many nutritional properties)

शहरी भागात बकरीच्या दुधाचा फार कमी वापर होतो. पण जर तुम्ही थोडे लहाण असताना तुम्हाला आठवत असेल तर, तुम्हाला प्रचंड ताप आला असेल. तापामुळे अन्न शरीरात जातच नसेल, तर त्याला जुनी माणसं शेळीचे दुध पाजायची. शेळीच्या दुधाने त्याचा ताप बर्‍यापैकी कमी व्हायचा. त्यानंतर तो अन्नपदार्थ खाण्यास सक्षम व्हायचा. हे तुमच्यापैकी अनेकांना माहीत असेल. ग्रामीण भागात आजही शेळीच्या दुधाचा वापर केला जातो. मात्र अलीकडच्या काळात ग्रामीण भागातही याचे प्रमाण कमी होत चालले आहे. मात्र जुनी-जानती लोकं आजही शेळीच्या दुधाला महत्व देतात. इतर दूधापेक्षा शेळीच्या दुधात जास्त कॅल्शियमचे प्रमाण असते. ज्यामुळे हाडे मजबुत होतात आणि हाडे दुखण्यासंबंधीचे आजार देखील नाहीसे होतात. म्हशीच्या दुधापेक्षा शेळीचे दूध किती गुणकारी आहे, आणि याचे काय काय फायदे आहेत? याविषयी जाणून घेऊया सविस्तर.

हृदय निरोगी राहते

रोजच्या धावपळीच्या जिवनामध्ये शरीराकडे लक्ष देणे प्रत्येकाला शक्य होत नाही. धावपळीच्या या जमान्यात कामाचा वाढता व्याप, त्यामुळे येणारा तणाव, निराशा आणि त्यातुनच वाढती व्यसनाधीनता यामुळे शरीरातील अवयवांचे जिवनमान दिवसेंदिवस कमी होत जाते आहे. आजकाल तरुण वयातच हृदयविकाराचे आजार होत असल्याचे आपल्या आजुबाजुला बघायला मिळते. मात्र बकरीचे दुध यावर प्रभावी ऊपाय आहे. शेळीचे दुध पिल्याने हृदय निरोगी व सशक्त राहते. शेळीच्या दुधाचे नियमीत सेवन केल्यास कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. ज्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्याची शक्यता कमी होते. तसेच हृदयाचे कार्य सुद्धा सुरळीत चालते.

पचनक्रियेसाठी ऊपयुक्त

आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे की, शरीरातील सर्व विकारांचे केंद्रबिंदु पोट आहे. त्यामुळे पोट साफ असल्यास कुठलाच आजार तुमच्यावर दीर्घकाळ प्रभावी राहु शकत नाही. पोट साफ ठेवण्यासाठी पचनशक्ती मजबुत असणे जरुरी आहे. फास्ट फुड आणि अवेळी खाण्यामुळे पचनशक्ती प्रभावित होते. व समस्या निर्माण करते. मात्र शेळीचे दुध पचनशक्ती सुधारण्यावर ऊपयुक्त आहे. शेळीच्या दुधाचे सेवन केल्यास पचनक्रिया सुरळीत काम करु लागते. व पचनासंबंधित कुठलाही विकार होण्याची शक्यता कमी करुन टाकते.

वाढत्या वजनावर नियंत्रण

वजन वाढण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. शरीरावर अनावश्यक चरबी वाढणे म्हणजे आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे. याशिवाय वजन वाढल्यास शरीराची चंचलता आणि चपळाई कमी होऊन जाते. वेळोवेळी दम लागल्यासारखे जाणवत राहते. त्यामुळेच अनेकजण वजन वाढु नये यासाठी पुष्कळ प्रयत्न करत असतात. जिम, व्यायाम, डायट हे सगळं करुनही वजन पाहिजे त्या प्रमाणात कमी होत नाही. अशावेळी तज्ज्ञांच्या मते बकरीचे दुध फायदेशीर ठरु शकते. बकरीच्या दुधामध्ये फॅटी ऍसीडचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे वाढत्या वजनावर प्रतिबंध घालण्यात ते ऊपयोगी ठरते. तसेच वजन वाढलेले असल्यास डायटमध्ये बकरीच्या दुधाचा समावेश करण्यास हरकत नाही. अनेक पोषक घटके बकरीच्या दुधात असतात, ज्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते.

हाडे मजबुत करण्यात ऊपयोगी

वाढत्या वयानुसार हाडांमध्ये झीज होते. त्यामुळे सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी सारख्या आजारांनी त्रस्त लोकं आपण आपल्या आजाुबाजुला बघतो. हाडांतील कॅल्शियमची मात्रा कमी झाली की असे आजार ऊद्भवण्यास सुरुवात होतात. मात्र बकरीच्या दुधाने या आजारांची तीव्रता कमी करता येऊ शकते. बकरीचे दुध कॅल्शियमचे स्त्रोत आहे. त्यामुळे बकरीच्या दुधाचे सेवन केल्यास शरीरातील कॅल्शियमची मात्रा भरुन निघते. परिणामी या दुखण्यांचा त्रास कमी होतो. हाडासंबंधीत जास्तच त्रास असल्यास बकरीच्या दुधाबरोबर ५ ग्रॅम हळद घेतल्यास ते अधिक प्रभावी ठरु शकते.

केस आणि त्वचेसाठी फायदेशीर

बकरीच्या दुधात पोषक तत्वे आणि विविध जिवनसत्वांचा समावेश असतो. त्यामुळे बकरीचे दुध शरीरासाठी फार ऊपयुक्त आहे. सौदर्य वाढवण्यात सुद्धा बकरीचे दुध योगदान देते. बकरीच्या दुधात पीएच पातळी चांगली असते. त्यामुळे ते चेहर्‍यावर लावणे फायदेशीर आहे. बकरीचे दुध चेहर्‍यावर लावल्यास चेहर्‍यावरील डाग नाहीसे होतात. याशिवाय वाढत्या वयानुसार चेहर्‍यावर सुरकुत्या पडत असल्यास बकरीच्या दुधाने सुरकुत्या सुद्धा नाहीशा होतात. त्यामुळे चेहरा कायम ऊजळलेला आणि ताजातवाना दिसतो. बकरीच्या दुधामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमीन बी २ असते. ज्यामुळे केसातील कोंडा नाहीसा होतो आणि केसाची चमक वाढते. केसगळती सुद्धा थांबते. त्यामुळे स्त्रियांसाठी बकरीचे दुध विशेष लाभकारी ठरते.

लैंगिक क्षमता वाढवते

बकरीच्या दुधाचा वरील फायद्यांप्रमाणेच पुरुषांसाठी एक फार महत्वाचा फायदा आहे. बकरीच्या दुधाने लैंगिक क्षमता झपाट्याने वाढते. ज्यामुळे तुम्ही तुमच्या लैंगिक जिवनाचा पुरेपुर आनंद घेऊ शकता. अनेकांमध्ये लैंगिक शक्ती संबंधीत काही आजार असतात. अनेकांची शारीरीक स्थिती कमजोर असते. त्यामुळे ते आपल्या जोडीदारास समाधानी करु शकत नाही. मात्र बकरीचे दुध सर्वप्रकारच्या लैंगिक आजारांवर प्रभावी आहे. काही तज्ज्ञांच्या मते बकरीच्या दुधात काही घरगुती पदार्थ टाकुन त्याचे सेवन केल्यास ते अधिक फायदेशीर ठरते. बकरीच्या दुधात ४ ते ५ मनुका, केशर आणि केशर नसेल तर ५ ग्रॅम हळद घालुन रोज झोपण्यअगोदर एक कपभर घ्यावे. अशाप्रकारे बकरीच्या दुधाचे रोज सेवन केल्यास तुमच्यातील सर्व लैंगिक आजार नाहीसे होऊन तुम्ही तुमच्या वैवाहिक जिवनाचा सुद्धा पुरपेुर आनंद घेऊ शकता.

हे देखील वाचा GB WhatsApp वापरण्याचे फायदे कदाचित तुम्हाला माहितही असतील, पण हे खतरनाक धोके जाणून तुम्हीही कराल त्वरीत बंद..

RBI Rule On Torn Note: जळालेल्या फाटलेल्या नोटा आता कुठल्याही बँकेत मिळणार बदलून; जाणून घ्या RBI चा नवा नियम..

Social media side effects: सोशल मीडियाचा वापरामुळे होतायत हे गंभीर शारीरिक आणि मानसिक आजार..

limbu Pani side effects: गरम पाण्यात लिंबू टाकून पीत असाल त्वरित थांबवा; अन्यथा आरोग्यावर होतील हे गंभीर परिणाम..

Health tips: उभा राहून पाणी पिण्याचे दुष्परिणाम वाचून बसेल धक्का; जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत..

Yoga Asanas For Married Couple: वैवाहिक जिवनातला आनंद द्विगुणित करतात ही योगासने..

Marriage Tips: लग्नानंतर महिलांना या गोष्टीची असते सर्वात जास्त भिती; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

Airtel vs Jio: एअरटेल की जिओ कोणतं सिम आहे बेस्ट? दोन्हीं कंपनींचे हे चार रिचार्ज प्लान पाहा, आणि तुम्हीच ठरवा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.