Social media side effects: सोशल मीडियाचा वापरामुळे होतायत हे गंभीर शारीरिक आणि मानसिक आजार..

Social media side effects: माणसाच्या मुलभुत गरजांबद्दल बोलतांना अन्न, वस्त्र, निवारा याबद्दल लहाणपणी आपल्याला सांगितले जायचे. मात्र आता त्यात आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. मोबाईल हा माणसाला आता अन्न, वस्त्र आणि निवार्‍याप्रमाणेच महत्वाचा झाला आहे. एकदा महत्वाची कागदपत्रे विसरलीत, तरी चालेल. पण मोबाईल आणि त्याच चार्जर विसरता कामा नये. मोबाईल आणि त्यावरील सोशल मिडीया यांनी आपलं जिवनच व्यापून टाकलयं. तरुण वर्ग याच्या प्रचंड आहारी गेलाय. मात्र फक्त तरुण वर्गालाच दोष ठेऊन काय ऊपयोग? मुलांचे पालक सुद्धा याच्या आहारी गेले आहेत. तासनतास सारखं त्या मोबाईलमध्ये डोकं घालुन बसतात. आणि आलेले मॅसेज आपल्या बोटांनी ईकडून तिकडे फिरवत असतात. मात्र याचा फार विपरीत परिणाम समाजावर होतोय. सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे याचे परिणाम समाजाला तर भोगावे लागतात तर मात्र याचे गंभीर परिणाम तुमच्या मानसिकतेवर देखील होतायत, जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

अगदी २ वर्षांच्या चिमुकल्या पासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच या मोबाईलने वेड लावले आहे. मुलगा थोडासा रडला की त्याच्या हातात मोबाईल देऊन त्याला शांत केलं जातं. पूर्वी चारचौघं एकत्र जमले की इकडच्या तिकडच्या छान गोष्टी सांगितल्या जायच्या. मात्र आता अनेकजण एकत्र आले तरी देखील सगळ्यांच्या माना खाली आपापल्या मोबाईलमध्ये असतात. सगळ्यांनाच सोशल मिडीयाचे व्यसन लागले आहे. सोशल मिडीयावर सातत्याने स्वत:च्या वेगवेगळ्या गोष्टींचे प्रदर्शन मांडण्याची सवय झालीय. त्यामुळे खरा आनंद घेणेच लोक विसरु लागलीयेत. स्टेटसला व्ह्युज किती आहेत? लाईक्स किती आलेत? कमेंट कोणा-कोणाच्या आल्यात? आणि फॉलोअर्स किती वाढले? अशा आभासी जगात अनेक जण स्वतःला हरवून बसलाय.

सोशल मिडीयाच्या आहारी गेल्यामुळे माणासांमध्ये प्रचंड बदल होतायत. हे बदल जरी लवकर आपल्या लक्षात येत नसले, तरी त्यांची प्रक्रिया सुरु असते. सतत मोबाईलचा वापर करत असल्यामुळे तुम्हाला ईतर शारिरीक त्रास तर होणारच शिवाय तुमच्या मानसिक आरोग्यावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होणार. सुरुवातीच्या काळात आपल्यामध्ये होणारे बदल लवकर लक्षात येत नाही. मात्र हळूहळू ते तुमच्या वैचारिकतेला मारक ठरतात. बर्‍याचदा मानसिक आजार होण्याची सुद्धा शक्यता असते. किंवा नैराश्य तरी येते. त्यामुळे जर तुम्ही सातत्याने सोशल मिडिया वापरत असाल, तर आम्ही तुम्हाला काही लक्षणे याठिकाणी सांगणार आहोत. ही लक्षणे तुमच्यात जाणवली तर लगेच सावधान व्हा आणि सोशल मिडीयाला स्वत:पासून लांब करा.

निद्रानाश

सतत मोबाईल किंवा सोशल मिडिया वापरणार्‍यांना निद्रानाशाचा सामना करावा लागु शकतो. सोशल मिडियाच्या आहारी गेलेल्यांना रात्री पटकन झोप येत नाही. त्यामुळे ते सोशल मिडियावर काही अपडेट्स बघत राहतात, नाहीतर गेम्स तरि खेळतात. अनेकांना तर रात्री मोबाईल बघितल्याशिवाय झोपच येत नाही. मोबाईल बघता-बघता त्यांना झोप लागते. हे निद्रानाशाचे लक्षण आहे. जे कालंतराने गंभिर रुप धारण करु शकते.

संयम कमी झाला

सोशल मिडीयावर आपल्याला सर्व गोष्टी पटकन अगदी क्षणार्धात मिळतात. आवडलं नाही तर दोन बोट सरकवली की लगेच आपल्यासाठी दुसरं काहीतरी तयारच असतं. सोशल मिडियाच्या आभासी जगाप्रमाणेच आपण वास्तवात सुद्धा विचार करायला लागलो आहेत. त्यामुळे माणसांमधला संयमच कमी झालेला बघायला मिळते. कुठलीही गोष्ट क्षणार्धात मिळवण्याच्या नादात जिवघेण्या स्पर्धेत स्वत:ला ढकलले जाते आहे. सोशल मिडीयाच्या आहारी, गेलेल्यांमध्ये संयमाचा अभाव आहे.

लैंगिक गरजा भागवण्यात सुद्धा सोशल मिडिया

सोशल मिडीयाच्या सहाय्याने चॅटींग करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र आता सोशल मीडिया चॅटींग पुरताच मर्यादित न राहता, सोशल मिडीयाच्या सहाय्यानेच ईतर गोष्टी केल्या जातात. सोशल मिडीयाचा आधार घेऊन लैंगिक गरजा भागवल्या जातात. जोडीदार आपल्यापासून लांब राहत असल्यास याचा सर्वाधिक ऊपयोग होतो. मात्र यामुळे लैंगिक जिवनातला आनंद मिळवण्या ऐवजी ताणच जास्त वाढतो. सोशल मिडीयामुळे जोडप्यांमधील लैंगिक वर्तणुकीतच बदल होत आहेत.

गैरसमजाचे प्रमाण वाढले

सोशल मिडीयामुळे मौखिक संवादच कमी झाला आहे. त्यामुळे एखाद्याला बोलायचे असते दुसरे आणि त्याचा विपर्यास होऊन अर्थ निघतो तिसराच. त्यामुळे गैरसमजाचे प्रमाण वाढत आहे. आपल्या बाबतीतही असे होते. आपल्या नातेवाईकांमध्ये दिवसेंदिवस गैरसमज वाढतायत. स्पर्धा वाढते आहे. एकमेकांना एकमेकांपेक्षा मोठं दाखवण्याच्या नादात आपण सोशल मिडीयावर प्रचंड खोटं बोलतो. जे वास्तवात नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मत्सर आणि द्वेषभावना सुद्धा वाढते आहे. एकमेकांना समजुन घेण्याऐवजी आता गैरसमजाचे प्रमाण वाढत चालले आहे.

वैचारिकता मरते आहे

पूर्वी कुठलीही गोष्ट करतांना भान जागृत ठेऊन केली जायची. मात्र सोशल मिडीयाने थेट तुमच्या विचार प्रकरियेवर कब्जा करायला सुरुवात केलीय. त्यामुळे विचारक्षमता कमकुवत होते. कुठल्याही गोष्टींवर आंधळेपणाने विश्वास ठेवला जातोय. परिणामी त्यातुन होणार्‍या धोक्यांना सुद्धा सामोरं जावं लागतयं. मुल काय आणि पालक काय सगळेच सोशल मिडीयाच्या आहारी असल्यामुळे संस्कार नावाची गोष्ट दिवसेंदिवस कमी होतेय. त्यामुळे मान-सन्मान हरवत चालला आहे. ऐकीव माहितीवर कुठलीही पडताळणी न करता विश्वास ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे.

 हे देखील वाचा

limbu Pani side effects: गरम पाण्यात लिंबू टाकून पीत असाल त्वरित थांबवा; अन्यथा आरोग्यावर होतील हे गंभीर परिणाम..

Helath: हे 5 पदार्थ जे पुन्हा गरम करुन खायचे नाहीत? नाहीतर होतील हे गंभीर परिणाम

Astrology 2022: तब्बल ५९ वर्षांनी जुळुन आलाय हा योग; या राशींना होणार हे जबरदस्त फायदे..

clean shave benefit: आठवड्यातून किती वेळा दाढी केली पाहिजे; जाणून घ्या clean shave करण्याचे फायदे..

बाळूमामांच्या मेढ्यांनी १० गुंठे गवार खाल्ली, आज त्याच रानात तब्बल दोन लाखाचे उत्पन्न मिळाले; काय म्हणतोय शेतकरी ऐका..

balance between wife and mother: पत्नी आणि आईचे भांडण होत असेल तर करा हे काम; आयुष्यात पुन्हा कधीच होणार नाही भांडण..

Love addict Side effect: प्रेम रोगाचे दुष्परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन; जाणून घ्या याची लक्षणं आणि उपाय..

Women’s views on sex: लैंगिक संबंधाचा आनंद घेताना महिलांचं देखील असतं हे मत; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Who has Seen My Facebook Profile: या सोप्या पद्धतीने जाणून घ्या तुमची Facebook profile कोण-कोण पाहतंय..

Chanakya Niti: पुरुषांच्या बर्बादीचं कारण ठरतात अशा गुणांच्या स्त्रिया; काय सांगते चाणाक्य निती? अशा ओळखता येतात त्या स्त्रिया..

Apple Side Effects: सफरचंद खाण्याची योग्य वेळ माहिती आहे? या वेळेत सफरचंद खाल्ल्यास येऊ शकतो हृदयविकाराचा झटका..

weight loss without exercise: या 6 भाज्यांचा आहारात करा समावेश; व्यायाम न करता महिन्यांत उतरेल तब्बल इतके किलो वजन..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.