Who has Seen My Facebook Profile: ‘या’ सोप्या पद्धतीने जाणून घ्या तुमची Facebook profile कोण-कोण पाहतंय..

0

Who has Seen My Facebook Profile: फेसबुक (Facebook) हे सध्याचे सर्वात लोकप्रिय माध्यम आहे. आपल्या ओळखींच्या लोकांशी आपण फेसबुकवर कनेक्ट होतो. त्यांच्याशी चॅट करतो. परंतू अनेकदा आपल्याला अनोळखी व्यक्तीची रीक्वेस्ट (request) येते. आंबट शौकीनांना अनोळखी महिलेच्या किंवा मुलीची प्रोफाईलवरुन रिक्वेस्ट येते. मोहापायी आणि ऊत्सुकतेपोटी आपण ती रिक्वेस्ट स्विकारतो. आणि त्यानंतर चॅटींग (chating) सुरु होते. यानंतर तुम्ही कधी शिकार होता याची भनक सुद्धा तुम्हाला ते लोकं लागू देत नाहीत. हे सर्व करण्याअगोदर ते तुमची फेसबुक प्रोफाईल बघतात. ज्यावरुन तुम्ही त्यांचे शिकार होऊ शकता का? याचा अंदाज घेतात. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? अनोळखी व्यक्तीने तुमची फेसबुक प्रोफाईल (Facebook profile) बघितल्यास तुम्हाला ते कळु शकतं.  जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल, तर याठिकाणी आम्ही त्याबद्दलच सांगणार आहोत.

फेसबुक हे असे माध्यम आहे, ज्याचा प्रत्येक जण वापर करतो. अलीकडच्या काळात तर चिमुकल्यापासून जेष्ठापर्यंत सगळी मंडळी फेसबुकवर अनेक तास सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. काहींना तर उगीचच कोणालाही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची सवय असते. तर काहींना उगीचच इतरांची फेसबुक प्रोफाईल पाहण्याचा छंद असतो. इतरांचे फोटो पाहण्यासाठी दुसऱ्यांच्या प्रोफाईलवर जाऊन प्रोफाइल चेक करतात. मात्र समाजात असेही काही नमुने आहेत, जे इतरांच्या प्रोफाईलवर जावून त्यांना आपली शिकार बनवतात. आणि मग पैशाची मागणी करतात. तुम्ही जर तुमचे फेसबुक प्रोफाईल ‘सीन बाय एव्हरीवन’ केली असेल, तर कोणालाही तुमची प्रोफाइल पाहता येऊ शकते.

इतरांच्या फेसबुक प्रोफाईलवर जाऊन व्यक्तीची माहिती किंवा काही महत्त्वाचे लेख वाचणे, यात काही गैर देखील नाही. मात्र अनेकदा अनेकांच्या फेसबुक प्रोफाईल वरून तो आपली शिकार होऊ शकतो की नाही? याचा अंदाज लावून अनेकजण त्याला आपल्या जाळ्यात ओढत असतात. जर तुम्हाला हे अनुभव येत असतील, किंवा आले असतील, तर तुम्ही दिवसभरात तुमची फेसबुक प्रोफाईल कोणी कोणी पहिली आहे? हे आता तुम्ही सहज पाहू शकता. तुमची फेसबुक प्रोफाईल कोण कोण पाहत आहे? पाहण्यासाठी तुम्हाला काही स्ट्रिकची मदत घ्यावी लागणार. आम्ही याविषयी देखील सविस्तर माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर. तत्पूर्वी आपण फेसबुकच्या माध्यमातून कशी लूट होते, हे देखील जाणून घेऊ.

एका संशोधनानुसार भारतात दररोज जवळपास ५ हजारांपेक्षा जास्त सायबर धोकाधडी होत असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये थेट पैश्यांची लुट केली जाते. तर बर्‍याचदा तुमच्या डोक्यात काही खुळ भरुन तुम्हाला ब्लॅकमेल सुद्धा केले जातं. अशा प्रकारच्या धोकाधडीपासून वाचण्यासाठी सायबर पोलिसांच्या वतीने नेहमी काही ना काही सुचना प्रसारीत करण्यात येतात. यासोबतच समाजमाध्यमे वापरतांना आपण कायम जागृत राहावं, त्याचबरोबर स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे? याची माहिती देणार्‍या कार्यशाळा सुद्धा आयोजित करण्यात येत असतात.

सध्या सायबर चोरट्यांनी फेसबुकला निशाना बनवलेले आहे. एखाद्याच्या फेसबुक प्रोफाईलवरुन त्याच्या वैयक्तिक जिवनाची माहिती घेतली जाते. त्यानंतर नेमकं कुठल्या जाळ्यात हा व्यक्ती अडकु शकतो, याचा अंदाज घेऊन पद्धतशीरपणे त्याला आपला जाळ्यात ओढले जाते. त्यांना काही अश्लिम सामग्री दाखवुन व त्या सामग्रीशी थेट त्यांचा संबंध दाखवुन त्यास ब्लॅकमेल करण्यात येते. व पैश्यांची मागनी केली जाते. फेसबुकचे अकाउंट हॅक करुन त्याच्या ईतर मित्रांना पैश्यांची मागनी व अश्लिल सामग्री पाठवली जाते. त्यामुळे जर तुम्ही फेसबुकवर सक्रीय असाल, तर तुम्हालाच काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. यासाठी तुम्ही आठवड्यातून किमान एकदा तुमची फेसबूक प्रोफाइल कोणी पहिली आहे? हे तपासणे आवश्यक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल फेसबुक कृपा होईल कोणी पाहिले आहे कसा तपासायचं तर हे देखील मी तुम्हाला सांगणार आहोत.

अशी तपासा तुमची फेसबुक प्रोफाईल कोणी पाहिली आहे..

तुमची फेसबुक प्रोफाईल कोण बघत आहे? हे जाणुन घेण्यासाठी तुम्हाला लॅपटॉप किंवा कॉम्य्पुटरची गरज पडणार आहे. फेसबुक प्रोफाईल बघणार्‍यांबद्दल जाणुन घेण्याच्या स्टेप्स मोबाईलवर करता येण्यासारख्या नाहीत. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपची व्यवस्था केली पाहिजे. तुम्हाला जर सायबर चोरट्यांपासून स्वत:ला वाचवायचे असेल, तुमचे नुकसान टाळायचे असेल, किंवा तुमची फेसबुक प्रोफाईल तुमचा एक्स बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड पाहत आहे का? हे जाणून घ्याचे असेल तर, तुम्ही लगेच कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपची व्यवस्था करा. कारण तुम्हाला स्मार्टफोनवर ते बघता येणार नाही.

सर्वप्रथम तुमचा डेस्कटॉप किंवा लॅपटॉप ऊघडा आणि त्यामध्ये ब्राऊजरवर जा. ब्राऊजरवर तुमचे फेसबुक लॉग ईन करा. फेसबुक लॉग ईन झाल्यानंतर, तुम्हाला तुमच्या प्रोफाईलवर जायचे आहे. वर ऊजव्या कोपर्‍यातील बटनावर क्लिक करयचे आहे. त्या बटणारवर क्लिक करताच तुमच्यासमोर पुष्कळ पर्याय येतील. त्यापैकी तुम्हाला “पेज सोर्सवर पाहा” या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

पेज सोर्सवर जाण्यासाठी तुम्ही CTRL + U कमांड देखील वापरु शकता. यानंतर CTRL + F कमांड द्या. आणि यानंतर BUDDY_ID शोधा. इथपर्यंत व्यवस्थित प्रोसेस झाल्यानंतर, तुम्हाला तेथे १५ अंक दिसतील. ते १५ अंक कॉपी करून https://www.facebook.com/15 मध्ये पेस्ट करा. यानंतर तुम्हाला एक यादी दिसेल. ज्यामध्ये तुमची फेसबुक प्रोफाईल कोणी कोणी चेक केली आहे त्या सगळ्यांची नावे पाहायला मिळतील.

हे देखील वाचा Leopard and python: अजगराची शिकार कराय गेलेल्या बिबट्यालाच गमवावा लागला आपला जीव; थरारक व्हिडीओ पाहून फुटेल घाम..

Sarkari Yojana: PM kisan योजनेच्या शेतकऱ्यांना शिंदे सरकारकडून मिळणार दिवाळी गिफ्ट; जाणून घ्या या योजनेविषयी सविस्तर..

Chanakya Niti: पुरुषांच्या बर्बादीचं कारण ठरतात अशा गुणांच्या स्त्रिया; काय सांगते चाणाक्य निती? अशा ओळखता येतात त्या स्त्रिया..

Apple Side Effects: सफरचंद खाण्याची योग्य वेळ माहिती आहे? या वेळेत सफरचंद खाल्ल्यास येऊ शकतो हृदयविकाराचा झटका..

wheat chapati side effects: गव्हाची चपाती खात असाल तर त्वरीत करा बंद; चपाती खाण्याचे हे आहेत दुष्परिणाम..

Using Phone in Toilet: शौचालयामध्ये स्मार्टफोन वापरण्याचे दुष्परिणाम जाणून तुम्ही देखील बंद कराल ही जीवघेणी सवय..

Marriage Tips: लग्नानंतर महिलांना या गोष्टीची असते सर्वात जास्त भिती; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

Marriage Tips: या ६ पदार्थांचा आहारात करा समाविष्ट; लैंगिक क्षमता वाढून मिळेल भरपूर आनंद..

Marriage Tips: या पाच गोष्टींचे पालन करा, अन्यथा वैवाहिक जीवनाचा होईल सत्यानाश..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.