Sarkari Yojana: PM kisan योजनेच्या शेतकऱ्यांना शिंदे सरकारकडून मिळणार दिवाळी गिफ्ट; जाणून घ्या या योजनेविषयी सविस्तर..

0

Sarkari Yojana: महाराष्ट्रात प्रचंड अशा राजकीय नाट्यानंतर (Maharashtra politic crisis) अखेर शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnavis sarkar) सत्तेत आले. महाविकास आघाडी सरकारमध्ये (mahavikas agadi) महत्वाचे मंत्रीपद (mantri) असून देखील एकनाथ शिंदेंनी बंडाचा झेंडा ऊगारला. शिवसेनच्या (shivsena) अंतर्गत मतभेदाचा भडका ऊडुन अर्ध्यापेक्षा अधिक शिवसेनेचे लोकप्रतिनिधींनी यांस पाठिंबा दिला. त्यानंतर भाजपाने शिंदे गटास समर्थन देत महाराष्ट्रात मोठ्ठा राजकीय भुकंप घडवुन आणला. ऊद्धव ठाकरेंना (uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागली आणि नवनिर्वाचित मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (cm Eknath Shinde) त्या खुर्चीवर विराजमान झाले. हा सर्व घटनाक्रम सगळ्यांनाचा माहिती आहे. या सरकार विषयी महाराष्ट्रातील जनतेत मनात मोठा रोष असल्याचे पाहायला मिळते. साहजिकच यामुळे लोकांची मने जिंंकण्याचा प्रयत्न या सरकारकडून होताना दिसतोय.

महाराष्ट्रातल्या विविध भागातील सर्वसामान्य माणसांची कामे सुद्धा करण्याचा प्रयत्न शिंदे सरकारकडून होतो आहे. मात्र यादरम्यानच महाराष्ट्रात सर्वात बिकट परिस्थितीतून जाणार्‍या शेतकरी वर्गास दुर्लक्षित करुन जमणारे नव्हते. त्यामुळेच शेतकरी हिताचे काही निर्णय घेण्याचे शिंदे सरकारकारने ठरवले. त्यामुळेच शेतकरी हिताची नवोदित शिंदे सरकारकडून आणण्यात येणार आहे. मंत्रीमंडळातील सर्वच मंत्र्यांनी या निर्णयास पाठिंबा दिला असून, शेतकरी हिताचा निर्णय असल्याचे सांगत या निर्णयाचे स्वागतही केले. केंद्र सरकार सुद्धा शेतकर्‍यांच्या हितासाठी विविध योजना कार्यान्वयीत करत असते. त्यापैकी २०१८ मध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना लॉन्च करण्यात आली होती. या योजनेच्या धर्तीवरच शिंदे सरकारची ही नविन योजना असणार आहे.

मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना असे या योजनेचे नाव आहे. (Mukhymantri Kisan Samman Nidhi Yojana) सध्या वातावरणात प्रचंड अनिश्चितता आहे. प्रमाणाबाहेर होणार्‍या पाऊसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. सुरुवातीला आलेल्या पाऊसानेच जोरदार बॅटींग केल्याने अक्षरश: शेतात गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे बीयांना अंकुर येण्याऐवजी जमिनीतच बिया सडल्याचे प्रकार घडले. परिणामी दुबार पेरणीची वेळ शेतकर्‍यांवर आली. यानंतर सर्व सुरळीत सुरु असतांना बर्‍याच वेळानंतर पुन्हा एकदा पाऊस आणि वार्‍याने जोरदार हजेरी लावली आणि ऊभ्या पिकाचे नुकसान केले. त्यामुळे शेतकरी सध्या बिथरलेला आहे. प्राथमिक गरजा पूर्ण करणे सुद्धा शेतकर्‍यांना आता अवघड झाले आहे. त्यामुळेच शेतकर्‍यांची दिवाळी आनंदात जावी या हेतूने सरकारकडून ही योजना आणण्यात आली असल्याचे अनेकांकडून सांगण्यात येत आहे.

नेमकी काय आहे योजना

मुख्यमंत्री किसान सन्मान निधी असे या योजनेचे नाव आहे. ज्याअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना वर्षाकाठी ६ हजार रुपयाचे अर्थसहाय्य शासनाकडून मिळणार आहे. २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान किसना सन्मान निधी योजनेचे ऊद्घाटन करण्यात आले होते. या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना तीन टप्प्यांमध्ये ६ हजार रुपयांचे सहाय्य केंद्र सरकारकडून मिळते. आता त्यामध्ये मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजनेची भर पडणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता वर्षाकाठी १२ हजार रुपयांचे सहाय्य सरकारकडून मिळणार आहे. मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे सहाय्य सुद्धा टप्प्या टप्प्यानेच मिळणार आहे.

पुढील काही दिवसांत ही योजना कार्यान्वयीत केल्यास शेतकर्‍यांसाठी हे दिवाळी गीफ्ट ठरु शकते, असे मत अनेकांकडून व्यक्त करण्यात आले आहे. संपूर्ण देशात पंतप्रधान किसान सम्नान निधी योजनेचे १० कोटीेंपेक्षा अधिक लाभार्थी आहे. महाराष्ट्रात १ कोटी ५ लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेणार आहे. मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना अशाच शेतकर्‍यांना लागू असणार आहे, जे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत. त्यामुळे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना आता वर्षांकाठी १२ हजार रुपयांचे सहाय्य मिळणार आहे

गद्दारीचा डाग पुसण्यासाठी

महाराष्ट्रातील जनतेच्या मनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या विषयी प्रचंड नाराजी असल्याचे पाहायला मिळते. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील मोठे नाव होते. शिवसेनेत पक्षप्रमुख ऊद्धव ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदेंना मान व प्रतिष्ठा होती. शिवसेना कॅडर बेस संघटना असल्यामुळे संघटनेविषयी समर्पन, आत्मियता आणि विश्वास या गोष्टींना विशेष प्राधान्य होते. एवढे असून देखील शिंदेंनी असा निर्णय घेणे अनेकांच्या मनाला पटलेले नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे व त्यांच्या साथीदारांना गद्दार म्हणून काही ठिकाणी संबोधले जाते आहे. परंतू हा गद्दारीचा डाग पुसुन काढण्यासाठी अनेक लोकनुभावनेचे निर्णय शिंदे सरकारकडून घेतले जात आहेत. लोकांची मनं जिंकता यावी हा त्यामगचा ऊद्देश आहे. त्यामुळेच ही योजना आणली गेली असल्याचे काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

शेतकऱ्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

धोका देऊन, गद्दारी करुन शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. मात्र आता सराकारच्या धोरणांवर टीका करण्यास विरोधकांनी सुरुवात केलीय. त्यामुळे नव्याने आणलेल्या या शेतकरी हिताच्या निर्णयावर सुद्धा विरोधक आक्रमक झाले आहेत. यंदा झालेल्या अतिपाऊसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातील लाखो हेक्टरवरील पिके ऊध्वस्त झाली आहे.

अशावेळी त्वरीत पंचनामे करुन नुकसनाभरपाई देत शेतकर्‍यांची दिवाळी गोड करण्याऐवजी शिंदे सरकार या तुटक्या-पुटक्या योजना आणुन शेतकर्‍यांची दिशाभुल करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. सहा हजार तर एका महिन्याला सुद्धा पुरत नाहीत, अशावेळी ही रक्कम वर्षभरासाठी देऊन शेतकर्‍यांची थट्टा करण्याचा हा प्रकार असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा Chanakya Niti: पुरुषांच्या बर्बादीचं कारण ठरतात अशा गुणांच्या स्त्रिया; काय सांगते चाणाक्य निती? अशा ओळखता येतात त्या स्त्रिया..

PM kisan: शेतकऱ्यांनो फक्त या नंबरवर कॉल करा, आणि 12 वा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार याची माहिती मिळवा..

Apple Side Effects: सफरचंद खाण्याची योग्य वेळ माहिती आहे? या वेळेत सफरचंद खाल्ल्यास येऊ शकतो हृदयविकाराचा झटका..

Using Phone in Toilet: शौचालयामध्ये स्मार्टफोन वापरण्याचे दुष्परिणाम जाणून तुम्ही देखील बंद कराल ही जीवघेणी सवय..

tractor anudan yojana: शेतकऱ्यांनो फक्त ही अट पूर्ण करा; ट्रॅक्टर खरेदीवर केंद्र सरकार देईल 50 टक्के अनुदान..

Pashu Adhar Card: आता जनावरांचे आधार कार्ड बनवणे अनिवार्य, केंद्र नोंदणीकृत जनावरांसाठी देणार हे लाभ

wheat chapati side effects: गव्हाची चपाती खात असाल तर त्वरीत करा बंद; चपाती खाण्याचे हे आहेत दुष्परिणाम..

Monthly Income Scheme: इंडिया पोस्ट बॅंकेची जबरदस्त योजना लॉन्च; दरमहा मिळणार 5 हजार रुपये, करा फक्त हे काम..

Peanuts With Alcohol: दारू सोबत शेंगदाणे खाण्याचे काही फायदे आहेत, पण दुष्परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन ..

Husband wife relation: या पाच गोष्टी पासून महिला आपल्या पतीला ठेवतात दूर; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Amazon Great Indian Festival: आतापर्यंतचा सगळ्यात मोठा सेल! Samsung रेडमीसह अनेक स्मार्टफोन मिळतायत निम्म्या किंमतीत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.