Love addict Side effect: प्रेम रोगाचे दुष्परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन; जाणून घ्या याची लक्षणं आणि उपाय..

0

Love addict Side effect: प्रेम हे आयुष्यात प्रत्येकालाच हवे असते. त्यामुळे प्रत्येकजण प्रेमाच्या शोधात असतो. किशोरवयीनत मुलात याचे प्रमाण सर्वाधिक असते. महाविद्यालयात शिकत असतांना प्रत्येक तरुणाची तरुणीची ईच्छा असते, की त्याला एखादी गर्लफ्रेन्ड बॉयफ्रेंड असावा. आपल्याला सुद्धा प्रेम व्हावं आणि आपल्यावर सुद्धा कोणीतरी आपल्या ऐवढेच प्रेम करावे. जिवनात एखादी व्यक्ती अशी असावी, की जिच्याबरोबर कितीही वेळ घालवला तरीही कंटाळा येऊ नये. कायम तिच्यासोबतच राहावंस वाटतं. आपल्या रोजच्या जिवनातली प्रत्येक गोष्ट तिच्याशी शेअर करावी. कॉलेजमध्ये असतांना जवळपास सगळ्याच तरुणांच्या या अपेक्षा असतात. अनेकांच्या अपेक्षा पूर्ण होतात, तर काहींच्या तशाच राहतात.

कॉलेजमध्ये असतांना आपले प्रेम मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला फार कसरत करावी लागते. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो, तिला आपलसं करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतो. अनेकजण आपलं यशस्वी होण्यासाठी देवाकडे देखील साकडं घालतात.किशोर वयात आपण कॉलेज जीवनात असतो. साहजिकच या वयात मुलगा असो वा मुलगी दोघांनाही एकमेकांच्या प्रेमात पडण्याची ईच्छा असते. त्यामुळे बर्‍यापैकी सगळ्यांना प्रेमात यश येतं. मग हळूहळू प्रेमच आपल्यासाठी सर्वस्व होऊन जातं. प्रेमा व्यतिरीक्त आपल्याला काहीच दिसत नाही. प्रेमाला धरुन बघितलेली सगळी स्वप्न आपण हळूहळू पूर्ण करु लागतो. मात्र नंतर हळू हळू अनेक समस्यांना देखील सामोरे जावे लागते.

प्रेमाच्या अनेक फायदे असले तरी काही दुष्परिणाम देखील आहेत सगळ्यात गंभीर बाब काय असेल तर ती,प्रेमात पडल्यानंतर तुम्हाला लव्ह ऍडीक्ट होण्याची शक्यता. नेहमी आपल्याला प्रेयसी सोबतच राहावे वाटते. बराच वेळ तिच्यासोबत घालवल्याने एक भावनिक बंध दोघांमध्ये जुळुन येतो. त्यामुळे दोघांना एकमेकांशिवाय करमतच नाही. प्रेमाच्या नात्यासमोर सर्व नाती धुसर होऊन जातात. प्रेमाच्या नात्याला आपण जिवनातले अनन्यसाधारण महत्व देऊन बसतो. त्यामुळे आपल्या ईतर नात्यांवर त्याचा परिणाम होतो. याचाच अर्थ तुम्ही लव्ह ऍडीक्टच्या विळख्यात फसत चालला आहे असा होतो. मात्र हे लव्ह ऍडीक्ट नेमके काय आहे? हे कसे ओळखायचे? आणि याची लक्षणे काय? तर तुमच्या या सगळ्या प्रश्नांची ऊत्तरे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कायम नात्यात राहावंसं वाटतं आणि ..

प्रेमात सुरुवातीच्या काळात असतांना आपल्या रोजच्या जिवनातला बर्‍यापैकी वेळ आपण आपल्या जोडीदारासोबत घालवतो. जेव्हा भेटणे शक्य होत नाही, तेव्हा नेहमी फोनवर बोलत असतो. त्यामुळे एक भावनिक बंध दोघांमध्ये निर्माण होतो. परिणामी एकमेकांचे सुख-दु:ख त्यांना एकमेकांचे वाटु लागतात. दोघांच्याही आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीत ते समान वाटेकरी होत जातात. त्यामुळे त्यांच्यातला भावनिक बंध अजून, घट्ट होत जातो. त्यामुळे त्यांना कायम नात्यात राहावेसे वाटते. नाते वाईट अवस्थेत असले तरीही त्यांना नात्यातून बाहेर पडण्याची ईच्छा होत नाही. याशिवाय ब्रेक अप झाल्यास, ते लगेच दुसरा आधार शोधु लागतात आणि पुन्हा-पुन्हा प्रेमात पडतात.

सिनेमातले प्रसंग…

सिनेमा म्हंटले की, त्यात प्रेम हे आलचं, प्रेमाशिवाय किंवा प्रेमप्रसंगांशिवाय सिनेमा अर्धवट वाटतो. त्यामुळे आपण बघतो, लव्ह स्टोरी असणाऱ्या चित्रपटांना प्रचंड मागणी असते. सिनेमांमध्ये दाखवलेला प्रत्येक क्षण प्रेमी जोडप्यांना आपल्या देखील आयुष्यात असावा, तसेच आपली देखील तशीच लाईफस्टाईल असावी. असं अनेकांना वाटत असते. मात्र हे प्रत्यक्षात शक्य नसतं. रियल लाइफ आणि रिल लाईफ यात फरक असतो. आपण नेमका तोच विसरतो. जर तुम्हाला देखील असे अनुभव येत असतील तर तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता असून तुम्हाला Love Addict झालं आहे.

कोणीतरी सतत काळजी…

आयुष्यात कधी ना कधी प्रेम सर्वांनीच केलेले असते. त्यामुळे प्रेमाचा अनुभव प्रत्येकालाच असतो. प्रेमात असतांना आपला साथीदार कायम आपली काळजी घेत असतो. वारंवार आपली विचारपुस करत असतो. काही धोक्याचे वाटल्यास आपल्याला सावध करतो किंवा त्याची जाणीव करुन देतो. त्यामुळे सतत कोणीतरी आपली काळजी घेत असल्याचे आपल्या मनाला जाणवु लागते. कोणीतरी आपली काळजी घेतेय, याचा आपल्याला मनोमन आनंद होतो. मात्र याची आपल्याला सवय जडुन जाते. त्यामुळे सतत कोणीतरी आपली काळजी करत राहावे, असे आपल्याला वाटु लागते. हे सुद्धा लव्ह ऍडीक्टचे लक्षण आहे.

जोडीदाराने लक्ष..

प्रेमात आपल्या जोडीदाराने सतत आपल्यावर लक्ष द्यावे याशिवाय आपण सुद्धा आपल्या जोडीदाराच्या बारीक सारीक बाबींवर लक्ष ठेवायला लागतो. आपल्याला काय हवे काय नको? आपल्याला काय आवडते? खाण्यात काय आवडतं? कपडे कुठले घालायला आवडतात? आणि रंग कुठला आवडतो? वगैंरेंसारख्या गोष्टी आपल्या जोडीदाराने आपल्याबरोबर राहून, आपल्यावर लक्ष ठेऊन जाणुन घ्याव्यात अशी आपली सुप्त ईच्छा असते. ही ईच्छा आपण कधीच बोलून दाखवत नाही. मात्र मनात प्रत्येकाच्या असते. मग तो मुलगा असो वा मुलगी. त्यामुळे तुम्हाला सुद्धा तुमच्या जोडीदाराबाबत असे वाटत असल्यास तुम्ही लव्ह ऍडीक्टमध्ये आहात. याशिवाय तुम्हाला तुमच्या जोडीदाराने कुठेही मिसळलेले आवडत नाही. तुम्हाला न विचारता काही केलेले आवडत नाही. असे वाटल्यास सुद्धा तुम्ही लव्ह ऍडीक्टमध्ये आहात.

हे देखील वाचा Women’sviews on sex: लैंगिक संबंधाचा आनंद घेताना महिलांचं देखील असतं हे मत; जाणून तुम्हालाही बसेल धक्का.. 

Who has Seen My Facebook Profile: या सोप्या पद्धतीने जाणून घ्या तुमची Facebook profile कोण-कोण पाहतंय..

Sarkari Yojana: PM kisan योजनेच्या शेतकऱ्यांना शिंदे सरकारकडून मिळणार दिवाळी गिफ्ट; जाणून घ्या या योजनेविषयी सविस्तर..

Chanakya Niti: पुरुषांच्या बर्बादीचं कारण ठरतात अशा गुणांच्या स्त्रिया; काय सांगते चाणाक्य निती? अशा ओळखता येतात त्या स्त्रिया..

tractor anudan yojana: शेतकऱ्यांनो फक्त ही अट पूर्ण करा; ट्रॅक्टर खरेदीवर केंद्र सरकार देईल 50 टक्के अनुदान..

Apple Side Effects: सफरचंद खाण्याची योग्य वेळ माहिती आहे? या वेळेत सफरचंद खाल्ल्यास येऊ शकतो हृदयविकाराचा झटका..

wheat chapati side effects: गव्हाची चपाती खात असाल तर त्वरीत करा बंद; चपाती खाण्याचे हे आहेत दुष्परिणाम..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.