RBI Rule On Torn Note: जळालेल्या फाटलेल्या नोटा आता कुठल्याही बँकेत मिळणार बदलून; जाणून घ्या RBI चा नवा नियम..

RBI Rule On Torn Note: आपण पेट्रोल (petrol) भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गेलो. १०० चे पेट्रोल टाकायला सांगितले आणि ५०० ची नोट दिली. पेट्रोल टाकणार्‍या कर्मचार्‍याने १०० च्या ४ नोटा आपल्या हातात दिल्या. गर्दीमुळे आपण खिशात टाकल्या आणि तेथुन निघालो. घरी आलो तर बघतो काय त्या ४ नोटांपैकी चक्क २ नोटा फाटलेल्या निघाल्यात” (Torn Note) असं होतं ना बर्‍याचदा तुमच्यासोबत. पण काळजी करु नका, असं जवळपास सगळ्यांसोबतच घडतं. पण यामुळे आपल्याकडे फाटलेल्या नोटांचा ढिगारा वाढत जातो. कारण या फाटलेल्या नोटा देतांना सगळेच देण्याच्या प्रयत्नांतच असतात. मात्र घेतांना कुणीच हात पुढे करत नाही. परंतू काळजी करण्याची गरज नाही. या फाटलेल्या नोटा दुकाना ऐवजी तुम्ही थेट बॅंकेत परत करु शकता. आणि त्याबदल्यात नव्या कोऱ्या नोटा घेऊ शकता. आरबीआयने तसा नियमच जारी केला आहे. जाणून घेऊया आरबीआयच्या नियमाबद्दल सविस्तर. (Torn notes are exchanged as per RBI rules)

बर्‍याचदा फाटलेल्या नोटा आपल्याकडे पुष्कळ झाल्यावर त्याचे काय करायचे? असा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो. मात्र रिझर्व्ह बॅंक ऑफ ईंडियाने यावर मार्ग काढला आहे. आरबीआयने काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. ज्याअंतर्गत फाटलेल्या नोटा बॅंकांना परत घेणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे फाटलेल्या नोटा असल्यास आता दुकानदारांशी हुज्जत घालण्याऐवजी त्या व्यवस्थित सांभाळून ठेवा. आरबीआयच्या या नियमानुसार कुठल्याही सरकारी किंवा खाजगी बॅंकेच्या शाखेत तुम्ही त्या नोटा परत करु शकता व त्याची रिफंड व्हॅल्यु त्या बॅंकेतून मिळवू शकता.

रिझर्व्ह बॅंक ऑफ ईंडिया नियम २००९ नियमाअंतर्गत नोटा स्विकारल्या जाणे आणि बदलल्या जाणे अनिवार्य आहे. नोटा कोणत्याही सरकारी बॅंकेच्या शाखेत किंवा खाजगी बॅंकेच्या शाखेत बदलल्या जाऊ शकतात. तसेच आरबीआयच्या कोणत्याही ईश्यु ऑफीसला भेट देऊन तुम्ही नोटा बदलुन घेऊ शकता. या कायद्यानुसार नोटांच्या स्थितीवर रिफंड व्हॅल्यु ऊपलब्ध असणार आहे. नोटा बदलण्यासाठी कुठलाही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. रिझर्व्ह बॅंक ऑफ ईंडिया नियम २००९ नुसार नोटा बदलण्यासाठी काही नियम घालून दिलेले आहेत. त्याबाबत आपण जाणुन घेऊयात.

दोन तुकडे झाल्यास सुद्धा बदलल्या जातात

अनेकदा आपण घाईगडबडीत असतांना सगळ्याच नोटा काही पाकिटामध्ये ठेवत नाही. काहीजण तर पाकिट चोरीला जातं, या भितीने चक्क पाकिटच वापरत नाही. मात्र अशावेळी जर तुम्हाला दिलेली नोट थोडीफार खराब असेल, जास्त काळ वापरली गेलेली असेल, तर तीचे मधून दोन तुकडे होण्याची शक्यता जास्त असते. तसेच एक भागच गहाळ सुद्धा होऊ शकतो. ५०० च्या नोटीसोबत असे घडल्यास फारच मन दुखते. मात्र चिंता करण्याची गरज नाही. आरबीआयचा २००९ चा नियम तुम्हाला या नोटा बदलुन देण्यास बॅंकेला भाग पाडतो. त्यामुळे अशा नोटा सुद्धा तुम्ही बदलून घेऊ शकता.

खराब व जळलेल्या नोटा सुद्धा बदलल्या जातात

बर्‍याचदा चलनात नोटांचा जास्त वापर झाल्यास नोटा खराब होतात. एखाद्या वेळेस घरात काही जळत असल्यास नोटा सुद्धा त्यामध्ये जळतात. अशा नोटा सुद्धा तुम्ही कुठल्याही शाखेतून बदलून घेऊ शकता. परंतू जळलेल्या किंवा खराब झालेल्या नोटा असल्यास बॅंकेचे कर्मचारी त्या घेण्यास टाळाटाळ करतात. पण अशावेळी तुम्ही त्यांना चांगलीच अद्दल घडवु शकता. थेट बॅंक मॅनेजरची भेट घेऊन तुम्ही त्यांना आरबीआयचा २००९ चा नियम सांगू शकता. या नियमानुसार तुम्ही नोटा बदलुन घेण्यास आले असता, बॅंकेचे कर्मचारी योग्य सहकार्य करत नसल्याची लेखी तक्रार तुम्ही बॅंके मॅनेजरकडे करु शकता.

अशा नोटा बदलणार नाही

आरबीआयचा २००९ चा नियम ज्याप्रमाणे तुम्हाला खराब झालेल्या, जळलेल्या, एक भाग गहाळ असलेल्या किंवा दोन तुकडे झाले असलेल्या नोटा बदलुन देण्याची हमी देतो. त्याप्रमाणे काही अटींअंतर्गत काही नोटा तुम्ही बदलुन घेऊ शकत नाही. जसे की, नोटेवरील गॅरंटी आणि प्रॉमीस क्लॉज, अधिकार्‍याचे नाव, सिग्नेचर, अशोक स्तंभ, महत्मा गांधींचा फोटो आणि वॉटरमार्क ईत्यादींपैकी काही नोटेवरुन गहाळ असल्यास ती नोट बदलली जाऊ शकत नाही.

हे देखील वाचा Social media side effects: सोशल मीडियाचा वापरामुळे होतायत हे गंभीर शारीरिक आणि मानसिक आजार..

limbu Pani side effects: गरम पाण्यात लिंबू टाकून पीत असाल त्वरित थांबवा; अन्यथा आरोग्यावर होतील हे गंभीर परिणाम..

Health tips: उभा राहून पाणी पिण्याचे दुष्परिणाम वाचून बसेल धक्का; जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत..

Astrology 2022: तब्बल ५९ वर्षांनी जुळुन आलाय हा योग; या राशींना होणार हे जबरदस्त फायदे..

balance between wife and mother: पत्नी आणि आईचे भांडण होत असेल तर करा हे काम; आयुष्यात पुन्हा कधीच होणार नाही भांडण..

Love addict Side effect: प्रेम रोगाचे दुष्परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन; जाणून घ्या याची लक्षणं आणि उपाय..

Women’s views on sex: लैंगिक संबंधाचा आनंद घेताना महिलांचं देखील असतं हे मत; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Who has Seen My Facebook Profile: या सोप्या पद्धतीने जाणून घ्या तुमची Facebook profile कोण-कोण पाहतंय..

Sarkari Yojana: PM kisan योजनेच्या शेतकऱ्यांना शिंदे सरकारकडून मिळणार दिवाळी गिफ्ट; जाणून घ्या या योजनेविषयी सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.